Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताने केला मालदीवचे सरकार पाडण्याचा प्रयत्न? वॉशिंगटन पोस्टचा ‘तो’ अहवाल मुइज्जूने काढला मोडीत

मालदीवने वॉश्गिंटन पोस्टच्या एका अहवालाला फोटाळून लावले असून त्यांनी निराधार दावा केल्याचे म्हटले आहे. भारताच्या दौऱ्यावर आलेले मालदीवचे परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला खलील यांनी एका मुलाखतीत याबाबत आपले मत मांडले.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 05, 2025 | 12:57 PM
मालदीवचे परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला खलील यांनी वॉश्गिंटन पोस्टच्या भारत-मालदीव संबंधी अहवालाला फोटाळून लावले

मालदीवचे परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला खलील यांनी वॉश्गिंटन पोस्टच्या भारत-मालदीव संबंधी अहवालाला फोटाळून लावले

Follow Us
Close
Follow Us:

मले: मालदीवने वॉश्गिंटन पोस्टच्या एका अहवालाला फोटाळून लावले असून त्यांनी निराधार दावा केल्याचे म्हटले आहे. भारताच्या दौऱ्यावर आलेले मालदीवचे परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला खलील यांनी एका मुलाखतीत याबाबत आपले मत मांडले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, काही लोक भारत आणि मालदीव यांच्यातील मजबूत संबंध बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी स्पष्ट केले की, या अहवालात कोणतेही तथ्य नाही आणि मालदीव व भारत या दोन्ही देशांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध अधिक मजबूत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.

खलील यांचे स्पष्टीकरण

अब्दुल्ला खलील यांनी वॉशिंगटन पोस्टच्या अहवालाला “फेक, खोटे आणि निराधार” म्हटले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, भारत आणि मालदीव यांच्यातील संबंध चांगले ठेवण्यासाठी दोन्ही देश एकत्र काम करत आहेत. खलील यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची भारत दौऱ्यादरम्यान भेट घेतली होती. या बैठकीत द्विपक्षीय व्यापारात स्थानिक चलनांचा अधिकाधिक वापर प्रोत्साहित करण्याच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. जयशंकर यांनी सांगितले की, भारत नेहमीच मालदीवसोबत खंबीरपणे उभा राहिला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Pak-Afghan War: तालिबानचा भारताचे नाव घेत पाकिस्तानला इशारा; म्हणाला ‘…मोठी चूक कराल’

वॉशिंगटन पोस्टच्या अहवालावरील वाद

30 डिसेंबर रोजी वॉशिंगटन पोस्टने एक अहवाल प्रसिद्ध केला होता. या अहवालात दावा करण्यात आला होता की, भारताने मालदीवमधील निवडणुकीत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला आहे. अहवालानुसार, भारत सरकारने इब्राहिम सोलिह यांना निवडून आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोहम्मद मुइज्जू निवडून आल्यावर, भारताने पुन्हा सत्ता उलथवून मुइज्जू यांच्या जागी भारतसमर्थक नेत्याला अध्यक्ष बनवण्याचा प्रयत्न केला होता.

याशिवाय, यामध्ये दावा करण्यात आला की भारताच्या रॉ या गुप्तचर संस्थेने मालदीवच्या विरोधी पक्षातील नेत्यांसोबत चर्चा केली होती आणि मुइज्जू यांना पदच्युत करण्यासाठी 51 कोटी रुपयांची मागणी केली होती. या अहवालानुसार, काही खासदार, लष्कर व पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी आणि गुन्हेगारी टोळ्यांना या कटात सहभागी करण्याचा विचार करण्यात आला होता.

भारत व मालदीवचा प्रतिवाद

भारताने देखील या अहवालाला खोटे ठरवले आणि वॉशिंगटन पोस्टच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मालदीवचे माजी अध्यक्ष मोहम्मद नशीद यांनीही भारतावर विश्वास व्यक्त केला असून  सांगितले आहे की, भारत कधीही अशा प्रकारच्या साजिशींमध्ये सहभागी होणार नाही. भारत नेहमीच मालदीवच्या लोकशाहीचा पाठीराखा राहिला आहे. मालदीव व भारताच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी या अहवालातील सर्व आरोप स्पष्टपणे फेटाळले आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- पाकिस्तान हादरले! बलुचिस्तानमध्ये आत्मघाती हल्ला; 8 जवान ठार 40 हून अधिक जखमी

Web Title: Maldives foreign minister khaleel refutes washington post report of plotting to overthrow maldives president nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 05, 2025 | 12:57 PM

Topics:  

  • india
  • Maldives
  • World news

संबंधित बातम्या

Russia Ukriane War : युद्ध थांबवण्यासाठी ट्रम्प यांचा पुन्हा एक प्रयत्न; आज झेलेन्स्की आणि युरोपीय नेत्यांशी करणार चर्चा
1

Russia Ukriane War : युद्ध थांबवण्यासाठी ट्रम्प यांचा पुन्हा एक प्रयत्न; आज झेलेन्स्की आणि युरोपीय नेत्यांशी करणार चर्चा

रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पुतिनने ट्रम्पसमोर ठेवली ‘ही’ अट; अलास्का भेटीवर मोठा खुलासा
2

रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पुतिनने ट्रम्पसमोर ठेवली ‘ही’ अट; अलास्का भेटीवर मोठा खुलासा

‘अल्लाहने मला पाकिस्तानचा रक्षक बनवले…’ ; राष्ट्रपती-पंतप्रधानांना हटवण्याच्या आरोपांवर असीम मुनीर सोडले मौन
3

‘अल्लाहने मला पाकिस्तानचा रक्षक बनवले…’ ; राष्ट्रपती-पंतप्रधानांना हटवण्याच्या आरोपांवर असीम मुनीर सोडले मौन

China Flash Flood : चीनमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे कहर; ८ जणांचा मृत्यू, ४ बेपत्ता
4

China Flash Flood : चीनमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे कहर; ८ जणांचा मृत्यू, ४ बेपत्ता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.