US Iran War : ट्रम्प यांची धमकी अन् इराणचा पलटवार; कुवैत, सौदीमध्ये भीषण हल्ले, १५ अमेरिकन सैनिक जखमी (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Donald Trump यांची पुन्हा तीच तुतारी; भारत-पाकिस्तान तणावात ‘तारणहार’ असल्याचा पुनरुच्चार
कुवैतमध्ये अमेरिकन सैनिकांवर हल्ला : मिळालेल्या माहितीनुसार, इराणने कुवैतमधील अमेरिकेच्या हवाई लष्करी तळ अली अल सलेमला लक्ष्य केले आहे. या हल्ल्यात इराण(Iran) ने ड्रोनचा वापर केला असून यामध्ये १५ अमेरिकन सैनिक जखमी असल्याचे वृत्त आहे. ही इराणची थेट कारवाई मानली जात आहे.
सौदी अरेबियावर हल्ला : सौदी अरेबिया(Saudi Arabia) च्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, इराणने पूर्वेकडील भागात बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागली आहे. परंतु सर्व क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट करण्यात आली आहेत. परंतु यांचा ढिगारा उर्जा प्रकल्पांजवल पडला असून मोठ्या नुकसानीची शक्यता वर्तवली जात आहे.
इस्रायलवरील प्रहार : इराणने केवळ अमेरिकेवरच नाही, तर इस्रायलवरही क्षेपणास्त्रे डागली आहे. युद्धाची तीव्रता वाढवून इराणने आपल्या युद्धनीतत बदल केला आहे. इराण अमेरिका-इस्रायल(Israel) ला चारीबाजूंनी अडकवत आहे. सततच्या हल्ल्यामुळे परिस्थिती अत्यंत बिकट आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी (०६ एप्रिल २०२६) इराणला ४८ तासांचा अल्टीमेटम दिला होता. त्यांनी इराणला वाटाघाटीच्या अटी मान्य करुन शांतता करार करण्यास सांगितले. तसेच त्यांनी होर्मुझ खुला करण्याचा आदेशही दिला. असे न केल्यास इराणच्या नागरी पायाभूत सुविधा आणि वीज प्रकल्पांवर हल्ल्याची धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. यानंतर इराणने आक्रमक पवित्रा घेत अमेरिका-इस्रायलवर हल्ले चढवले आहेत.
🇮🇷 ❌ 🇺🇸 🤝🏾 🇰🇼: BREAKING: Approximately 15 American soldiers have been reported injured in the wake of an Iranian drone offensive at the Ali Al Salem Air Base located in Kuwait. For instant, unbiased, uncensored global conflict news, join this channel: https://t.co/elVKdMtzjX pic.twitter.com/F5zsP5u8SB — Jingo Journal (@JingoJournal) April 7, 2026
Ans: ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणने आक्रमक होत अमेरिकेच्या अरब देशांतील लष्करी तळांवर हल्ले सुरु केले आहेत. तसेच इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा सातत्याने प्रहार सुरुच आहे.
Ans: इराणने कुवैतमधील अमेरिकेच्या हवाई लष्करी तळ अली अल सलेमला लक्ष्य केले आहे.
Ans: सौदीच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, इराणने पूर्वेकडील भागात बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागली होती, परंतु ती हवेतच नष्ट करण्यात आली आहेत.






