Epstein Files मुळे जागतिक राजकारणात वादळ; ट्रम्प चवताळले, इराणवर निशाण्यावर?
अमेरिकेच्या न्याय विभागाने यावेळी ३० लाख पानांचे रेकॉर्ड्स, १८ हजाराहून अधिक छायाचित्रे आणि जवळपास २ हजार व्हिडिओ असलेल्या फाइल्समधील काही गुपिते उघड केली आहे. या सर्वांचा परिणाम अमेरिकेच्या राजकारणावर होण्याची शक्यता आहे. सध्या यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) देशांतर्गत वादात सापडले आहे. यामुळे ट्रम्प अधिक चवताळले असून अधिक आक्रमक निर्णय घेण्याची शक्यता आहे.
तज्ज्ञांच्या मते, या प्रकरणापासून वाचण्यासाठी ट्रम्प इराणवर हल्ल्याचा डाव खेळू शकतात, अशा राजकीय अटकळ बांधली जात आहे. सध्या एपस्टीन प्रकरणामुळे अमेरिकेच्या राजकारणात गोंधळ उडाला असून ट्रम्प देशांतर्गत दबाव कमी करण्याची विरोधी परराष्ट्र धोरणे अधिक आक्रमक करतील अशी चर्चा सुरु आहे. असे झाल्यास ट्रम्प इराणवर (Iran) हल्ला करु शकतात. गेल्या काही दिवसांपासून अमेरिका-इराणमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण आहे. शिवाय अमेरिकेची मध्य-पूर्वेतील लष्करी उपस्थितीही वाढत आहे.
तज्ज्ञांच्या मते, या सर्व परिस्थितीदरम्यानच अमेरिकेत (America) जेफ्री एपस्टिन प्रकरणाबाबत खुलासा करण्यात आला आहे. यामुळे एपस्टाईन फाइल्सवरुन देशांतर्गत ट्रम्प घिरले आहेत. यामधून बाहेर पडण्यासाठी ट्रम्प इराणविरोधी कठोर भूमिका घेत लष्करी कारवाई करु शकतात असा दावा तज्ज्ञांनी केला आहे. इराणविरुद्ध सध्या कोणत्याही कारवाईची अधिकृत पुष्ट झालेली नाही. परंतु आतापर्यंतचा इतिहास पाहिल्यास देशांतर्गत राजकीय संकटे तीव्र झाल्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर परिणाम होतात.
जेफ्री एपस्टीन हा अमेरिकेतील श्रीमंतांपैकी आहे. त्याच्यावर अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाचा आणि त्यांच्या तस्करीचा आरोप आहे. त्याने अनेक हाय-प्रोफाइल व्यक्तींना अल्पवयींनी मुलीन पुरवल्या असल्याचा दावा केला जातो. कधीकाळी जेफ्री ट्रम्प यांचा जवळचा मित्र होता. यामुळे लैंगिक डोनाल्ड ट्रम्प यांचेही नाव जोडले जाते. परंतु ट्रम्प यांनी जेफ्री प्रकरणाशी संबंधित सर्व आरोप फेटाळले आहेत.
Ans: अमेरिकेच्या न्याय विभागाने जेफ्रीन एपस्टीन प्रकरणाशी संबंधित नवी कागदपत्रे खुली केली आहेत. ज्यामुळे डोनाल्ड ट्रम्प पुन्हा वादात सापडले आहेत.
Ans: जेफ्री एपस्टिन प्रकरणाने ट्रम्प पुन्हा देशांतर्गत वादात अडकले आहेत. यातून वाचण्यासाठी ट्रम्प इराणवल हल्ला करतील असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.






