Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Meta ची मोठी कारवाई! ऑस्ट्रेलियात १६ वर्षाखालील मुलांचे Instagram-Facebook अकाउंट करणार ब्लॉक

Social Media Ban : ऑस्ट्रेलियामध्ये सोशल मीडिया वापरावर बंदी लागू करण्यात आली आहे. १६ वर्षाखालील मुलांसाठी ही बंदी १० डिसेंबर पासून लागू होणार आहे. याच्या कायदेशीर अमंलबजावणीसाठी सध्या ऑस्ट्रेलियात हालचाली सुरु आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 21, 2025 | 01:12 AM
Meta to remove Instagram-Facebook accounts of under 16 children's from Australia

Meta to remove Instagram-Facebook accounts of under 16 children's from Australia

Follow Us
Close
Follow Us:

  • ऑस्ट्रेलियात १६ वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर बंदी
  • मेटाही लवकरच सर्व युजर्सचे अकाऊंंट करणार ब्लॉक
  • मुलांच्या सुरक्षिततेसाठी घेण्यात आला निर्णय
 

Australia Social Media Ban : कॅनबेरा : ऑस्ट्रेलियात (Australia) १० डिसेंबरपासून २०२५ पासून १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर वापरावर बंदी लागू होणार आहे. मुलांच्या मानसिक आणि शारिरीक आरोग्यासाठी, तसेच मुलांचा सोशल मिडिया वापराचा अतिरेक टाळण्यासाठी ऑस्ट्रेलियन सरकारने हा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर मेटाने देखील ऑस्ट्रेलिया सरकारसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे.

Social Media Ban : आता १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरावर बंदी; डिसेंबरपासून लागू होणार नवा कायदा

मेटाची कारवाई

ऑस्ट्रेलिया सरकारने सर्व सोशल मिडिया प्लॅटफॉर्म्सला लहान मुलांचे अकाउंट सोशल मीडियावर हटवण्यासाठी आदेश दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर मेटाने एक मोठा निर्णय घेतला आहे. मेटा ऑस्ट्रेलियन सरकारचा नियम लागू होण्यापूर्वीच १६ वर्षाखालील सर्व मुलांचे सोशल मिडिया अकाऊंट्स ब्लॉक करणार आहे. मेटा ही इन्स्टाग्राम आणि फेसबुकची पॅरेंट कंपनी आहे. यामुळे ऑस्ट्रेलियातील सर्व मुलांचे इन्स्टाग्राम आणि फेसबुक अकाऊंट्स सोशल मीडियावरुन काढून टाकले जाणार आहेत. मेटाच्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियात सध्या ३,५०,००० इन्स्टाग्राम युजर्स आणि १,५०,०० फेसबुक युजर्स आहेत. हे सर्व १३ ते १५ वयोगटातील आहेत. मेटाने सांगितले आहे की, लवकरच सर्व युजर्सचे अकाऊंट लॉक केले जातील.

ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांची प्रतिक्रिया

यावर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी म्हटले होते की, देशातील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी आणि विकासचे रक्षण करण्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. यामुळे ऑस्ट्रेलियात २०२५ नंतर १६ वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर बंदी असेल.

ऑस्ट्रेलियन सरकारने सोशल मिडिया प्लॅटफॉर्म्सला १६ वर्षाखालील मुलांचे अकाउंट्स सिस्टममधून काढून टाकण्यास सांगितले आहेत. या नव्या कायद्यानुसार, कायदा लागू झाल्यानंतर सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सला ही बंदी कशी लागू ठेवायची यासाठी एक वर्षाची मुदत देण्यात आली आहे. असे न केल्यास कंपन्यांवर ४९.५ दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर्सचा दंड भरावा लागणार आहे.

ऑस्ट्रेलियात तरुणांकडून चिंता व्यक्त

सध्या ऑस्ट्रेलियाच्या या निर्णयामुळे देशातील तरुण आणि काही वकिलांनी यावर चिंता व्यक्त केली आहे. यामध्ये पत्रकार, युवा वृत्तसेवा ६ न्यूज ऑस्ट्रेलियाचे संस्थापक १८ वर्षीय लिओ पुगलिसी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, याचे काही गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे. या बंदीचा मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होण्याची भीती ऑस्ट्रेलियात व्यक्त केली जात आहे. तसेच विरोधकांकडून या निर्णयावर तीव्र टीकाही केली जात आहे.

Social Media Ban : 40 लाख अकाउंट्स निष्क्रिय; ऑस्ट्रेलियात सोशल मीडियावर जगातील पहिली कठोर कारवाई

💡

Frequently Asked Questions

  • Que: ऑस्ट्रेलियात सोशल मीडियावर का व कोणासाठी बंदी लागू करण्यात आली आहे?

    Ans: ऑस्ट्रेलियात सोशल मीडियावर १६ वर्षाखालील मुलांनासाठी सोशल मीडियावर बंदी लागू करण्यात आली. लहान मुलांना लागलेली सोशल मीडिया अतिवापराची सवय मोडण्यासाठी, मुलांच्या मानसिक व शारिरीक आरोग्यासाठी हा निर्णय घेण्यात आहे.

  • Que: ऑस्ट्रेलियात कोणत्या प्लॅटफॉर्मवर घालण्यात येणार आहे बंदी?

    Ans: ऑस्ट्रेलियात इन्स्टाग्राम, फेसबुक, थ्रेड्स, टिकटॉक, स्नॅपचॅट, रेडिट, एक्स, यू-ट्यूब यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वापरावर १६ वर्षाखालील मुलांना बंदी घालण्यात आली आहे.

  • Que: ऑस्ट्रेलियात कधीपासून लागू होणार सोशल मीडियावरील बंदी?

    Ans: ऑस्ट्रेलियात १० डिसेंबर २०२५ पासून १६ वर्षाखालील मुलांसाठी बंदी लागू होणार आहे.

  • Que: मेटाने ऑस्ट्रेलियन सरकारसाठी काय निर्णय घेतला आहे?

    Ans: मेटा ४ डिसेंबर ते १० डिसेंबरपर्यंत ऑस्ट्रेलियातील १६ वर्षाखालील मुलांचे सोशल मीडिया अकाउंट्स ब्लॉक करणार आहे.

Web Title: Meta to remove instagram facebook accounts of under 16 childrens from australia

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2025 | 12:36 AM

Topics:  

  • Australia
  • Social Media
  • World news

संबंधित बातम्या

चूक इराणची शिक्षा भोगणार अमेरिका; भरावा लागणार तब्बल ६ अब्जांचा दंड, प्रकरण काय?
1

चूक इराणची शिक्षा भोगणार अमेरिका; भरावा लागणार तब्बल ६ अब्जांचा दंड, प्रकरण काय?

अमेरिकेच्या विरोधाला भारताकडून कचऱ्याची टोपली? दक्षिण आफ्रिकेतील G-20 मध्ये PM मोदी राहणार उपस्थित
2

अमेरिकेच्या विरोधाला भारताकडून कचऱ्याची टोपली? दक्षिण आफ्रिकेतील G-20 मध्ये PM मोदी राहणार उपस्थित

नेपाळमध्ये पुन्हा हिंसाचाराचा भडका! Gen Z आणि UML च्या कार्यकत्यांमध्ये वाद, कर्फ्यू लागू
3

नेपाळमध्ये पुन्हा हिंसाचाराचा भडका! Gen Z आणि UML च्या कार्यकत्यांमध्ये वाद, कर्फ्यू लागू

नोकरीच्या नावाखाली माानवी तस्करीचं जाळं उघड; म्यानमारमधून १२५ भारतीयांची सुटका
4

नोकरीच्या नावाखाली माानवी तस्करीचं जाळं उघड; म्यानमारमधून १२५ भारतीयांची सुटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.