Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्याचा नेपाळमध्ये तीव्र निषेध; निदर्शकांनी केली 'ही' मोठी मागणी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
काठमांडू: नेपळाची राजधानी काठमांडू येथे पाकिस्तानविरोधात मोठ्या प्रमाणात निदर्शन सुरु आहे. पहलगमा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये एका नेपाळी नागरिकाचा मृत्यू झाला. यामुळे नेपाळच्या लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. निदर्शनामध्ये पाकिस्तानी दूतावास बंद करण्याची मागणी केली जात आहे. भारताच्या जम्मू आणि काश्मीर येथील प्रमुख पर्यटनस्थळ पहलगाम येथे मंगळवारी 22 एप्रिल 2025 रोजी दहशतवादी हल्ला झाला. पहलगाममध्ये सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर 5 ते 6 हल्लेखोरांनी गोळीबार केला. या हल्ल्यात 26 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून यामध्ये एका नेपाळच्या नागरिकाचा देखील बळी गेला आहे.
निदर्शनामध्ये पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या जात आहेत. लोकांनी पाकिस्तानी लष्करप्रमुखांचे पोस्टर घेऊन निदर्शने काढली आहेत. लष्करप्रमुखांना या दहशतवादी हल्ल्यासाठी जबाबदार धरले जात आहे. पाकिस्तानचा दहशतवादाला असलेल्या पाठिंब्यांमुळे नेपळच्या एका नागरिकाला जीव गमवावा लागला असे लोकांचे म्हणणे आहे. यामुळे लोकांनी नेपाळ सरकारडे पाकिस्तानी दूतावास बंद करण्याची मागणी केली आहे.
नेपाळने पाकिस्तानसोबत असलेल्या राजनैतिक संबंधांचा पुनर्विचार करावा आणि पाकिस्तनी दूतावास बंद करावे अशी मागणी निदर्शक करत आहेत. पाकिस्तान दहशतवादाला प्रोत्साहन देणे थांबवत नाही, तोपर्यंत असेच दहशतवादी हल्ले सुरु राहतील आणि निष्पाप नागरिकांचे प्राण जातील.
#WATCH | Nepal: People hold protest near the Pakistan Embassy in Kathmandu over #PahalgamTerrorAttack
25 Indian citizens and one Nepali national were killed in the terrorist attack on April 22 in Pahalgam, Jammu and Kashmir pic.twitter.com/3Sa8y04mzN
— ANI (@ANI) April 26, 2025
पहलगाम हल्ल्यानंतर नेपाळचे पंतप्रधान केपी ओली शर्मा यांनी हल्ल्यात मृत झालेल्या व्यक्तींबद्दल शोक व्यक्त केला. तसेच त्यांनी मृतांच्या कुटुंबियांबद्दल संवेदना व्यक्त केल्या. पंतप्रधानांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत म्हटले की, “पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात बळी गेलेल्यांबद्दल तीव्र संवेदना आहेत. नेपाळ भारताच्या बाजूने ठामपणे उभा आहे. नेपाळ कोणत्याही दहशतवादी कृत्याचा तीव्र निषेध करता. तसेच पीडितांमध्ये एका नेपाळी नागरिकाचा समावेश आहे. आम्ही आवश्यक ती मतद करण्या तयार आहोत.”
पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत-नेपाळ सोनौली सीमेवर सुरक्षा यंत्रणेत वाढ करण्यात आली आहे. कडक सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या भागात दहशतवाद्यांची घुसखोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामुळे सुरक्षा रक्षकांना सीमा ओलांडण्यापूर्वी लोकांचे ओळख तपासण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
महाराजंगचे पोलिस अधिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत-नेपाळ सीमेवर सुरक्षा मजबूत करण्यात आली आहे. दहशतवाद्यांची घुसखोरी रोखण्यासाठी SSB ने नेपाळला जाणाऱ्या मार्गावर CCTV कॅमेरे आणि ड्रोन तैनात केला आहेत. सध्या या हल्ल्यामुळे भारतात भीतीचे वातावरण पसरले आहे.