Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran War : जगावर पुन्हा महागाईचं सावट? ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणने Strait of Hormuz बाबत घेतला मोठा निर्णय

US Iran War Update : मध्यपूर्वेतील तणाव आता अधिक वाढण्याची शक्यता आहे. यामुळे जागतिक स्तरावर पुन्हा महागाईचे सावट निर्माण झाले आहे. युद्धबंदीनंतरही होर्मुझ पुन्हा पहिल्यासारखा होणार नाही असे इराणने स्पष्ट केले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 06, 2026 | 02:37 PM
Iran’s Big Move on Strait of Hormuz After Donald Trump Threats

Iran’s Big Move on Strait of Hormuz After Donald Trump Threats

Follow Us
Follow Us:
  • अमेरिका इराण तणाव शिगेला
  • युद्धबंदीनंतरही होर्मुझ बंदच राहणार
  • IRGC चा मोठा इशारा
US Iran War News in Marathi : वॉशिंग्टन/तेहरान : मध्यपूर्वेतील अमेरिका इराण तणाव (US Iran Conflict) आता विकोपाला पोहोचला आहे. होर्मुझ स्ट्रेटवरुन सुरु असलेला वाद जागतिक स्तरावर चिंतेचे कारण बनत आहे. ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणने अधिकच आक्रमक भूमिका घेतली आहे. इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने युद्धबंदीनंतरही होर्मुझ बंद राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे जगावर पुन्हा एकदा महागाईचे सावट उभे राहिले आहे.

World War 3 : दोनतोंडी ट्रम्प! हल्ल्याची वेळ जाहीर करून म्हटले इराणसोबत होणार आज करार; संपूर्ण जगात वाढवला संभ्रम

ट्रम्प यांचा इराणला अल्टीमेटम

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणला मंगळवार(०७ एप्रिल २०२६)पर्यंत ८ वाजेपर्यंतचा ४८ तासांचा वेळ दिला आहे. यावेळी इराणला अमेरिकेशी वाटाघाटी करुन कारावर स्वाक्षरी करायची आहे. तसेच त्यांना होर्मुझचा मार्ग खुला करण्याचे आवाहनही केले आहे. इराणने असे न केल्यास त्यांच्या नागरी पायाभूत सुविधा आणि उर्जा प्रकल्पांवर हल्ल्याची धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ट्रम्प यांनी इराणला शिवीगाळही केला आहे. यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे.

इराणची प्रतिहल्ल्याची धमकी

मात्र इराणने ट्रम्प यांच्या धमकीला न जुमानता कडक शब्दात उत्तर दिले आहे. त्यांच्या नागरी पायाभूत सुविधांवर हल्ले केल्यास होर्मुझवरील नाकेबंदी आणखी कडक केली जाईल असे म्हटले आहे. याशिवाय इराणने विनाशकारी प्रतिहल्ल्याची धमकी दिली आहे. तसेच अरब देशांमध्येही उर्जा सुविधांवर हल्ल्यांची धमकी इराणने दिली आहे. याशिवाय इराणनवे गल्फ ऑर्डर प्लॅन तयार केल्याचे सांगितले जात आहे. याअंतर्गत इराणने होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांवर टोल आकारण्यास सुरुवात केली आहे. तर इस्रायल-अमेरिकेसाठी हा मार्ग पूर्णपणे बंद केला आहे.

जागतिक परिणाम

इराणच्या या भूमिकेमुळे जागतिक इंधन पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे जागतिक बाजारात कच्चा तेलाच्या किमतती वाढ होईल मोठे उर्जा संकट निर्माण होऊ शकते. याचा संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. इराणने स्पष्ट केले आहे की, स्ट्रेट ऑफ होर्मुझ (Strait of Hormuz) आता त्यांच्या नियमांवर चालवले जाईल.

तज्ज्ञांच्या मते याचा हेतू अमेरिका-इस्रायलची आणि इतर पाश्चात्य देशांची कोंडी करुन त्यांच्यावर आर्थिक दबाव निर्माण करण्याचा आहे. परंतु यामुळे परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता आहे. स्ट्रेट ऑफ होर्मुझ खाडीतून जगाच्या एकूण साठ्यापैकी २० ते ३० टक्के वाहतूक या मार्गावरुन होते. हा संघर्ष सध्या केवळ लष्करी संघर्षापुरता मर्यादित राहिलेला नाही. इराणच्या गल्फ ऑर्डर प्लॅनमुळे हा आर्थिक राजकारणाचा भाग बनत आहे.

Majid Khatami: ज्याच्या एका आदेशाने अमेरिकाही हादरत होती, अमेरिका-इस्रायलने त्यालाच केले ठार; गुप्तचर यंत्रणेचे मोडले कंबरडे

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: इराणने स्ट्रेट ऑफ होर्मुझबाबत काय निर्णय घेतला आहे?

    Ans: ट्रम्प यांच्या धमतीनंतर इराण युद्धबंदी झाली तरी स्ट्रेट ऑफ होर्मुझचा मार्ग खुला करणार नसल्याचे रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने म्हटले आहे,

  • Que: ट्रम्प यांनी इराणला काय इशारा दिला आहे?

    Ans: ट्रम्प यांनी इराणला ४८ तासांत शांतता करार करण्याच आणि स्ट्रेट ऑफ होर्मुझ उघडण्याचा इशारा दिला आहे, असे न केल्यास त्यांच्या उर्जा प्रकल्पांवर हल्ला केला जाईल असे म्हटले आहे.

  • Que: ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची प्रतिक्रिया काय होती?

    Ans: ट्रम्प यांच्या धमकीला न जुमानता इराणने विनाशकारी प्रतिहल्ल्याची, अरब देशातील उर्जा प्रकल्पांना लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे. तसेच युद्धबंदीनंतरही होर्मुझ उघडणार नाही असे म्हटले आहे.

Web Title: Middle east war irans big move on strait of hormuz after donald trump threats

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 02:32 PM

Topics:  

  • Strait of Hormuz
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

TikTok Fine: मुलांच्या डेटा चोरीप्रकरणी टिकटॉकला मोठा दणका; अमेरिकेत तब्बल 3,300 कोटींचा दंड, जगभरात आवळला चौकशीचा फास
1

TikTok Fine: मुलांच्या डेटा चोरीप्रकरणी टिकटॉकला मोठा दणका; अमेरिकेत तब्बल 3,300 कोटींचा दंड, जगभरात आवळला चौकशीचा फास

Aisha Wahab: ‘फॉस्टर केअर’ ते अमेरिकी संसद! अफगाण-अमेरिकन नागरिक आयशा वहाब यांनी निवडणुकीत रचला नवा इतिहास
2

Aisha Wahab: ‘फॉस्टर केअर’ ते अमेरिकी संसद! अफगाण-अमेरिकन नागरिक आयशा वहाब यांनी निवडणुकीत रचला नवा इतिहास

India Argentina Army: उत्तराखंडमधील कामेट शिखरावर भारत अन् अर्जेंटिनाचे सैनिक फडकवणार ध्वज; 35 जवानांच्या मोहिमेला हिरवा झेंडा
3

India Argentina Army: उत्तराखंडमधील कामेट शिखरावर भारत अन् अर्जेंटिनाचे सैनिक फडकवणार ध्वज; 35 जवानांच्या मोहिमेला हिरवा झेंडा

US sanctions Hezbollah : हिजबुल्लाह ही इराणचीच शाखा; दहशतवादाच्या 10 बड्या फायनान्सर्सवर अमेरिकेने लादले कठोर निर्बंध
4

US sanctions Hezbollah : हिजबुल्लाह ही इराणचीच शाखा; दहशतवादाच्या 10 बड्या फायनान्सर्सवर अमेरिकेने लादले कठोर निर्बंध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.