Massive explosion at Iran's Rajai port, 14 people killed, 750 injured so far
तेहरान: शनिवारी (26 एप्रिल) इराणच्या राजाई बंदरावर मोठा विस्फोट झाला. हा स्फोट इराणच्या क्षेपणास्त्र इंधन बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रासायनिक घटकांचा कंटेनरमध्ये झाला. तसेच यामध्ये 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. 750 हून अधिक लोक जखमी असल्याचे बचाव पथकाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. स्फोटाची माहिती मिळताच अग्नीशमन दल आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आहे. आग विझवण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला.
हा स्फोट अशा वेळी झाला जेव्हा अमेरिकेचे अधिकरी इराणच्या अणु कार्यक्रमार चर्चा करण्यासाठी तिसऱ्यांदा ओमानच्या भेटीला गेले होते.
सध्या हा स्फोट कसा झाला तसेच यामागे हल्ल्याचा कोणताही पाठपुरावा अद्याप स्पष्ट झालेला नाही. दरम्यान इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी म्हटले आहे की, “इराण सध्या या स्फोटामागील कारणाचा शोध घेत आहे, हा हल्ला असल्यास याला प्रत्युत्तर देण्यासाठी आमच्या सुरक्षा व्यवस्था सज्ज आणि सतर्क आहेत.” हा स्फोट झाला त्यावेळी रॉकेट इंधनाचा एक कंटेनर जहाज बंदरावर आले होते.
राजाई बंदर हे इराणच्या प्रमुख बंदरांपैकी एक मानले जाते. या ठिकाणी इराणच्या कच्चा तेलाचे टॅंकर्स आणि पेट्रोकेमिकल सुविधा आहे. तसेच इराणच्या अणु कार्यक्रमासाठी लागणाऱ्या युरेनियमचा साठी देखील या ठिकाणी आहे. यामुळे या स्फोटामागे हल्ल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की, यामुळे आसापासच्या परिसरातील इमारतींच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. स्फोटानंतर आकाशात काळ्या धुरोचे लोट दिसून आले. सध्या याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पाहाला मिळत आहे.
यापूर्वी 2020 मध्ये राजाई बंदरावर सायबर हल्ला झाला होता. यामुळे आज झालेल्या हल्ल्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये अराजकता निर्माण झाली आहे. तसेच इराणच्या बेरुत बंदरावर देखील 2020 मध्ये असाच एक स्फोट झाला होता. या स्फोटात 200 हून अधिक लोक मृत्युमुखी पडले होते, तर 6 हजारहून अधिक जखमी झाले होते.
राजाई बंदराचा वापर प्रामुख्याने तेलाचे कंटेनर वाहून नेण्यासाठी केला जातो. या बंदरावर अनेक तेलाचे टॅंकर्स आणि पेट्रोकेमिकल सुविधा आहेत. अशा परिस्थिती बंदर परिसरात स्फोटाने इराणी अधिकाऱ्यांमध्ये चिंतेच वातावरण पाहायला मिळत आहे. तसेच संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. स्फोटामागील कारण शोधण्यासाठी चौकशी सुर करण्यात आली आहे.
इराणचे राजाई बंदर हे इराणच्या राजधानी तेहरापासून 1 हजार 50 किलोमीटर अंतरावर होर्मुझच्या सामुद्रधुनीवर स्थित आहे. होर्मुझ पर्शियन आखातामधील एक अरुंद मार्ग आहे. या मार्गाने इराणचा 20% तेल व्यापर होतो.