
Massive Blast at Nigeria in Mosque
थायलंड-कंबोडियानंतर आता ‘या’ देशात संघर्षाची लाट ; महिला निदर्शकांवरील गोळीबारात ९ ठार
मिळालेल्या माहितीनुसार, ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला बुधवारी (२४ डिसेंबर) रोजी हा हल्ला झाला आहे. नायजेरियाच्या उत्तर पूर्व भागातील बोर्नो राज्याची राजधानी मैदुगुरो येथे ही घटना घडली. या हल्ल्यात ३५ हून अधिक भाविक जखमी झाले आहेत. तसेच पाच जणांचा मृत्यू झाला आहे. हा आत्मघातकी हल्ला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
मैदुगुरु येथील गाम्बोरु मार्केट परिसरात एका मशिदीत हा स्फोट झाला. यावेळी मोठ्या संख्येने लोक नमाज अदा करत होते. यावेळी अचानक हा स्फोट झाला. या स्फोटानंतर मशिदी गोंधळ उडाला होता. लोक रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. जखमी लोक बचावासाठी आराडा-ओरड करत होते. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि आपत्कालीन सेवांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
बोर्नो राज्याचा पोलिस कमांडचे प्रवक्ते नाहूम दासो यांनी या घटनेचा तपास सुरु असल्याचे म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, प्राथमिक तपासानुसार, हा आत्मघातकी हल्ला आहे. घटनास्थळावरुन आत्मघाती जॅकेटचे तुकडे सापडले आहे. तसेच प्रत्यक्षदर्शनींनी देखील याची साक्ष दिली आहे. सध्या या हल्ल्यामागतचा हेतू अस्पष्ट असून त्याचा शोध घेतला जात आहे.
या घटनेची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेने अद्याप स्वीकारलेली नाही. नायजेरियात बोको हराम आणि पुटीर गट इस्लामिक स्टेट बेस्ट आफ्रिका प्रोविन्स यांच्यावर हा हल्ला घडवला असल्याचा संशय व्यक्त केला दात आहे. यापूर्वी देखील या संघटनांनी धार्मिक स्थळे आणि सार्वजनिक ठिकाणांवर हल्ले केले होते. यामुळे संशय अधिक गडद आहे. गेल्या काही काळात नायजेरियातील हिंसाचार वाढत आहे.
कॅथलेकिक शाळेतून २०० विद्यार्थ्यांचे आणि १२ शिक्षकांचे अपहरण
शिवाय काही दिवसांपूर्वी लोकांनी नायजेरितील एका खाजगी कॅथोलिक शाळेतील 200 हून अधिक विद्यार्थी आणि 12 शिक्षकांचे अपहरण केले होते. या घटनेमुळे संपूर्ण प्रदेशात भीती आणि अराजक वातावरण निर्माण झाली होती. तसेच महिला आंदोलकांवरही गोळीबार करण्यात आला होता. या सततच्या वाढत्या घटनांमुळे नायजेरियातील सामान्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
Ans: