भूकंपामुळे हादरली रशियाची जमीन; त्सुनामीचा इशाऱ्याने लोकांमध्ये घबराट, जाणून घ्या काय आहे परिस्थिती?
मॉस्को : एक मोठी बातमी समोर आली आहे. रशियाच्या पूर्व किनाऱ्यालगत भूकंपाचे एकामागून तीन झटके जाणावले आहे. तसेच तीसऱ्या भूकंपानंतर त्सुनामीचाही इशारा जारी करण्यात आला आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरलेले आहे.
मिळालेल्य माहितीनुसार, यामध्ये पहिल्या भूकंपामध्ये ५.० रिश्टर स्केल होती, तर दुसऱ्या भूकंपाची ६.७ रिश्टर स्केल तीव्रतेची होती. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. त्यानंतर पुन्हा काही वेळाने तिसऱ्या भूकंपाचा झटका बसला. याची तीव्रता ७.४ होती. अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षणाने दिलेल्या माहितीनुसार, तिसऱ्या भूकंपामुळे त्सुनामीचा इशारा जारी केला आहे. एजन्सीने धोकादायक त्सुनामीच्या लाटांची शक्यता वर्तवली आहे.
भूकंपतज्ज्ञ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, समुद्राखालील हे भूंकप झाले आहे. यामुळे आजूबाजूच्या किनारी भागांमध्ये त्सुनामीच्या लाटा येण्याती शक्यता आहे. सध्या भूरगर्भीय अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. तसेच स्थानिक प्रशासनाला सतर्कतेचा इशार जारी करण्यात आला आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या तीन्ही भूकंपाची खोली २० किलोमीटर खाली होती, तर या भूंकपाचे केंद्र पेट्रोपाव्लोव्स्क-कामचत्स्की शहराच्या पूर्वेस १४४ किलोमीटर अंतरावर होते. यूएसजीएसने पेट्रोपाव्लोव्स्क-कामचत्स्की शहराजवळच्या महासागरातील भूकंपाच्या ३०० किलोमीटर पर्यंत किनारी भागांसाठी त्सुनामीचा इशारा जारी केला आहे.
Region: Off East Coast of Kamchatka
Mag: 7.3
UTC: 2025-07-20 06:49:02
Lat: 52.74, Lon: 160.66
Dep: 16km
For more info and updates, or if you felt this earthquake, go to https://t.co/IylPBncXbO— EarthquakesGA (@EarthquakesGA) July 20, 2025
यूएसजीएसने दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीच्या भूकंपाच्या झटक्यानंतर अनेक आफ्टरशॉकचे देखील झटके बसले. यांची तीव्रता ६.७ पर्यंत होती. सध्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कामटका प्रदेशात सतत भूंकपाचे धक्के जाणवतात. हा प्रदेश द्वीपकल्प पॅसिफिक आणि उत्तर अमेरिकन टेक्टोनिक प्लेट्सचा मिनबिंदू आहे. १९०० पासून आतापर्यंत या भागात ८.३ तीव्रतेचा सर्वात मोठा भूंकप झाला आहे.
यापूर्वी देखील जूनमध्ये रशियाच्या कुरिल बेटांवर भूकंपाचा धक्का बसला होता. याची तीव्रता ६.५ रिश्टर स्केल होती, तर याचे केंद्रबिंदू जमिनीपासून १२ किलोमीटर खोलीवर होते. १३ जून रोजी ही घटना घडली. तसेच यापूर्वी जानेवरीच्या २६ ला देखील रशियाच्या कामचटका प्रदेशात पूर्व किनाऱ्याजवळ ५.५ तीव्रतेचा भूकंप झाला होता.भूकंपाचे केंद्र जमिनीपासून ५१ किमी खाली होते.
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार जमिनीखाली असलेल्या टेक्टोनिक प्लेट्स एकमेकांवर आदळतात. यामुळे, पृथ्वीच्या खाली कंपन निर्माण होतात आणि भूकंपाचे धक्के जाणवतात. याशिवाय, अण्वस्त्रांच्या चाचण्यांमुळे देखील भूकंप होण्याची शक्यता असते. परंतु हे फारसे हानिकारक नसतात.