Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Middle East War : अली लारीजानीनंतर ‘या’ कमांडरच्या हाती इराणची सुरक्षा सुत्रे; अमेरिका-इस्रायलची उडणार झोप? 

Iranian security chief : इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव म्हणून एका नव्या कमांडरची नियुक्त करण्यात आली आहे. या कमांडरच्या नियुक्तीने मात्र मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे अमेरिका-इस्रायलचीही झोप उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 24, 2026 | 06:54 PM
New Commander Takes Charge of Iran’s Security

New Commander Takes Charge of Iran’s Security

Follow Us
Follow Us:
  • अली लारीजानीनंतर ‘या’ कमांडरच्या हाती इराणची सुरक्षा सुत्रे
  • अमेरिका-इस्रायलची उडणार झोप?
  • जाणून घ्या कोण आहेत मोहम्मद बाकेर झोलकाद्र?
Iranian security chief : तेहरान : मध्यपूर्वेतील अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्धात (US-Israel Iran War) एक नवे वादळ आले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणशी शांतता चर्चेचा दावा करत पाच दिवसांच्या युद्धबंदीची घोषणा केली आहे. परंतु इराणने अशा कोणत्याही प्रकारची थेट किंवा अप्रत्यक्ष चर्चा झाली नसल्याचे इराणने म्हटले आहे. या चर्चांदरम्यानच इराणच्या संरक्षण यंत्रणेते मोठा बदल झाला आहे. इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च सुरक्षा सचिव अली लारीजानी यांचा मृत्यू झाला होता. आता त्यांच्या जागी एका नव्या कमांडरची नियुक्ती करण्यात आली आहे. हे नवे कमांडर इस्रायल-अमेरिकेसाठी धोकादायक मानले जात आहे.

Iran Leadership : इराणच्या सत्तेचे गूढ कायम! नवा सर्वोच्च नेता ‘गायब’ मग ट्रम्प कोणाशी चर्चा करतायत?

कोण आहेत नवे सुरक्षा अधिकारी?

मिळालेल्या माहितीनुसार, इराणचे सर्वोच्च सुरक्षा परिषदेचे प्रमुख म्हणून मोहम्मद बाकर झुलकद्र (Mohammad Baqer Zolqadr) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बाकर झुलकद्र हे इराणच्या राजकारणातील आणि लष्करी क्षेत्रातील अत्यंत प्रभावी व्यक्ती म्हणून ओळखले जातात.

त्यांनी इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सचे माजी ब्रिगेडियर जनरल म्हणून काम केले आहे. याशिवाय त्यांनी इराणच्या एक्सपीडियन्सी काउन्सिलचे सचिव म्हणूनही काम पाहिले आहे. त्यांच्या या लष्करी पार्श्वभूमीवर ते इस्रायलसाठी धोकादायक मानले जात आहेत. यामुळे सध्याच्या संघर्षात इराणची रणनीती अत्यंत आक्रमक होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

अली लारीजानी यांचा मृत्यू

मीडिया रिपोर्टनुसार, इस्रायलने इराण(Iran)वर मंगळवारी (17 मार्च 2026) मोठा हल्ला केला होता. इराणमधील अनेक लष्करी ठिकाणांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च सुरक्षा प्रमुखा लाजीरानी यांना खास लक्ष्य करण्यात आले होते. या भीषण हल्ल्यात लाजीरानी यांच्यासह त्यांचा मुलागा मोर्तेजा लारीजानी, कार्यालयाचे प्रमुख अलीरेझा बायात आणि अनेक अगंरक्षकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. अली लारीजानी यांच्या निधानेन इराणच्या नेतृत्वासमोर मोठे संकट उभे राहिले होते.

सद्य परिस्थिती

२८ फेब्रुवारी पासून सुरु झालेल्या या भीषण संघर्षाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. या युद्धा आतापर्यंत हजारो निरापराधांचा बळी गेला आहे. इराणमध्ये १,५०० हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले आहे, तर लेबनॉनमध्ये १००० हून अधिक बळी गेला आहे. यामध्ये १५ इस्रायलच्या आणि १३ अमेरिकन सैनिकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय हजारो लोकांनी आपली घरे सोडली आहे.

अमेरिकेत राजकीय वादळ! इराणवरील हल्ल्यासाठी ट्रम्प यांनी संरक्षण मंत्र्यांना धरले जबाबदार; “तेच म्हणाले, हे करूया’…”

💡

Frequently Asked Questions

  • Que: कोण आहेत मोहम्मद बाकर जुलकद्र?

    Ans: मोहम्मद बाकर जुलकद्र यांची इराणने नवे सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांनी इराणचे इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्समध्ये कमांडर म्हणून होते. सुरक्षा आणि धोरणात्मक क्षेत्रात प्रभावशाली व्यक्ती मानले जातात.

  • Que: कोण होते अली लारीजानी?

    Ans: अली लारीजानी हे इराणचे वरिष्ठ राजकारणी आणि सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे माजी प्रमुख होते. त्यांनी इराणच्या अणु चर्चांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. इस्रायलने त्यांच्यावर हल्ला करत त्यांना ठार केले होते.

  • Que: मध्यपूर्वेतील संघर्षाची काय परिस्थिती आहे?

    Ans: मध्यपूर्वेतील संघर्ष निवळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ट्रम्प यांनी इराणसोबत सकारात्मक चर्चा सुरु असल्याचे आणि पाच दिवसांसाठी युद्धबंदी केल्याची घोषणा केली आहे. परंतु अशा प्रकारची कोणतीही चर्चा झाल्याचे किंवा सुरु असल्याचे इराणने फेटाळले आहे. दुसरीकडे इस्रायलचे इराण आणि लेबनॉनवर हल्ले सुरुच आहेत.

Web Title: Middle east war new commander takes charge of irans security

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 06:54 PM

Topics:  

  • Iran News
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा
1

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
2

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
3

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!
4

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.