Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नेपाळ-चीन सीमा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरली; तिबेट ठरला केंद्रबिंदु, 7.1 रिश्टर स्केल तीव्रता

नेपाळ-तिबेटमध्ये 7.1 तीव्रतेच्या भूकंपाचे जोरदार धक्के आज पहाटे जाणवले आहेत. मंगळवारी (7 जानेवारी) सकाळी तिबेटमधील शिगात्से शहरात 6.9 तीव्रतेचा भूकंप झाला, यामुळे संपूर्ण परिसरात घबराट पसरली.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 07, 2025 | 10:30 AM
जपानमध्ये पुन्हा मोठा भूकंप; क्युशू भागात ६.६ रिश्टर स्केलचे झटके

जपानमध्ये पुन्हा मोठा भूकंप; क्युशू भागात ६.६ रिश्टर स्केलचे झटके

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: नेपाळ-तिबेटमध्ये 7.1 तीव्रतेच्या भूकंपाचे जोरदार धक्के आज पहाटे जाणवले आहेत. मंगळवारी (7 जानेवारी) सकाळी तिबेटमधील शिगात्से शहरात 6.9 तीव्रतेचा भूकंप झाला, यामुळे संपूर्ण परिसरात घबराट पसरली. चीनच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी (CCTV) याची माहिती देत सांगितले की, हा भूकंप 10 किलोमीटर खोलीपर्यंत पसरला. या भूकंपाचे हादरे तिबेटसोबतच नेपाळमध्ये काही भागांमध्ये जाणवले.

तसेच, नेपाळच्या भूकंप विज्ञान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 6:35 वाजता नेपाळमध्येही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. मिळालेल्या माहितीनुसार, हा भूकंप नेपाळ-चीन सीमेवरील तिबेटमधील डिंगे कांती येथे केंद्रित होता. हा भूकंप 7.0 तीव्रतेचा होता. या भूकंपाचा प्रभाव नेपाळच्या पूर्व ते मध्य भागात दिसून आला, यामुळे काठमांडूसह अनेक भागांतील नागरिक भयभीत झाले आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडोंनी दिला राजीनामा; पक्षाचे नेतेपदही सोडले म्हणाले…

काठमांडूमध्येही भूकंपाचे परिणाम

नेपाळची राजधानी काठमांडूमध्येही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. या भूकंपामुळे लोकांमध्ये घबराट निर्माण झाली आणि अनेक लोक घराबाहेर पडले. गेल्या काही काळात काठमांडूमध्ये इतक्या तीव्रतेचा भूकंप जाणवला नव्हता. भूकंपामुळे नुकसान झाले आहे की नाही, याची अजून स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. मात्र, लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नेपाळच्या अन्य भागांतील लोकांनीही भूकंपाचे हादरे जाणवल्याचे सांगितले आहे.

भूकंपाचे केंद्र आणि त्याचा परिणाम

चीनच्या भूकंप नेटवर्क केंद्राने जारी केलेल्या माहितीनुसार, भूकंपाचे केंद्र तिबेटच्या शिगात्से शहरात होते. हे धक्के समुद्रसपाटीपासून 10 किलोमीटर खाली होते. नेपाळ सरकारने देखील पुष्टी केली की भूकंपाचे केंद्र नेपाळ-चीन सीमेवरील तिबेटमधील डिंगे कांती येथे होते. या भूकंपामुळे तिबेट आणि नेपाळमधील अनेक भागांना हादरे बसले. यामुळे दोन्ही देशांतील लोक भयभीत झाले आणि सुरक्षिततेसाठी घराबाहेर पडले.

नुकसानाचा आढावा सुरू

सध्या या भूकंपामुळे नेमका किती जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाले आहे, याची माहिती नाही. मात्र, प्रशासन आणि अधिकाऱ्यांनी परिस्थितीची पाहणी सुरू केली आहे. भविष्यातील धोक्याचा अंदाज घेत स्थानिक प्रशासन लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन करत आहे. भूकंपप्रवण क्षेत्रात असलेल्या तिबेट आणि नेपाळमध्ये असे भूकंप नवीन नाहीत, परंतु अशा मोठ्या भूकंपांनी तेथील नागरिकांचे जीवन विस्कळीत होते. भविष्यातील संभाव्य धोक्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ट्रुडोंच्या राजिनाम्यामुळे सत्तापरिवर्तनाची शक्यता; भारत-कॅनडा संबंध सुधारणार?

Web Title: Massive earthquake on nepal china border tibet is epicenter 71 magnitude nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2025 | 10:21 AM

Topics:  

  • nepal
  • World news

संबंधित बातम्या

हे काय चाललंय? ट्रम्पच्या पत्नीचे थेट पुतिनला पत्र; अमेरिकेच्या अध्यक्षांनी स्वत: पोहोचवले…
1

हे काय चाललंय? ट्रम्पच्या पत्नीचे थेट पुतिनला पत्र; अमेरिकेच्या अध्यक्षांनी स्वत: पोहोचवले…

India China Relations : चीनचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर; NSA अजित डोवाल यांची घेणार भेट
2

India China Relations : चीनचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर; NSA अजित डोवाल यांची घेणार भेट

इस्रायलच्या हल्ल्यानंतर चवताळले इराण सरकार; हेरगिरीच्या आरोपाखाली तब्बल २१ हजार नागरिकांना तुरुंगवास
3

इस्रायलच्या हल्ल्यानंतर चवताळले इराण सरकार; हेरगिरीच्या आरोपाखाली तब्बल २१ हजार नागरिकांना तुरुंगवास

Viral : अमेरिकेला गंडवलं? खरे नाही तर ‘क्लोन पुतिन’ने घेतली ट्रम्पची भेट; सोशल मीडियावर धुमाकूळ
4

Viral : अमेरिकेला गंडवलं? खरे नाही तर ‘क्लोन पुतिन’ने घेतली ट्रम्पची भेट; सोशल मीडियावर धुमाकूळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.