Pope Francis Funeral: पोप फ्रान्सिस यांच्यावर आज अत्यंसंस्कार होणार; अंतिम निरोप देण्यासाठी पोहोचले लाखो लोक (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
कॅथलिक ख्रिश्चन धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे रविवारी (21 एप्रिल) निधन झाले. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण जगभरात दुखाचे वातावरण पसरलेले होते. आज पोप फ्रान्सिस यांच्या अत्यंसंस्काराचे व्हॅटिन सिटीच्या सेंट पीटर स्क्वेअर मध्ये आयोजन करण्यात आले आहे. पोप फ्रान्सिस यांना अंतिम निरोप देण्यासाठी लाखो लोक व्हॅटिकनमध्ये पोहोचले आहेत. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देखील पोपो फ्रान्सिस यांच्या अत्यंसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी व्हॅटिकन येथे पोहोचल्या आहेत. आज राष्ट्रीय शोख जाहीर करत भारतीय ध्वज देखील खाली ठेवण्यात आला आहे.
पोप फ्रान्सिस यांच्या अत्यंसंस्कारासाठी 130 परदेशांच्या प्रतिनिधीमंडळे उपस्थित राहणार आहेत. यामध्ये 10 राष्ट्रप्रमुख आणि 10 सम्राटांचा सम्राटांचा समावेश आहे. यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मक्रों, ब्रिटनचे प्रिन्स विल्यम, ब्राझीलचे अध्यत्र लुईस इनासियो लुला दा सिल्वा यांच्यासह अनेक जागतिक प्रतिनिधी आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
पोप फ्रान्सिस यांचे 21 एप्रिल 2025 रोजी निधन झाले. फ्रेब्रुवारी महिन्यांत त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाला होता. यामुळे त्यांना रुग्णलयात दाखल करण्यात आले. तपासादरम्यान डॉक्टरांना त्यांना दोन्ही फुफ्फुसांमध्ये न्यूमोनिया झाल्याचे आढळून आले होते. त्यांच्यावर उपचार सुरु होते. यादरम्यान डॉक्टरांनी त्यांना पूर्ण आराम करण्याचा सल्ला दिला. परंतु अचानक त्यांची प्रकृती खलावली. त्यांना काही दिवस वेंटिलेटवर ठेवण्यात आले होते. अखेर वयाच्या 88 व्या वर्षी पोप फ्रान्सिस यांनी अखेरचा श्वास घेतला. पोप फ्रान्सिस यांचे खरे नाव जॉर्ज मारियो बर्गोलियो होते.
पोप फ्रान्सिस यांच्या अत्यंसंस्कारात सहभागी होण्यासाठी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दोन दिवसांच्या व्हॅटिकन दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी (25 एप्रिल ) राष्ट्रपतींनी सेंट पीटर्स बॅसिलिका येथे पोप फ्रान्सिस यांचा श्रद्धांजली वाहली.
President Droupadi Murmu paid homage to His Holiness Pope Francis at Basilica of Saint Peter in Vatican City. pic.twitter.com/eymWVVZi4J
— President of India (@rashtrapatibhvn) April 25, 2025
पोप फ्रान्सिस यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला. पंतप्रधानांनी म्हटले की, पोप फ्रान्सिस यांच्या निधनाने अत्यंत दु:ख झाले. लाखो लोक पोप फ्रान्सिस यांनी नम्रता, करुणा आणि अध्यात्मिक धैर्याचे प्रतीक म्हणून लक्षात ठेवतील.
पोप यांचा अत्यंसंस्कार धार्मिक पद्धतीने केला जातो. यामध्ये पोप यांना जमिनीत पुरले जाते. त्यांचे शरीर पवित्र वस्त्रांनी सजवले जाते. पोपच्या शरीरावर धार्मिक वस्त्रे असतात. तसेच डोक्याखाली माती आणि नाणी ठेवली जातात पोप यांचा मृतदेह तीन शव पेटीत ठेवण्यात येतो. पहिली शवपेटी सायप्रसच्या लाकडापासून बनलेली असते. दुसरी शवपेटी ही शीशपासून बनलेली असते तर तिसरी शवपेटी ओकच्या लाकडापासून बनलेली असते.
पोप यांचा अत्यंसंस्कार सेंट पीटर्स बॅसिलिकासमोर करण्यात येतो. अत्यंसंस्काराच्या वेळी अनेक मान्यवर, बिशप, धार्मित नेते आणि सामान्य लोक पोप यांना श्रद्धांजली वाहतात. नंतर पोप यांना बॅसिलिकेच्या खाली असलेल्या गुहांमध्ये पुरण्यात येते.