Iran Leadership : इराणच्या सत्तेचे गूढ कायम! नवा सर्वोच्च नेता 'गायब' मग ट्रम्प कोणाशी चर्चा करतायत? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
जेव्हा ट्रम्प यांना माध्यमांनी इराणशी सुरु असलेल्या चर्चेबद्दल प्रश्न केला. त्यावेळी त्यांनी इराणी अधिकाऱ्यांशी अत्यंत सकारात्मक चर्चा सुरु असल्याचे म्हटले. परंतु त्यांनी नेमकी कोणत्या नेत्याशी चर्चा सुरु आहे यावर कोणतीही माहिती दिली नाही.
यावर एका पत्रकारेने ते सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याशी चर्चा करत आहेत का असा प्रश्न केला. यावेळी ट्रम्प यांनी नाही असे स्पष्ट उत्तर दिले. ट्रम्प यांच्या मते मोजतबा खामेनेईंचा मृत्यू झाला आहे. ट्रम्प यांच्या या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
सध्या इराणमध्ये नेमकी कोणाची सत्ता आहे? पडद्यामागे काय सुरु आहे? ट्रम्प कोणत्या नेत्याशी चर्चा करत आहेत? असे अनेक तेढ निर्माण झाले आहेत. शिवाय माजी सर्वोच्च नेते अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा मोजतबा खामेनेई यांच्याकडे सत्तेची सुत्रे सोपवण्यात आली होती.
परंतु मोजतबा गेल्या अनेक दिवांपासून गायब असल्याने ते गंभीर जखमी असून रशियात उपचार घेत असल्याचा दावा केला जात आहे. मात्र यावर कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही. इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने देखील मोजतबा सुरक्षित असून गुप्त ठिकाणी असल्याचा दावा केला आहे.
याच वेळी दुसरीकडे इराणने अमेरिकेवर गंभीर आरोप केले आहे. इराणने अमेरिकेशी कोणत्याही प्रकारे थेट किंवा अप्रत्यक्ष चर्चा सुरु नसल्याचे म्हटले आहे. इराणने त्यांना धूर्त’ आणि ‘बाता मारणारा’ म्हणून संबोधले आहे. इराणच्या मते, जोपर्यंत त्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत ते चर्चेच्या टेबलावर येणार नाहीत.
याच वेळी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांनी इराण युद्धात अमेरिका-इस्रायलला यश मिळाल्याचा दावा केला आहे. तसेच शांतता करार झाल्यास इस्रायलच्या हिताचे रक्षण होईल असे ट्रम्प यांचे मत असल्याचे म्हटले. परंतु त्यांनी इराण-लेबनॉनवर हल्ले सुरुच राहतील जोपर्यंत त्यांचा अण्वस्त्र कार्यक्रम मोडीत येत नाही, असे विधान केले आहे. यामुळे सध्या युद्धबंदीबाबत अनिश्चितता कायम आहे.
Ans: ट्रम्प यांनी युद्ध थांबण्यावसाठी अमेरिका-इराणमध्ये सकारात्मक चर्चा सुरु असल्याचा दावा केला आहे. सध्या पाच दिवसांसाठी युद्धविराम करण्यात आला आहे.
Ans: सध्या इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई अनुपस्थित असल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा किंवा ते हल्ल्यात गंभीर जखमी असल्याचा दावा केला जात आहे. परंतु याच वेळी इराणमधील निर्णय घेण्याबाबत मोहम्मद बाघेर गालिफ, अब्बास अराघची यांची नावे समोर येत आहेत. परंतु अद्याप याबाबत काहीही स्पष्ट नाही.






