Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इराणच्या राजाई बंदरावर भीषण स्फोट; 100 हून अधिक जखमी, परिसरात भितीचे वातावरण, VIDEO

इराणच्या अब्बास शहरातील राजाई बंदरावर भीषण स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या स्फोटामुळे संपूर्ण परिसरात भितीचे वातावरण पसरलेले आहे. या स्फोटात 100 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 26, 2025 | 05:17 PM
Massive explosion at Iran's Rajai port, More than 100 injured, VIDEO

Massive explosion at Iran's Rajai port, More than 100 injured, VIDEO

Follow Us
Close
Follow Us:

तेहरान: इराणच्या अब्बास शहरातील राजाई बंदरावर भीषण स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या स्फोटामुळे संपूर्ण परिसरात भितीचे वातावरण पसरलेले आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार या भीषण स्फोटात 312 लोक जखमी झाले आहेत. सध्या या स्फोटाचे कारण स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच बचाव पथक त्वरित घटनास्थळी पोहोचले असून लोकांना वाचवण्याचे कार्य सुरु आहे.

स्फोटानंतर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, स्फोटानंतर काळ्या धुराचे लोट पसरलेले हे. अनेक इमारतींचे नुकसान झालेले दिसत आहे. स्थानिक व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिलेल्य. माहितीनुसार, शाहिद राजाई बंदर परिसरात अनेक कंटेनरचा स्फोट झाला. या स्फोटात अनेकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णलयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Pope Francis Funeral: पोप फ्रान्सिस यांच्यावर आज अत्यंसंस्कार होणार; अंतिम निरोप देण्यासाठी पोहोचले लाखो लोक

⚡BREAKING: A huge explosion rocks Aftab oil refinery at the port of Bandar Abbas, a key Iranian city on the Strait of Hormuz. The explosion caused widespread damage to homes and vehicles within a one-kilometre radius of the blast site. The cause is unclear. pic.twitter.com/zhovwheGKg — War Analysis (@iiamguri9) April 26, 2025

स्फोट नेमका कसा झाला?

या स्फोटाचे कारण अद्याप समोर आलेले नाही. परंतु प्राथमिक तपासांच्या अहवालानुसाप स्फोटामुळे पायभूत उर्जा सुविधांना कोणतेही नुकसान झालेले नाही. नॅशनल इराण ऑइल रिफायनिंग ॲंड डिस्ट्रीब्युशन कंपनीने स्फोटासंबंधी एक निवदेन जारी केला आहे. या निवदेनात म्हटले आहे की, स्फोटामुळे अब्बासच्या उर्जा सुविधांचे कोणतेही नुकसान झालेले नाही. सध्या बचाव पथक आग विझवण्याचे कार्य करत आहे. आग पूर्णपणे विझवल्यानंतर सर्व कामकाज सुरळित होईल.

अब्बासचे राजाई बंदर हे इराणच्या प्रमुख बंदरांपैकी एक आहे. या ठिकाणी कच्च्या तेलाचे टॅंकर्स आणि पेट्रोकेमिकल सुविधा आहेत. यामुळे हा स्फोट घडवून आणला असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या हा स्फोट कसा झाला याची चौकशी सुर करण्यात आली आहे. स्फोट इतका शक्तिशाली होता की, अनेक इमारतींच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. प्रत्यक्षदर्शनींच्या म्हणण्यानुसार, स्फोटानंतर आकाशात काळ्या धूराचे लोट पाहायला मिळाले. यापूर्वी 2020 मध्ये राजाई बंदरावर सायबर हल्ला झाला होता. यामुळे आज झालेल्या हल्ल्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये अराजकता निर्माण झाली आहे. 2020 मधील हल्ला इस्रायलने केल्या असल्याचा दावा इराणने केला होता.

इराणचे राजाई बंदर, प्रामुख्याने तेलाचे कंटेनर वाहून नेण्यासाठी वापरण्यात येते. याठिकाणी अनेक तेलाचे टॅंकर्स आणि पेट्रोकेमिकल सुविधा आहेत. अशा परिस्थिती बंदर परिसरात स्फोट झाल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभारले आहे. तसेच संपूर्ण परिसरात भितीचे वातावरण पसरले असून स्थानिक अधिकारी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. स्फोटामागील कारण शोधण्यासाठी तपास यंत्रणा देखील सज्ज झाल्या आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्याचा नेपाळमध्ये तीव्र निषेध; निदर्शकांनी केली ‘ही’ मोठी मागणी

Web Title: Massive explosion at irans rajai port more than 100 injured video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2025 | 05:17 PM

Topics:  

  • iran
  • World news

संबंधित बातम्या

World War 3: ‘इराणच्या शत्रूंनो… तुमच्या नशिबाचा विचार करा,’ तेहरानने अमेरिकेला ठणकावले; युद्धात मृतांचा आकडा धडकी भरवणारा
1

World War 3: ‘इराणच्या शत्रूंनो… तुमच्या नशिबाचा विचार करा,’ तेहरानने अमेरिकेला ठणकावले; युद्धात मृतांचा आकडा धडकी भरवणारा

US Iran युद्धात रशियाची एन्ट्री! पुतिन यांचा इराणला गंभीर इशारा; ट्रम्प यांच्याशीही चर्चा, युद्ध थांबणार की भडकणार?
2

US Iran युद्धात रशियाची एन्ट्री! पुतिन यांचा इराणला गंभीर इशारा; ट्रम्प यांच्याशीही चर्चा, युद्ध थांबणार की भडकणार?

Kilauea Volcano: ज्वालामुखीचा महाविस्फोट! 1000 फूट उंचीवर लाव्हाचे कारंजे; हवाईमध्ये 43 व्यांदा निसर्गाचे तांडव, पाहा VIDEO
3

Kilauea Volcano: ज्वालामुखीचा महाविस्फोट! 1000 फूट उंचीवर लाव्हाचे कारंजे; हवाईमध्ये 43 व्यांदा निसर्गाचे तांडव, पाहा VIDEO

US Iran War : इराणचा समुद्री सापळा! होमुर्झ खाडीत खतरनाक माईन प्लॅननंतर ट्रम्प संतापले; जागतिक तेल पुरवठा धोक्यात?
4

US Iran War : इराणचा समुद्री सापळा! होमुर्झ खाडीत खतरनाक माईन प्लॅननंतर ट्रम्प संतापले; जागतिक तेल पुरवठा धोक्यात?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.