कॅथलिक ख्रिश्चन चर्चचे सर्वात मोठे धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांना शनिवारी (26 एप्रिल) अंतिम निरोप देण्यात आला. पोप यांचे अंत्यसंस्कार व्हॅटिकन सिटीमधील सेंटर पीटर स्क्वेअर येथे झाला. जगभरातील सुमारे 2 लाख लोकांनी त्यांना अखेरचा निरोम दिला. यामध्ये परदेशाचे राष्ट्रप्रमुख, राजघराण्यातील सदस्य आणि सामन्य लोकांचा समावेश होता. भारताकडून राष्ट्रपती द्रौपद्री मुर्मू यांनी पोप फ्रान्सिस यांना श्रद्धांजली वाहली. पोप फ्रान्सिस यांचे निधन 21 एप्रिल 2025 रोजी झाले.
Pope Francis
पोप फ्रान्सि यांचे शनिवारी अत्यंसंस्कार करण्यात आले. पोप फ्रान्सिस यांना सांता मारियाच्या मॅगिओर बॅसिलिकामध्ये दफन करण्यात आले
जगभरातील लाखो लोक पोप फ्रान्सिस यांना अंतिम निरोप देण्यासाठी उपस्थित होते. पोप फ्रान्सिस यांच्या अत्यंसंस्कारासाठी 130 परदेशांच्या प्रतिनिधीमंडळे उपस्थित होते
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारताच्यावतीने पोप फ्रान्सिस यांना श्रद्धांजली वाहीली
तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मक्रों, ब्रिटनचे प्रिन्स विल्यम, ब्राझीलचे अध्यत्र लुईस इनासियो लुला दा सिल्वा यांच्यासह अनेक जागतिक प्रतिनिधी आणि मान्यवर उपस्थित होते
वयाच्या 88 व्या वर्षी पोप फ्रान्सिस यांनी अखेरचा श्वास घेतला. पोप फ्रान्सिस यांचे खरे नाव जॉर्ज मारियो बर्गोलियो होते
पोप फ्रान्सिस यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला. पंतप्रधानांनी म्हटले की, पोप फ्रान्सिस यांच्या निधनाने अत्यंत दु:ख झाले. लाखो लोक पोप फ्रान्सिस यांनी नम्रता, करुणा आणि अध्यात्मिक धैर्याचे प्रतीक म्हणून लक्षात ठेवतील