US Iran War : 'विनाशकारी हल्ल्यासाठी तयार रहा' ; माजी मंत्र्यावर हल्ल्यानंतर इराणच्या लष्कराचा अमेरिका-इस्रायलला मोठा इशारा
इराणच्या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी(०१ एप्रिल) कमाल खराझी यांच्या राजधानी तेरहानमधील निवास्थानाला लक्ष करण्यात आले होते. या हल्ल्यात कमाल खराझी यांनी गंभीर दुखापत झाले असून सध्या त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे. परंतु या हल्ल्यात खराझी यांच्या पत्नीचा जागीच मृत्यू धाल आहे. इराणने याला लक्ष्यित हत्याकांडाचा प्रकार संबोधले आहे.
याशिवाय इराणच्या इस्फाहन, शिराध यांसारख्या अनेक शहरांमध्येही हवाई हल्ले झाले आहे. इराणच्या दक्षिणेकडे लारिस्तानमध्ये झालेल्या हल्ल्यात चार जणांच्या मृत्यूची नोंद आहे. सध्या या हल्ल्यांमुळे परिस्थिती अधिक बिकट होत चालली आहे. इराण (Iran) अधिक आक्रमक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ट्रम्प यांच्या युद्धबंदीच्या दाव्यादरम्यान झालेल्या या हल्ल्यांमुळे संशय व्यक्त केला जात आहे. या हल्ल्यानंतर इराणी लष्कराने अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. इराणच्या लष्कराचे प्रवक्ते इब्राहिम झोल्फघारी यांनी स्पष्ट केले आहे की, अमेरिका-इस्रायलला याचा पाश्चाताप होईल. त्यांनी हल्ल्यांसाठी तयार रहावे असे म्हटले आहे. प्रतिशोध अत्यंत विनाशकारी आणि व्यापक स्वरुपात असेल असे इराणच्या लष्कराने स्पष्ट केले आहे.
कमाल खराझ हे इराणच्या राजकारणाती अत्यंत प्रभावशाली व्यक्तीमत्त्व मानले जातात. तसेच त्यांना इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या जवळचे सल्लागार म्हणूनही ओखळले जायचे.
Kamal Kharrazi, Iran’s former foreign minister and a senior adviser to former Supreme Leader, has reportedly been severely injured in a US-Israeli attack on his home. Iranian media say his wife was killed. pic.twitter.com/O5p17ontnv — Iran’s Today (@Iran) April 1, 2026
Ans: इराणच्या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी(०१ एप्रिल) इराणचे माजी परराष्ट्र मंत्री आणि धोरणात्मक सल्लागार कमाल खराझी यांच्या राजधानी तेरहानमधील निवास्थानावर हल्ला झाला आहे.
Ans: माजी मंत्र्याच्या निवासस्थानवरील हल्ल्यानंतप इराणच्या लष्कराने आक्रमक भूमिका घेतली आहे. याचा अमेरिका-इस्रायलला पश्चाताप होईल असे म्हटले आहे.






