Massive fire in the forests of South Korea government imposed emergency
सियोल: दक्षिण कोरियाच्या जंगलात भीषण आग लागली असून ही आग अनेक शहरांमध्ये पसरली आहे. यामुळे सरकारने आणीबाणी जाहीर केली आहे. आग इतक्या प्रचंड वेगाने पसरत आहे की यामुळे अनेक लोक प्रभावित झाले आहेत. लाखो लोकांना आपले घर सोडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे लागले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या आगीमुळे उत्तर आणि दक्षिण ग्योंगसांग प्रांतात आणि इॉउल्सान शहरात सर्वाधिक नुकसान झाले आहे.
दक्षिण कोरियाच्या वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बुसान आणि डेजिओन सारख्या प्रमुख शहरांमध्ये भीषण आगीचा इशारा जारी केला आहे. अल्सान आणि बुसानला जोडणारा महामार्ग देखील बंद करण्यात आला आहे. दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या भीषण आगीमध्ये अग्निशमन दलाच्या तीन कर्मचाऱ्यांचा आणि एका सरकारी कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू झाला आहे. वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने आग विझवणे अग्निशमन दलाला कठीण जात आहे. आगीमुळं सपूर्ण जगल परिसर जळून खाक झाले आहे.
दक्षिण कोरियाच्या न विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सांचेओंगमध्ये सर्वात भीषण आग लागली आहे. सांचेओंग हा ग्रामीण भाग असून या भागातील 260 लोकांनी घरे सोडून तात्पुरत्या छावण्यांमध्ये स्थलांतर केले आहे. शुक्रवारी 21 मार्च रोजी ही आग लागली. त्यानतर ही आग प्रचड पसरली. शनिवारी (22 मार्च) संध्याकाळ पर्यंत या आगीमुळे 500 हेक्टपेक्षा क्षेत्र प्रभावित झाले होते. उत्तर ग्योगसांग प्रांतातील युसेओंगच्या 400 हून अधिका लोकांना त्यांचे घर सोडून जावे लागले. युसेओगमध्ये 300 हेक्टर क्षेत्र आगीमुळे जळून खाक झाले आहे. तसेच गिम्हे शहरातही आगीचा दणका बसला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, आग विझवण्यासाठी सरकारने 1600 कर्मचारी 35 हेलिकॉप्टर आणि अनेक अग्निशमन गाड्या तैनात केल्या आहेत. हंगामी अध्यक्ष चोई संग-मोक यांनी अधिकाऱ्यांना आग विझवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आदेश दिले आहेत. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यांनुसार, अनेक महामार्ग बंद करण्यात आल्याने लोकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यास अडचणी येत आहे. तसेच लोकाना अन्न पाणी पुरवले जात आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार. जोरदार वाऱ्यामुळे आग वेगाने पसरत आहे. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना आग विझवणे कठीण जात आहे. आपात्कालीन पथके परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. आगीमुळे प्रचंड धुर पसरला असून प्रदुषणाची पातळी वाढली आहे. यामुळे लोकांचा श्वास घेण्यास त्रास होत आह. सरकारेन लोकांना मास्क घालण्याचा आणी सुरक्षित ठिकाणी राहण्याचा सल्ला दिला आहे.
या वर्षी जानेवारीत अमेरिकेच्या लॉस एंजेलिसच्या जगलातही भीषण आग लागली होती. या आगीमुळे LA काऊंटी जळून पूर्ण खाक झाले होते. आगीमुळे 1 लाख 1 हजाराहूंन अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवावे लागले होते. आगीमुळे 2 हजाराहून अधिक इमारती जळून खाक झाल्या होत्या. अंदजे 52 अब्ज अमेरिकन डॉलर्सचे नुकसान झाले आहे.