पाकिस्तानच्या क्वेटा येथे भीषण स्फोट; अनेकांचा मृत्यू, रुग्णालयात एकच पळापळ
कराची : पाकिस्तानच्या क्वेटा शहरात भीषण स्फोट झाला. या स्फोटात अनेक जणांचा मृत्यू झाल्याची भीती आहे. या स्फोटात अनेक जण जखमी झाले आहेत. क्वेटा ही पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांताची राजधानी असून, या ठिकाणी मोठा स्फोट झाला. याबाबत बलुचिस्तान आरोग्य विभागाच्या सचिवांकडून माहिती देण्यात आली.
बॉम्बस्फोटामुळे क्वेटा रुग्णालयांमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. सर्व डॉक्टर, पॅरामेडिक्स, परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बलुचिस्तान आरोग्य विभागाच्या मीडिया को-ऑर्डिनेटर यांनी सांगितले की, बॉम्बस्फोटात १९ जण जखमी झाले आहेत. जखमींना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. बॉम्बस्फोटाचा व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये एक शक्तिशाली स्फोट झाला, तेव्हा रस्त्यावरून अनेक वाहने जात असल्याचे दिसून आले आहे, ज्यामध्ये रस्त्यावरील अनेक लोक जखमी झाले आहेत.
हेदेखील वाचा : इंडोनेशियात भीषण दुर्घटना! इस्लामिक शाळेची इमारत कोसळली अन् निरागस विद्यार्थी ढिगाऱ्याखाली अडकले
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा आत्मघाती बॉम्बस्फोट होता. ४ सप्टेंबर रोजी क्वेटा येथे एका राजकीय रॅलीदरम्यान झालेल्या बॉम्बस्फोटात 15 जणांचा मृत्यू झाला होता आणि 30 हून अधिक जण जखमी झाले होते. त्यानंतर आता पाकिस्तानच्या क्वेटा येथे भीषण स्फोट झाला असून, यामध्ये 19 जण जखमी झाल्याची माहिती देण्यात आली.
इंडोनेशियात मोठी दुर्घटना
सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी घडत आहेत. यात इंडोनेशियात (Indonesia) भीषण दुर्घटना घडली आहे. एका शाळेची इमारत कोसळली असून, यामध्ये ६५ विद्यार्थी ढिगाऱ्याखाली अडकले आहे. मंगळवारी (दि.३०) ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, इंडोनेशियाच्या इस्लामिक बोर्डिंग स्कूलची इमारत कोसळली आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
अनधिकृत बांधकामामुळे इंडोनेशियात घडली घटना
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेच्या इमारतीवर अनधिकृतपणे अतिरिक्त मजल्याचे बांधकाम सुरु होते. यामुळे बांधकामादरम्यान छत आणि भिंती कोसळल्या. सध्या घटनेची चौकशी सुरु आहे. या घटनेसाठी जबाबदार असलेल्यांवर कारवाई होईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. सध्या या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.