Russia Ukraine War : इराण युद्धाचा फायदा घेत आहे रशिया? युक्रेनमध्ये नरसंहार सुरुच; 'या' महत्त्वाच्या शहरावर थरारक हल्ला (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मिळालेल्या माहितीनुसार, रशियाने शनिवारी (२१ मार्च २०२६) युक्रेनच्या झापोरिझ्झिया शहरावर ड्रोन हल्ले केले आहे. या ड्रोनने शहरातील एक खाजगी निवासी इमारतीला लक्ष्य केले आहे. या हल्ल्यात एका जोडप्याचा मृत्यू झाला आहे. तर दोन लहान मुले जखमी झाले आहेत. हा हल्ला अशा वेळी करण्यात आला आहे, जेव्हा इराण संघर्षामुळे जगाचे लक्ष्य मध्यपूर्वेकडे आहे. तसेच अमेरिकेने अचूक मारा करणारी शस्त्रे, पॅट्रियट इंटरसेप्टर मध्यपूर्वेच्या दिशेने वळवली आहेत. तसेच युक्रेनला दिल्या जाणाऱ्या शस्त्रास्त्रांचा पुरवठाही थांबला आहे. ज्याचा रशियाविरुद्धच्या युद्धात वापर होणार होता. यामुळे युक्रेनची संरक्षण क्षमता कमकुवत झाली असून रशियाचे हल्ले रोखणे कठीण जात आहे.
शिवाय युक्रेन सध्या मोठ्या आर्थिक संकटातही सापडला आहे. युरोपियन युनियनकडून असलेले अपेक्षित कर्ज अद्याप युक्रेनला मिळाले नाही. तर दुसरीकडे रशियन तेल निर्यातीवरील सवलतींमुळे व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) यांना आर्थिक बळ मिळत आहे. ज्यामुळे युक्रेनची चारी बाजूंनी कोंडी होत आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्सकी (Volodymir Zelensky) यांनी रशियाचे आक्रमण थांबवण्यासाठी अमेरिकेच्या मध्यस्थीने पुन्हा शांतता चर्चा सुरु करण्याचे आव्हान केले आहे. यासाठी युक्रेनचे एक शिष्टमंडळ अमेरिकेला रवाना झाला आहे. झेलेन्स्की यांचा उद्देश नाटो आणि अमेरिकेकडून युक्रेनसाठी शस्त्र खरेदीची परवानगी घेणे आहे.
सध्या रशियन सैन्याने इराण युद्धाचा फायदा घेत युक्रेनच्या एकूण भूभागापैकी २० टक्के प्रदेशावर ताबा मिळवला आहे. नव्या शांतता चर्चेस रशियाने सहमती दिली आहे. परंतु इराण युद्धामुळे ही चर्चा लांबल्याने इकडे युक्रेनवर हल्ले सुरुच आहेत. यामुळे रशिया युक्रेन युद्ध (Russia Ukraine War) दिवसेंदिवस हिंसक होत चालले आहे.
Ans: रशियाने युक्रेनच्या झापोरिझ्झिया या सर्वात महत्त्वाच्या शहरावर हल्ला केला आहे.
Ans: नुकतेच रशियाने युक्रेनच्या झापोरिझ्झिया शहरावर हल्ला केला असून यामध्ये २ जण जागीच ठार झाले आहेत, तर अनेकजण जखमी झाले आहे.
Ans: झापोरिझ्झिया हे युक्रेनचे सर्वात महत्त्वाचे अणुउर्जा केंद्र आहे. या केंद्राचा काहीसा भाग रशियाच्या ताब्यात असून पूर्ण भागावर नियंत्रण मिळवल्यास युक्रेनवर उर्जा संकेट निर्माण होऊ शकते.






