Middle East War : इराणची खतरनाक खेळी! हुथी दहशतवाद्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून साधला मोठा डाव, लाल समुद्रही होणार बंद? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
बाब अल-मंडेबला अरबी भाषेत अश्रूंचे प्रवेशद्वार (Gate Of Tears) म्हणजे म्हटले जाते. हा मार्ग लाल समुद्र आणि हिंद महासागराशी जोडणार एकमेव २९ किलोमीटरचा रुंद मार्ग आहे. स्वेज कालव्यातून जाणाऱ्या प्रत्येक जहाजानां या मार्गावरुन जाताना येमेनचे हूती बंडखोरांच्या हल्ल्यांना सामोर जावे लागते. आता हा मार्ग बंद झाल्यास आशिया आणि युरोपमधील व्यापाराला मोठा फटका बसण्याची भिती निर्माण झाली आहे.
येमेनेमधील हूथी बंडखोरांच्या धमकीनंतर जागतिक स्तरावर तेल बाजारात खळबळ उडाली आहे. यामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यात निर्माण झाली आहे. जागतिक उर्जा बाजारातील आकडेवारीलनुसार, लाल समुद्रातून दररोज सुमारे ८.८ दशलक्ष बॅरल कच्च्या तेलाची वाहतूक होते. बाब अल-मंडेबलाचा मार्ग पूर्णपणे बंद झाल्यास कच्चा तेलाच्या किमती १०० ते ११० डॉलर्स प्रति बॅरलपर्यंत पोहचू शकतो. यामुळे जगभरात इंधन दरावाढीचा नवा उच्चांक गाठण्याची शक्यता आहे.
हूथींचे नेते अब्दुल मलिक अल-हूती यांची ही धमकी इराणच्या ‘थ्री-स्टेज’ रणनीतीचा भाग असल्याचे मानले जात आहे. याचा उद्देश पाश्चिमात्य देशांची आर्थिक कोंडी करणे आहे. इराणने हूथींद्वारे हा डाव साधला असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे जागतिक स्तरावर गंभीर चिंता निर्माण झाली आहे. होर्मुझ आणि बाब अल-मंडेब बंद झाल्यास इतिहासातील सर्वात मोठे आर्थिक संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.
याच वेळी मध्यपूर्वेत अजूनही अस्थिरता पसरली आहे. आज युद्धाचा १६ वा दिवस असून अमेरिका-इराणचे हल्ले सुरुच आहेत. या युद्धामुळे मध्यपूर्वेतील सामान्य लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. २००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून यातील बहुतांश नागरिक इराणी असल्याचे वृत्त आहे.
Ans: येमेनमधील हूथी बंडखोरांनी 'बाब अल-मंडेब' हा समुद्री मार्ग बंद करण्याची धमकी दिली आहे.
Ans: येमेनमधील बाब अल-मंडेब हा मार्ग लाल समुद्र आणि हिंद महासागर यांना जोडणारा महत्त्वाचा समुद्री मार्ग आहे. आशिया आणि युरोपमधील व्यापारासाठी हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग मानला जातो.
Ans: हा मार्ग बंद झाला तर जागतिक तेल आणि गॅस पुरवठ्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. यामुळे कच्च्या तेलाच्या किंमती वाढू शकतात आणि जागतिक व्यापार व पुरवठा साखळी विस्कळीत होऊ शकते.






