
Mojtaba Khamenei Warning US-Israel
अली लारीजानी यांच्या मृत्यूने इराणला दुसरा सर्वात मोठा राजनैतिक आणि लष्करी झटका बसला आहे. यामुळे मोजतबा खामेनेई संतापले असून त्यांनी अधिकृत निवदेन जारी करत प्रतिशोध घेण्याचे म्हटले आहे. त्यांनी निवेदनात, लारीजानी यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेणार, शत्रूला याची मोठी किंमत चुकवावी लागेल असे म्हटले आहे. त्यांच्या या विधानाने खळबळ उडाली आहे. मोजतबा यांनी लारीजानी यांचे बलिदान व्यर्थ जाऊ दिले जाणार नाही आणि भ्याड कृत्यामागे असलेल्यांना कठोर शिक्षा होईल असेही त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे.
लाजीरानी इराणच्या सत्तेतील दुसरे सर्वात शिक्तीशाली व्यक्तीमत्त्व होते. ते माजी सर्वोच्च नेते खामेनेई यांचे अत्यंत खास मानले जायचे. खामेनेई यांच्या निधनानंतर आणि मोजतबा यांची सर्वोच्च नेता म्हणून निवड झाल्यानंतर लाजीरानी किंगमेकर म्हणून आले. त्यांच्याकडे इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स(IRGC) आणि इराणच्या सैन्याच्या महत्त्वाच्या ऑपरेशन्सचे नेतृत्व होते.
लाजीरानी एक प्रगल्भ विद्वानही होते. त्यांनी शरीफ युनिव्हर्सिटीमधून गणितात पदवी घेतली आणि तेहरान विद्यापीठातून पाश्चात्य तत्त्वज्ञानात पीएचडी पूर्ण केली होती. याशिवाय त्यांनी 2008 ते 2020 या काळात सलग तीन वेळा इराणच्या संसदेचे अध्यक्षपदही भूषणवले होते. ऑगस्ट 2025 मध्ये त्यांची इराणचे सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव म्हणून निवड करण्यात आली होती.
Iran-US War : इराण-अमेरिका युद्धादरम्यानच अमेरिका बुडाला मोठ्या कर्जात; $39 ट्रिलियनचा कर्जाचा बोजा
Ans: अली लारीजानी हे इराणचे सर्वोच्च सुरक्षा प्रमुख आणि माजी सर्वोच्च नेते खामेनेई यांच्या जवळे आणि अत्यंत विश्वासू सल्लागार होते. त्यांनी संसद अध्यक्ष आणि राष्ट्रीय सुरक्षा क्षेत्रात महत्त्वाच्या भूमिका बजावल्या होत्या.
Ans: लारीजानी यांचे बलिदान व्यर्थ जाऊ दिला जाणार नाही. त्यांच्या रक्त्याच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेतला जाईल अशी धमकी मोजतबा खामेनेई यांनी इस्रायल-अमेरिकेला दिला आहे.