'अल्लाहने मला पाकिस्तानचा रक्षक बनवले...' ; राष्ट्रपती-पंतप्रधानांना हटवण्याच्या आरोपांवर असीम मुनीर सोडले मौन (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
या आरोपांवर मुनीर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या आरोपांना नाकारले आहे. दरम्यान असीम मुनीर यांनी या सर्व आरोपांचे खंडन केले आहे. तसेच त्यांनी त्यांच्याविरोधात अफवा पसरवून व्यवस्थेविरोधाक कट रचण्यात आला असल्याचे मुनीर यांनी म्हटले आहे.
Viral : अमेरिकेला गंडवलं? खरे नाही तर ‘क्लोन पुतिन’ने घेतली ट्रम्पची भेट; सोशल मीडियावर धुमाकूळ
पाकिस्तानच्या वृत्तसंस्थांनी दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या महिन्यात पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारींच्या राजीनाम्याची चर्चा सुरु होती. त्यांच्या राजीनाम्याने मुनीर यांचा सत्तेत येण्याचा मार्ग मोकळा होईल असे म्हटले जात होते. तसेच काही वृत्तसंस्थांनी झरदारींच्या जागी त्यांचा मुलगा सत्तेत येणार असल्याचाही दावा केला होता.
पाकिस्तानमध्ये संसदीय व्यवस्थेऐवजी राष्ट्रीय व्यवस्था लागू होणार आणि सत्तेची सर्व सुत्रे असीम मुनीर यांच्या हाती जाणार असा दावा केला जात होता.
काय म्हणाले असीम मुनीर?
या सर्वांवर असीम मुनीर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, हे सर्व दावे खोटे आहेत. याचा उद्देश सध्याच्या सरकारची प्रतिमा खराब करणे आहे. “अल्लाहने मला देशाचा रक्षक बनवले आहे. याशिवाय मला दुसऱ्या कोणत्याही पदाची हाव नाही. मी एक सैनिक असून माझी इच्छा देशासाठी शहादत मिळवणे आहे.”
असीम मुनीर नुकतेच अमेरिकेच्या दौऱ्यावरुन परतले आहेत. यावेळी त्यांनी जंग या पाकिस्तानी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सत्तापालटच्या दाव्यावर स्पष्टी करण दिले आहे. तसेच त्यांनी पंतप्रधान शहबाज शरीफ यांचेही कौतुक केले आहे.
तसेच त्यांनी परराष्ट्र धोरणावरही आपले मत मांडले आहे. त्यांनी अमेरिका आणि चीनबरोबर पाकिस्तानचे चांगले संबंध राखण्याचा निर्धार स्पष्ट केले आहे. त्यांनी एका मित्रासाठी आम्ही दुसऱ्या मित्राचा बळी देणार नाही, असे म्हटले आहे. तसेच त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना नोबेल पुरस्कारासाठीही नामांकन केले आहे.
भारताला धमकी
याच वेळी मुनीर यांनी पुन्हा एकदा भारताला धमकी दिली आहे. भारताने प्रॉक्सी युद्ध सुरु करुन पाकिस्तानमध्ये अस्थिरता निर्माण केल्यास चोख प्रत्युत्तर मिळेल असे म्हटले. तसेच अफगाणिस्तानलाही इशारा दिला आहे.
China Flash Flood : चीनमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे कहर; ८ जणांचा मृत्यू, ४ बेपत्ता






