US Iran War : महासत्तेची नाच्चकी! ट्रम्प यांच्या चर्चेचा डाव फेल? इराणी सैन्याने जगासमोर काढली अमेरिकेची लायकी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
ट्रम्प गेल्या दोन दिवसांपासून इराणसोबत सकारात्मक चर्चा सुरु असल्याचा दावा करत आहेत. इराणच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याशी चर्चा सुरु असून ते शांततेसाठी तयार असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले. त्यांच्या या विधानामुळे जगभरात शांततेची आशा निर्माण झाली होती. परंतु इराणने ट्रम्प यांच्या दाव्यांना खोटे ठरवले आहे.
इराणच्या सरकारी अधिकाऱ्यांनी ट्रम्प यांचे दावे फेटाळल्यानंतर लष्कराने देखील त्यांना खोटे ठरवले आहे. इराणी लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल इब्राहिम जोल्फागरी यांनी एक व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी अमेरिकेवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, ज्या रणनीतीक शक्तीच्या जीवावर तुम्ही उड्या मारत आहात, ती अपयशी ठरली आहे.
अमेरिका स्वत:ला महासत्ता म्हणवून घेते परंतु त्यांच्याकडे या वादातून बाहेर पडण्याची ताकद नाही. जोल्फागरी यांनी हेही स्पष्ट केले की, अमेरिका आपल्या अपयशाला काराराचे नाव देऊ नये. इराण कधीच झुकणार नाही असे त्यांनी ठणकावून सांगितले.
मीडिया रिपोर्टनुसार, ट्रम्प प्रशासनाने पाकिस्तानच्या माध्यमातून इराणला 15 कलमी शांतता प्रस्तावही पाठवला होता. मात्र इराणने हा प्रस्ताव धुडकाला आहे. आम्ही अमेरिकेशी तडजोड करणार नाही असे इराणने स्पष्ट केले आहे.
एककीडे शांतता चर्चांवरुन वाद पेटला आहे, तर याच वेळी दुसरीकडे इस्रायलचे लेबनॉन सीमेजवळ हिजबुल्लाहवर हल्ला केला आहे. तर इराणकडून संभाव्य हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर इस्रायलमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे युद्धाचे ढग आणखी गडद झाले आहेत.
JUST IN: 🇮🇷🇺🇸 Iran send message to US President Trump “Has the level of your own conflicts reached the stage of negotiating with yourselves?” pic.twitter.com/5Sx8MAYsl2 — BRICS News (@BRICSinfo) March 25, 2026
US Iran War : आता ‘दलदली’तून बाहेर पडायची वेळी संपली…; इराणचा डोनाल्ड ट्रम्प ‘आरपार’चा इशारा
Ans: इराणी लष्कराने ट्रम्प यांचा दावा फेटाळला असून त्यांची खिल्ली उडवली आहे. ट्रम्प स्वत:शीच चर्चा करत असल्याचे सैन्याने म्हटले आहे.
Ans: ट्रम्प यांनी इराणशी शांतता चर्चा सुरु असून अत्यंत फलदायी आणि सकारात्मक चर्चा सुरु असल्याचा दावा केला होता.






