Middle East Tension : होर्मुझची सामुद्रधुनी आता 'स्ट्रेट ऑफ ट्रम्प'? ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ; सौदी प्रिन्सवरही थेट वार (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
ट्रम्प यांनी सौदी अरेबियाच्या प्रिन्सवर भाष्य करताना म्हटले की, सौदीच्या नेत्यांनी सुरुवातील अमेरिकेच्या ताकदीला कमी लेखले होते. आता मात्र अमेरिका मजबूत झाली आहे. परिस्थिती बदलली आहे. यामुळे त्यांना आता माझ्याशी नीट वागावे लागत आहे, असे मिश्कीलपणे म्हटले.
त्यांनी कार्यक्रमातील पाहुण्यांना आवाहन केले की सौदीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांना माझ्याशी नीट वागण्यास सांगा. अमेरिका आता जागतिक शक्तीशाली देश बनला आहे. तसेच त्यांनी सौदी अरेबियाला अब्राहम करारात सामील होण्याचे आवाहन केले.
याच वेळी ट्रम्प यांनी कार्यक्रमात बोलताना स्ट्रेट ऑफ होर्मुझ (Strait Of Hormuz) ला ट्रम्प ऑफ होर्मुझ संबोधले आणि नंतर चुकून म्हटले असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी आपली चूक सुधारत माफीही मागितली. त्यांच्या या विधानाने मात्र जगभरात खळबळ उडाली आहे. सध्या इराणने प्रतिशोध म्हणून होर्मुझ खाडी बंद केली आहे. ज्याचा मोठा फटका जगाला बसत आहे.
याच भाषणादरम्यान ट्रम्प यांनी इराण(Iran)बाबत पुन्हा तेच आणि धक्कादायक दावे केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, इराणमध्ये सध्या कोणतेही नेतृत्व नाही. मोजतबा खामेनेई हल्ल्यात गंभीर जखमी झाले असतील किंवा त्यांचा मृत्यू झाला असेल, असा दावा केला. ट्रम्प यांच्या मते, इराणची लष्करी शक्ती देखील आता कमकुवत झाली आहे. याशिवाय त्यांनी इराणशी सकारात्मक शांतता चर्चा सुरु असल्याचाही दावा केला.
याच वेळी ट्रम्प यांनी नाटो संघटनेवरही टीका केली. त्यांनी म्हटले की नाटोने अमेरिकेच्या मदतीने त्यांचे संरक्षण करुन घेतले. परंतु अमेरिकेला गरज असताना माघार घेतली. हे अमेरिका लक्षात ठेवले असे त्यांनी म्हटले.
🚨🇸🇦🇺🇸 BREAKING — Trump about MBS: “He didn’t think he would be kissing my ass, he really didn’t…he better be nice to me..” Trump is humiliating his Saudi Puppet pic.twitter.com/T3zJypdxAO — ✦✦✦ 𝙿𝚊𝚖𝚙𝚑𝚕𝚎𝚝𝚜 ✦✦✦ (@PamphletsY) March 28, 2026
Ans: ट्रम्प यांनी सौदी प्रिन्सवर नाराजी व्यक्त करत, सौदीच्या नेत्यांनी मला कमी लेखले होते. मात्र आता अमेरिका मजबूत असून त्यांनी माझ्याशी योग्य प्रकारे वागावे असे म्हटले आहे.
Ans: ट्रम्प यांनी दावा केला आहे की, इराण सध्या कमकुवत स्थिती असून त्यांचे नेतृत्तव संकटात आहे. मोजतबा खामेनेऊ यांची प्रकृती गंभीर किंवा त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता ट्रम्प यांनी व्यक्त केली आहे.
Ans: ट्रम्प यांनी विनोदात्मक शैलीत स्ट्रेट ऑफ होर्मुझला स्ट्रेट ऑफ ट्रम्प म्हटले असून हे लगेचच चूक असल्याचे स्पष्ट केले आहे.






