Massive Blast in Pakistan's Quetta killed 10
Pakistan news in marathi : इस्लामाबाद : पाकिस्तानच्या (Pakistan) बलुचिस्तान प्रांतात एक मोठी घटना घडली आहे. बलुचिस्तानची राजधानी क्वेटा येथे मोठा बॉम्बस्फोट झाला आहे. यामुळे संपूर्ण बलुचिस्तानमध्ये भीतीचे वातावरण आहे. या हल्ल्यात १० जणांचा मृत्यू आणि ३२ जखमी झाल्याचे वृत्त मिळाले आहे. सध्या शहरात आणबामी घोषणा जाहीर करण्यात आली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, क्वेटामधील झरघून रोडजवळ ही घटना घडली. स्फोट इतका भीषण होता की सर्वत्र धुराचे लोट पसरले होते. शिवाय स्फोटानंतर गोळीबाराची घटनाही घडली. स्फोटाची माहिती मिळताच पोलिस आणि आपत्कालीन दल घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे.
Trump Gaza Plan : ट्रम्प यांच्या गाझा योजनेला PM मोदींचा पाठिंबा; इतर देशांनाही केले समर्थनाचे आवाहन
हा एक आत्मघातकी हल्ला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मिडिया रिपोर्टनुसार स्फोटात हल्लेखोरही ठार झाला असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेजही समोर आला आहे. यामध्ये हल्ला कुठे आणि कसा करण्यात आला स्पष्ट दिसत आहे. बलुचिस्तानचे आरोग्य मंत्री बख्त मोहम्मद काकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींना क्वेटाच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेने परिसरात घबराट पसरलवी असून हॉस्पिटलने मेडिकल कॉलेज आणि ट्रामा सेंटमध्ये आणीबाणी जाहीर केली आहे.
🚨BREAKING: Authorities report that 8 people, including three Frontier Corps personnel, were killed in a blast on Zarghun Road, Quetta, Pakistan. The explosion occurred near the FC Balochistan security facility. The attack is believed to be a suicide bombing involving a vehicle… pic.twitter.com/zw3ShBU7kB — World Source News 24/7 (@Worldsource24) September 30, 2025
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांनी झरघूनच्या संपूर्ण परिसरात बंदोबस्त केला आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षा घेत या घटनेचा तपास सुरु करण्यात आला आहे. सध्या या घटनेमागचे कारण अस्पष्ट आहे. तसेच हल्ला कोणी घडवून आला याबाबतही कोणता पुरावा मिळालेला नाही.
बलुचिस्तानच्या क्वेटा शहरात अशा हल्ल्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या काही काळात बलुचिस्तानमध्ये परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. या महिन्यात क्वेटामध्ये दोन वेळा हल्ला करण्यात आला आहे. २ सप्टेंबर रोजी माजी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला झाला होता. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तर याच्या दोन दिवसानंतर ४ सप्टेंबर रोजी एका राजकीय रॅलीदरम्यानही असाच हल्ला झाला होता. ज्यामध्ये १५ जण ठार, ३० हून अधिक जखमी झाले होते.
प्रश्न १. पाकिस्तानमध्ये कुठे झाला हल्ला?
पाकिस्तानमध्ये बलुचिस्तानची राजधानी क्वेटा येथे आत्मघातकी हल्ला झाल आहे.
प्रश्न २. क्वेटातील हल्ल्यात किती जीवितहानी झाली?
क्वेटा येथे झालेल्ल्या आत्मघातकी हल्ल्यात १० जण ठार, तर ३२ जखमी झाले आहे.
गांधी जयंतीपूर्वी मोठी घटना! लंडनमध्ये महात्मा गांधींच्या स्मारकाची विटंबना, वातावरण तापणार