Masood Azhar's behind 2611 Delhi-Mumbai attacks' says Jaish Commander
Massod Iliya Kashmiri : इस्लाबाद : पाकिस्तानचं पितळ पुन्हा एकदा उघडं पडलं आहे. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा कमांडर मसूद इलियास काश्मिरीने याने एक धक्कादायका खुलासा केला आहे. त्याने कबूल केले आहे की, दिल्ली आणि मुंबई हल्ले त्यांचा प्रमुखे मसूद अझहरच्या सांगण्यावरुन करण्यात आले होते. तसेच काश्मीरीने पाकिस्तानच्या सेना प्रमुख असीम मुनीर यांच्यााबाबतही धक्कादायक खुलासा केला आहे.
यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. इलियास काश्मिरीने यामध्ये बहावलपूर आणि बालाकोटमधील दहशतवादी अड्ड्यांचा देखील उल्लेख केला. त्याने सांगितले की, बालाकोटची भूमीही मसूद अजहर आणि जैशच्या दहशतवाद्यांना आसारा देण्यासाठी वापरली जाते.
याच वेळी काश्मीरीने आणखी एक मोठा खुलासा केला. त्याने सांगितले की, बहावलपूर येथे जैशच्या कॅम्पमध्ये ऑपरेशन सिंदूर दरम्यान दहशतवादी मारले गेले होते. यावेळी त्यांच्या अत्यंतसंस्काराला पाकिस्तानी लष्कराचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यांना पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी आदेश दिले होते.
तसेच पाकिस्तानच्या लष्कराने जैशच्या दहशतवाद्यांसोबत आणि बहावलपूरच्या दहशतवाद्यांसोबत असलेले सर्व संबंध लपवण्याचा प्रयत्नही केला होता. याशिवाय भारताच्या ऑपरेशन सिंदूरने (Operation Sindoor) पाकिस्तानच्या सगळ्या दहशतवाद्यांमध्ये प्रचंड भीती देखील निर्माण केली होती, असे सांगितले.
इलियास काश्मीरीने सांगितले की, त्याने मुस्तफा-ए-मिशनच्या नावाखाली पुन्हा दहशतवाद्यांना एकत्र येण्याचे आवाहने केले आहे. काही दहशतवाद्यांनी माघार घेतली आहे, पण काहींनी पुन्हा एकदा लढा देण्याचा निर्धार केला आहे. त्याने सांगितले की, मिशन-ए-मुस्तफा च्या नावाखाल सर्व दहशतवदी एकत्र येण्याचे आवाहन केले. तसेच इलियास काश्मीरीने इस्रायललाही इस्लामचा कट्टर शत्रू म्हणून घोषित केले आहे.
त्याने अमेरिका, भारत, आणि इस्रायलन देशांमध्ये दहशतवादी घटना घडल्यास त्यामागे मसूद हजरचा हात असल्याचे म्हटले आहे. तसेच त्याने इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्यापर्यंत जिहादचा आवाज पोहोचवण्याची धमकी दिली आहे. समर्थकांना जिहादच्या समर्थनार्थ उभे राहण्याचे आवाहन केले आहे. मात्र या खुलास्याने जागतिक स्तरावर पुन्हा एकदा पाकिस्तानची नाच्चकी होण्याची शक्यता आहे.
दिल्ली-मुंबईवरील हल्ल्यांमागे कोणाचा हात आहे?
जैशचा दहशतवादी गटाचा प्रमुख कमांडर इलियास काश्मिरीने सांगितले आहे की, दिल्ली-मुंबई हल्ल्यामागे मसूग अझहरचा हात असल्याचे सांगितले आहे.
पाकिस्तानच्या लष्कराने काय लपवण्याचा केला प्रयत्न?
पाकिस्तानच्या लष्कराने बहावलपूर दहशतवादी आणि मसूद अझहरशी असलेला संबंधाची माहिती लपवल्याचे इलियास काश्मिरीने सांगितले आहे.