ताजमहालहून अनेक पटींनी सुंदर आहे संगमरवरचे हे मंदिर
संगमरवरी खडकावर करण्यात आले आहे नक्षीकाम
दिलवारा जैन मंदिराचा इतिहास ११ ते १३ व्या शतकादरम्यानच्या गुजरातच्या चालुक्य (सोळंकी) राजवंशाच्या काळापर्यंत मागे जातो. याची निर्मिती इसवी सन १०३१ मध्ये गुजरातचे सोलंकी शासक भीमदेव प्रथम यांचे मंत्री विमल शाह यांनी केल्याचे सांगितले जाते. हे मंदिर भारतातील एक सुंदर मंदिर असून येथील वास्तुकला अनेकांना मोहित करणारी ठरते. येथील संगमरवरी खडकावर केलेले नक्षीकाम तर अतिसुरेख दिसते. म्हटले जाते की, येथील नक्षीकाम जगातील सर्वात सुक्ष्म खडकावर केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमध्ये मोडली जाते.
हे मंदिर बाहेरुन दिसताना आपल्याला सामान्य मंदिराप्रमाणे दिसते पण मंदिराच्या आत प्रवेश करताच तुम्हाला संगमरमर खडकावर केलेली सुंदर कलाकुसर पाहायला मिळते. इथले वातावरण आणि कोरीवकाम इतके सुंदर आहे की, एकदा पाहताच येथील दृष्यांवर पर्यटकांच्या नजरा खिळून राहतात.
श्र्वेतांबर जैन परंपरेचा आहे संबंध
दिलवारा जैन मंदिरात एकूण ५ प्रमुख मंदिर आहेत ज्यांचा संबंध जैन धर्मातील श्वेतांबर संप्रदायाशी होतो.
१. विमल वसाही
हे मंदिर इसवी सन १०३१ च्या काळात तयार केल्याचे सांगितले जाते. हे मंदिर तीर्थंकर, भगवान ऋषभदेव (आदिनाथ) यांना समर्पित आहे. हा मंदिराचा गाभा असून याचा रंग मंडप या नावानेही ओळखले जाते. याच्या छतावर केलेले नक्षीकाम, विशाल मंडप आणि स्तंभ लोकांना आकर्षित करते.
२. लूणा वसाही
जरातच्या शासकांचे मंत्री वास्तुपाल आणि तेजपाल यांनी इ.स. १२३० मध्ये या मंदिराची बांधणी केल्याचे म्हटले जाते. सांगितले जाते की, २२वे तीर्थकार नेमिनाथ यांना हे मंदिर समर्पित आहे. इथे संगमरवरी कल्पवृक्ष आणि हत्ती मंडप पाहायला मिळतो.
३. पित्तलहर
भगवान ऋषभदेव (आदिनाथ) यांना हे मंदिर समर्पित आहे. हे या ५ मंदिरांमधील तीसऱ्या स्थानाचे मंदिर म्हणून ओळखले जाते ज्याला पित्तलहर असे नाव देण्यात आले आहे.
५ मिनिटांत उजळतील पितळेची भांडी! घरच्या घरी तयार करा ‘हे’ खास द्रव अन् मिळवा अगदी नव्यासारखी चमक
४. पार्श्वनाथ मंदिर
दिलवारा जैन मंदिरातील चाैथ्या स्थानावरचे मंदिर म्हणजे पार्श्वनाथ मंदिर. २३ वे तीर्थकार पार्श्वनाथ यांना हे मंदिर समर्पित आहे. याचा परिसर सर्वात उंच आणि तीन मजली आहे.
५. महावीर स्वामी मंदिर
शेवटचा आणि पाचवा मंदिर महावीर स्वामी मंदिर हे २४ वे तीर्थकार भगवान महावीर स्वामी यांना समर्पित आहे. अन्य मंदिरांहून या मंदिराचा आकार काहीसा लहान आहे परंतु याच्या भिंतींवर केलेले नक्षीकाम अतिसुंदर आहे जे या मंदिराकडे लोकांना आकर्षित करते.






