Foreign Minister S Jaishankar in UN on Pakistan Terrorism
S. Jaishankar in UNGA : न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रा महासभेचे ८० वे अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात एस. जयशंकर यांनी भारताचे प्रतिनिधीत्व केले. यावेळी एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी अनेक जागतिक आणि प्रादेशिक मुद्यांवर भारताची बाजू मांडली. त्यांनी यामध्ये दहशतवाद, हवामान बदल, व्यापार आणि अन्न सुरक्षा, विकास यांसारख्या विषयांवर भाताची भूमिका ठाम केली. तसेच त्यांनी पाकिस्तानच्या दहशतवादी कारवाया, पहलगाम हल्ला (Pahalgam Attack) याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.
जयशंकर यांनी सांगितले की, भारताने स्वातंत्र्यानंतर सतत दहशतवादाचा सामना केला आहे. भारताचा शेजारी देश पाकिस्तान (Pakistan) अनेक दशकांपासून दहशतवादाचा कारखाना राहिला आहे. संयुक्त राष्ट्राच्या दहशतवादाच्या यादीत त्यांच्या देशातील नागरिकांची नावे देखील आहे.
जयशंकर यांनी एप्रिलमध्ये भारताच्या जम्मू-काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यांचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, यामध्ये निरापराध पर्यटकांवर हल्ला करण्यात आला होता. यामुळेच भारताने आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलण्याचे आणि गुन्हेगारांना रोखण्यासाठी पाऊल उचलले आहे.
तसेच त्यांनी सुरक्षा परिषदेत सुधारणा करण्याचीही मागणी केली. त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या स्थायी आणि अस्थायी संदस्यसंख्येत वाढ कपुन परिषदेला अधिक बळकट बनवणे आवश्यक असल्याचे अधोरेखित केले. यासाठी भारता सर्व जबाबदाऱ्या पार पाडण्यास तयार असल्याचेही एस. जयशंकर यांनी स्पष्ट केले.
एस. जयशंकर यांनी स्पष्ट केले की, दहशतवाद आता केवळ एका देशापुरता मर्यादत राहिलेला नाही, तर याचा संपूर्ण जगाला धोका निर्माण झाला आहे. यामुळे या विरोधात जगभरातील सर्व देशांनी एकत्र येणे गरजेचे आहे. त्यांनी सांगितले की, दगशवाद हा जातीयवाद, हिंसा असहिष्णुता आणि भीती निर्माण करत आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर याला एकत्रितपणे तोंड देणे गरजेचे असल्याचे जयशंकर यांनी म्हटले.
तसेच एस. जयशंकर यांनी शेजारील देंशाना भारताने केलेल्या मदतीचाही उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, भारत नेहमी आपल्या शेजारी देशांना आर्थिक पाठबळ, अन्नधान्य, खत किंवा इंधन सुविधा पुरवतो. आणि भारत सदैव आपल्या शेजारी देशांच्या मदतीसाठी तत्पर राहिला आहे, हे स्पष्ट केले.
संयुक्त राष्ट्रात एस. जयशंकर यांनी पाकिस्तानवर काय टिका केली?
संयुक्त राष्ट्रात जयशंकर यांनी पाकिस्तानला दहशतवादाचा कारखाना म्हणून संबोधले आणि याविरोधात ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे म्हटले.
संयुक्त राष्ट्रात जयशंकर यांनी काय मागणी केली?
संयुक्त राष्ट्रात जयशंकर यांनी सुरक्षा परिषदेत सुधारण्याची आणि संयुक्त राष्ट्रातील स्थायी आणि अस्थायी देशांची सदस्य संख्या वाढवण्याची मागणी केली.
‘दहशतवादाचा गौरव थांबवा’ ; UN मध्ये पाकिस्तान पंतप्रधानांच्या ‘ढोंगीपणा’वर दिले प्रत्युत्तर