Massive fire breaks out at Iran's largest refinery one dead
तेहरान : एक मोठी बातमी समोर आली आहे. इराणच्या सर्वात मोठ्या तेल शुद्धकरण्याच्या कारखान्याला भीषण आग लागली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे देशभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. इराणी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, यामध्ये एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. बचाव पथक आणि अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. सध्या आग विझवण्याचे आणि आगीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.
तसेच इराणच्या उपसंसदाध्यक्ष अली निकजाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, तेल शुद्धकरण कारखान्यातील अनेक कर्मचारी जखमी झाले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. सध्या आग विझवण्याचे कार्य सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रिफायनरीच्या एकाच युनिटला आग लागल्यामुळे मोठे नुकसान झाले नाही. परंतु संबंधित युनिट पूर्णत: जळून खाक झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इराणमधील सर्वात मोठी आणि जुनी रिफायनरी आहे. याचे नाव अबदान ऑइल रिफायनरी आहे.
A major fire broke out at the Abadan oil refinery in Khuzestan Province.
The cause of the incident has not yet been announced.#Iran #Abadan #آبادان pic.twitter.com/8l3c35kK2d
— Farhad (@Farhadgol60) July 19, 2025
अबदान ऑइल ही इराणची सर्वा मोठी रिफायनरी आहे. ही रिफायनरी राजधानी तेहरानपासून सुमारे ६७० किलोमीटर अंतरावर आहे. १९१२ मध्ये ही रिफायनरी उभारण्यात आली होती. येथून दररोज सुमारे ५.२ दशलक्ष बॅरल कच्चा तेलावर प्रक्रिया केली जाते. हे देशाच्या एकूण तेल उत्पादनापैकी २५ टक्के आहे.
यापूर्वी देखील गेल्या आठवड्यात इराणमध्ये निवासी आणि व्यावसायिक इमारतींना आग लागल्याच्या घटना घडल्या होत्या. या घटनांसाठी गॅस गळती आणि शॉर्ट सर्किटसारख्या समस्यामुळे झाल्या असल्याचे प्रशासनाने म्हटले होते. परंतु सध्या अबदान रिफायनरीच्या आगीला अपघात मानले जात आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आली आहे. काहींना हा अपघात नसून जाणूनबुजून केलेले कृत्य असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. यामुळे इस्रायलशी अलीकडच्या संघर्षामुळे या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.
इराणची अर्थव्यवस्था पूर्णत: तेल व्यापारावर अवलंबून आहे. यामुळे देशातील अशा घटना इराणच्या अर्थव्यवस्थेसाठी धोकादाक मानल्या जात आहे. इराण हा जगातील तेल उत्पादक देशांपैकी एक आहे. या तेलाच्या उत्पन्नाचा मोठा भाग परदेशात व्यापारासाठी निर्यात केला जातो. पंरतु गेल्या काही काळातील इराणच्या तेल निर्यातीत आंतरराष्ट्रीय निर्बंधामध्ये घट झाली आहे. यामुळे इराणच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणा होत आहे.