Malaysia King Slams Black American Hawk Deal, Calls Helicopters Flying Coffin
Malaysia News in Marathi : क्वालालम्पूर : एक मोठी बातमी समोर आली आहे. मलेशियाचे (Malaysia) राजा सुलतान इब्राहिम सुलकान इस्कंदर यांनी अमेरिकेसोबतचा (America) हेलिकॉप्टर खरेदी करार रद्द केला आहे. त्यांनी याची खरेदी करणाऱ्यासाठी मध्यस्थ करणाऱ्या शस्त्रास्त्र अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला आहे. तसेच करार तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे. अमेरिकेचे 30 वर्षे जुने हेलिकॉप्टर ब्लॅक हॉक नको असल्याचे म्हटले आहे. हे एक उडते फिरते कॉफिन असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
१६ ऑगस्ट रोजी स्पेशल सर्व्हिस रेजिमेटमध्ये ६० व्या वर्धापन दिनानिमत्तच्या परडेमध्ये त्यांनी हे विधान केले. तसेच त्यांनी देशाच्या संरक्षण मंत्रालयाला आधुनिकीकरणाच्या नावाखाली सैनिकांचा जीव धोक्यात न घालण्याचा इशारा दिला. सरकारच्या कामकाजावर, तसेच संरक्षण कराराचे अधिकारी आणि माजी लष्करांच्या हस्तक्षेपावरही नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होत असल्याचे त्यांनी म्हटले आणि याबाबत कोणताही बेजबाबदारपण स्वीकारला जाणार नाही असेही त्यांनी स्पष्ट शब्द सांगितले.
सुलतान इस्कंदर यांनी १९८० च्या दशकात खरेदी केलेल्या स्कायहॉक विमानाची आठवण करुन दिली. मलेशियाने त्यावेळी अमेरिकेकडून व्हिएतनाम युद्धाकाळात ८८ हेलिकॉप्टरची खरेदी केली होती. परंतु या हेलिकॉप्टरचे वारंवार अपघात होत होते. यातील ४० हेलिकॉप्टरचा अपघात झाला होता. यामुळे इतर सर्व हेलिकॉप्टर निवृत्त करण्यात आले.
यामुळे पुन्हा तीच चूक सरकार करत आहे असे त्यांनी म्हटले. त्यांनी अमेरिकेकडून ३० वर्षे जुने ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर खरेदी न करण्याचा इशारा दिला. हे हेलिकॉप्टर सैनिकांच्या सुरक्षेसाठी घातक ठरू शकते असे त्यांचे मत आहे.
त्यांनी अमेरिकेच्या विमानांना ‘कबाड’ म्हणत, मध्यस्थ करणाऱ्या एजंट्सवर त्यांनी गंभीर आरोप केले. या एजंट्समुळे आणि माजी संरक्षण अधिकाऱ्यांमुळे देशाच्या सुरक्षेला धोका वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे त्यांना वेळेत रोखून ही खरेदी थांबवावी असे राजा सुलतान यांनी म्हटले. हे अधिकारी मलेशियाची फसवणूक करत असल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले.
रद्द होणार करार
मलेशियाने अमेरिकेसोबत २०२३ मध्ये चार ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर भाड्याने घेण्यासाठी करार केला होता.याची किंमत सुमारे ४४.४ दशलक्ष डॉलर्स होती. परंतु हा करार होऊन दोन वर्षे झाली असून अद्याप अमेरिकेन या विमानांची डिलिव्हरी केलेली नाही. तसेच याची तारीखही तीन वेळा पुढे ढकलण्यात आली. यामुळे हा करार आधीच रद्द झाला असल्याचे मानले जात आहे. शिवाय मलेशियाचे राजा सुलतान इब्राहिम सुलतान इस्कंदर यांच्या आदेशानंतर याची शक्यता अधिक वाढली आहे.