Nigeria Kidnapping : नायजेरियातील कॅथोलिक शाळेतून २०० हून अधिक विद्यार्थी आणि १२ शिक्षकांचे अपहरण; ख्रिश्चनांविरुद्ध हिंसाचार सुरूच ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Christian Violence in Nigeria : नायजेरियामध्ये(Nigeria) ख्रिश्चनांविरुद्ध सुरू असलेल्या हिंसाचाराच्या मालिकेत आणखी एक गंभीर घटना घडली आहे. देशातील एका खाजगी कॅथोलिक शाळेतील २०० हून अधिक विद्यार्थी आणि तब्बल १२ शिक्षकांचे सशस्त्र लोकांनी अपहरण केले असून, या घटनेमुळे संपूर्ण प्रदेशात भीती आणि अराजक वातावरण निर्माण झाले आहे. काही विद्यार्थी घटनास्थळावरून पळून सुरक्षित परतले असले तरी परिस्थिती अतिशय गंभीर आहे. ख्रिश्चन असोसिएशन ऑफ नायजेरिया (CAN) ने पुष्टी केली आहे की, या हल्ल्यात किमान २१५ विद्यार्थी आणि १२ शिक्षकांना बंदूकधारकांनी कैद केले आहे. ही घटना देशातील वाढत्या धार्मिक तणावाची गंभीर झलक देत असून, ख्रिश्चन समुदायात भीतीचे सावट आहे.
अपहरण झालेल्या विद्यार्थ्यांचे पालक शाळेबाहेर तणावपूर्ण वातावरणात वाट पाहत आहेत. या घटनेमुळे पालकांमध्ये भीती, राग आणि अनिश्चिततेचे भाव आहेत. CAN चे नायजर स्टेट अध्यक्ष मोस्ट रेव्ह. बुलस दौवा योहाना यांनी पालकांना आश्वस्त करत सांगितले की, सरकार आणि सुरक्षा दल अपहरण झालेल्या विद्यार्थ्यांना सुरक्षित परत आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India Defense : पाकिस्तानने आता युद्धासाठी तयार राहावे, भारताचा धोरणात्मक संयम संपला; ‘Two-Front war’ साठी इंडियन आर्मी सज्ज
नायजेरियात ख्रिश्चन समुदाय लक्ष्य करून अनेक घटना मागील काही दिवसांत घडल्या आहेत. याच आठवड्यात क्वारा राज्यातील एका चर्चवर झालेल्या हल्ल्यात दोन जण ठार झाले. तसेच केब्बी राज्यातील माध्यमिक शाळेवर झालेल्या हल्ल्यात २५ मुलींचे अपहरण करण्यात आले आणि उपमुख्याध्यापकांना गोळी मारून हत्या करण्यात आली.
केब्बी शाळेवरील हल्ल्याबाबत पोलिस जनसंपर्क अधिकारी नाफियू अबुबकर कोतारकोशी यांनी अधिकृत निवेदन जारी केले आहे. त्यांनी सांगितले की, अत्याधुनिक बंदुकींसह हल्लेखोरांनी पहाटे सुमारास ४ वाजता शाळेत घुसून गोळीबार करत विद्यार्थ्यांना जबरदस्ती ओढून नेले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा दलांनी प्रतिसाद दिला असला तरी हल्लेखोर आधीच विद्यार्थ्यांना जंगलात घेऊन गेले होते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Pakistan Reality : पाकिस्तानने हदद्च केली पार! दहशतवादासोबतच ‘हे’ काम करून जगभरातून बनले निंदेचे कारण
या भयंकर घटनांनंतर नायजर राज्य सरकारने अनेक शाळा तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत. नायजेरियाचे अध्यक्ष बोला तिनुबू यांनी देशातील भीषण सुरक्षास्थितीमुळे जोहान्सबर्गमधील जी२० परिषदेसह सर्व आंतरराष्ट्रीय कार्यक्रम रद्द केले आहेत.
अपहरणकर्त्यांचा शोध घेण्यासाठी लष्करी तुकड्या आणि विशेष पोलीस पथके जंगलात शोधमोहीम राबवत आहेत. सुरक्षा दलांनी अपहरण झालेल्या विद्यार्थ्यांना परत मिळवण्यासाठी डाकूंच्या रूट्सवर देखरेख वाढवली आहे.
Ans: अंदाजे २०० पेक्षा जास्त विद्यार्थी व १२ शिक्षकांचे अपहरण झाले आहे.
Ans: नायजेरियात ख्रिश्चन समुदायावर वाढत्या धार्मिक हिंसाचाराचा हा भाग मानला जातो.
Ans: शाळा बंद, सुरक्षा दल तैनात आणि आंतरराष्ट्रीय कार्यक्रम रद्द करून शोधमोहीम सुरू आहे.






