इराणच्या राजाई बंदरावर भीषण स्फोट; 100 हून अधिक जखमी, परिसरात भितीचे वातावरण, VIDEO (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
तेहरान: इराणच्या अब्बास शहरातील राजाई बंदरावर भीषण स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या स्फोटामुळे संपूर्ण परिसरात भितीचे वातावरण पसरलेले आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार या भीषण स्फोटात 312 लोक जखमी झाले आहेत. सध्या या स्फोटाचे कारण स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच बचाव पथक त्वरित घटनास्थळी पोहोचले असून लोकांना वाचवण्याचे कार्य सुरु आहे.
स्फोटानंतर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, स्फोटानंतर काळ्या धुराचे लोट पसरलेले हे. अनेक इमारतींचे नुकसान झालेले दिसत आहे. स्थानिक व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिलेल्य. माहितीनुसार, शाहिद राजाई बंदर परिसरात अनेक कंटेनरचा स्फोट झाला. या स्फोटात अनेकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णलयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.
⚡BREAKING:
A huge explosion rocks Aftab oil refinery at the port of Bandar Abbas, a key Iranian city on the Strait of Hormuz.
The explosion caused widespread damage to homes and vehicles within a one-kilometre radius of the blast site.
The cause is unclear. pic.twitter.com/zhovwheGKg
— War Analysis (@iiamguri9) April 26, 2025
स्फोट नेमका कसा झाला?
या स्फोटाचे कारण अद्याप समोर आलेले नाही. परंतु प्राथमिक तपासांच्या अहवालानुसाप स्फोटामुळे पायभूत उर्जा सुविधांना कोणतेही नुकसान झालेले नाही. नॅशनल इराण ऑइल रिफायनिंग ॲंड डिस्ट्रीब्युशन कंपनीने स्फोटासंबंधी एक निवदेन जारी केला आहे. या निवदेनात म्हटले आहे की, स्फोटामुळे अब्बासच्या उर्जा सुविधांचे कोणतेही नुकसान झालेले नाही. सध्या बचाव पथक आग विझवण्याचे कार्य करत आहे. आग पूर्णपणे विझवल्यानंतर सर्व कामकाज सुरळित होईल.
अब्बासचे राजाई बंदर हे इराणच्या प्रमुख बंदरांपैकी एक आहे. या ठिकाणी कच्च्या तेलाचे टॅंकर्स आणि पेट्रोकेमिकल सुविधा आहेत. यामुळे हा स्फोट घडवून आणला असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या हा स्फोट कसा झाला याची चौकशी सुर करण्यात आली आहे. स्फोट इतका शक्तिशाली होता की, अनेक इमारतींच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. प्रत्यक्षदर्शनींच्या म्हणण्यानुसार, स्फोटानंतर आकाशात काळ्या धूराचे लोट पाहायला मिळाले. यापूर्वी 2020 मध्ये राजाई बंदरावर सायबर हल्ला झाला होता. यामुळे आज झालेल्या हल्ल्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये अराजकता निर्माण झाली आहे. 2020 मधील हल्ला इस्रायलने केल्या असल्याचा दावा इराणने केला होता.
इराणचे राजाई बंदर, प्रामुख्याने तेलाचे कंटेनर वाहून नेण्यासाठी वापरण्यात येते. याठिकाणी अनेक तेलाचे टॅंकर्स आणि पेट्रोकेमिकल सुविधा आहेत. अशा परिस्थिती बंदर परिसरात स्फोट झाल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभारले आहे. तसेच संपूर्ण परिसरात भितीचे वातावरण पसरले असून स्थानिक अधिकारी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. स्फोटामागील कारण शोधण्यासाठी तपास यंत्रणा देखील सज्ज झाल्या आहेत.