Middle East War : इराक हादरलं! बगदाद विमानतळानंतर आता गुप्तचर मुख्यालवर इराणची स्ट्राईक, एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा मृत्यू (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
इराकच्या सुरक्षा यंत्रणेचे प्रमुख जनरल साद मान यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (२१ मार्च) सकाळी हा हल्ला झाला आहे. या हल्ल्यात गुप्तचर मुख्यालयाच्या कम्युनिकेशम बिल्डिंगला लक्ष्य करण्यात आले. ही इमारते इराकच्या सुरक्षे यंत्रणा असलेल्या अमेरिकन सल्लागारांशी संबंधित आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली असून इराणने हल्ला केला असल्याचे म्हटले जात आहे. मात्र अद्याप यावर अधिक तपशील समोर आलेले नाहीत.
याच वेळी एक ड्रोन एका खासगी स्पोर्ट्स क्लबमध्ये कोसळला आहे. हे क्लब इराकच्या उच्चस्तरीय आणि परदेशी राजनैतिक अधिकाऱ्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय मानले जाते. यामुळे हा हल्ला अधिक गांभीर्याने घेतला जात आहेे.
या हल्ल्याच्या काही तास आधीच शुक्रवारी(२० मार्च) रात्री उशिरा बगदादमधील आंतरराष्ट्रीय विमानतळावरील अमेरिकन लष्करी तळावर हल्ला करण्यात आला होता. इराकमधील अमेरिकन हितसंबंधावर सातत्याने होत असलेल्या हल्ल्यांमुळे मोठी खळबळ उडाली असून भीषण संघर्षाचे संकेत मिळत आहेत.
२८ फेब्रुवारी २०२६ रोजी सुरु झालेल्या संघर्षा आतापर्यंत अनेख आखाती देश ओढले गेले आहेत. आज युद्धाचा २२ वा दिवस आहे. परंतु हा संघर्ष काही थांबण्याचे नाव घेईना. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई आणि अनेक लष्करी व सरकारी अधिकाऱ्यांच्या मृत्यूने इराण चवताळला आहे.
याच वेळी दुसरीकडे भारत आणि मॉरिशसच्या दक्षिणेला असलेल्या अमेरिकन लष्करी तळ ‘डिएगो गार्सिया’ लाही लक्ष्य करण्यात आले आहे. हा लष्करी तळ अमेरिका आणि ब्रिटनचा संयुक्त लष्करी तळ असून अत्यंत सुरक्षित मानला जातो. मात्र इराणने या तळांवर दोन मध्यम पल्ल्याची बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली आहेत. हा हल्ला अमेरिकेच्या ‘अभेद्य’ संरक्षणाला मोठा तडा मानला आहे.
याच वेळी अणेरिका-इस्रायलली इराणच्या कारवाईला प्रत्युत्तर देत आहे. दावा केला जात आहे की, इराणचा सर्वात महत्त्वाचे अणु केंद्र नतान्झवर हल्ले करण्यात आले आहे. यामुळे जगभरात मोठा गोंधळ उडाला आहे. जगावर अणु युद्धाचा धोका निर्माण झाला आहे.
Ans: बगदादमध्ये मंसूर भागात इराकच्या राष्ट्रीय गुप्तचर मुख्यालयावर ड्रोन हल्ला करण्यता आला आहे. यामध्ये एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे.
Ans: मध्यपूर्वेत अमेरिका-इस्रायल आणि इराणमध्ये सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराकमध्ये हल्ला झाला असल्याचे मानले जात आहे.
Ans: यापूर्वी इराकच्या राजधानी बगदाद येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ अमेरिकन तळांवर ड्रोन हल्ला झाला होता.






