MH17 crash mystery solved after 11 years European Court finds Russia guilty
Russia recruits Indian workers 2025 : जगाला हादरवणाऱ्या MH17 विमान दुर्घटनेबाबत अखेर न्याय झाला आहे. युरोपातील सर्वोच्च मानवाधिकार न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय देत रशियाला या दुर्घटनेस जबाबदार ठरवले आहे. १७ जुलै २०१४ रोजी मलेशियन एअरलाइन्सचं MH17 हे बोईंग 777 विमान पूर्व युक्रेनमध्ये क्रॅश झालं होतं, ज्यात एकूण २९८ निरपराध प्रवाशांचा मृत्यू झाला होता.या घटनेमुळे जगभरात संतापाची लाट उसळली होती. पण तब्बल ११ वर्षांनंतर युरोपियन मानवाधिकार न्यायालयाने स्पष्ट शब्दांत रशियावर बोट ठेवत म्हटलं की, “या हल्ल्याची जबाबदारी थेट मॉस्कोवर आहे.”
न्यायालयाच्या अध्यक्ष मतियास गायोमर यांनी सांगितले की, “पुरावे दर्शवतात की MH17 विमानावर जाणूनबुजून क्षेपणास्त्र डागण्यात आलं होतं. कदाचित ते लष्करी विमान असल्याच्या गैरसमजातून झालं असेल, परंतु रशियन सैन्य किंवा त्यांच्या समर्थकांनी केलेली ही कारवाई आंतरराष्ट्रीय कायद्याचा थेट अपमान आहे.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : बेरोजगारांसाठी सुवर्ण संधी! 2025 मध्ये 10 लाख भारतीय कामगारांना बोलावत आहे ‘हा’ देश
त्यानुसार, रशियाने लष्करी लक्ष्यांची अचूक ओळख पटवण्यासाठी कोणतेही उपाय केले नाहीत, ज्यामुळे कायद्याच्या नियमांचं उल्लंघन झालं. न्यायालयाने ही कृती बेकायदेशीर ठरवत, खून, छळ, नागरी पायाभूत सुविधा उद्ध्वस्त करणे या गंभीर गुन्ह्यांबाबतही रशियाला दोषी ठरवलं आहे.
या दुर्घटनेत १७ देशांचे नागरिक बळी पडले होते. त्यात सर्वाधिक १९८ डच नागरिक, तसेच ४३ मलेशियन, ३८ ऑस्ट्रेलियन आणि १० ब्रिटिश नागरिकांचा समावेश होता. ही घटना संपूर्ण युरोपासाठी आणि जागतिक मानवतेसाठी एक शोकांतिका ठरली होती.युक्रेन व नेदरलँड्स यांनी न्यायालयात दाखल केलेल्या चार खटल्यांच्या निकालातून हे सत्य स्पष्ट झालं. युक्रेनने या निर्णयाचे स्वागत करत त्याला “ऐतिहासिक आणि अभूतपूर्व” असा दर्जा दिला, तर रशियाने नेहमीप्रमाणे याला “प्रतीकात्मक निर्णय” ठरवत नाकारले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : राफेलवर नजर ठेवणारे चिनी हेर जगभर सक्रिय! ग्रीस, युक्रेन आणि इटलीत उघड झाला गुप्त कट
या प्रकरणात न्यायालयाने रशियावर आर्थिक भरपाई लादण्याचाही विचार व्यक्त केला आहे, मात्र मॉस्कोने अद्याप त्या दिशेने कोणतेही सकारात्मक संकेत दिलेले नाहीत. उलट, रशियाने या निर्णयाकडे पूर्णतः दुर्लक्ष केलं आहे.MH17 प्रकरण हे केवळ विमान अपघात नव्हतं, तर मानवतेविरुद्धचा गुन्हा होता. आज ११ वर्षांनी न्यायालयाच्या या निकालामुळे पीडित कुटुंबियांना थोडाफार न्याय मिळाल्याचं समाधान मिळालं आहे.