Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mordechai Vanunu: इस्रायलची ‘न्यूक्लियर’ गुपितं जगाला विकणाऱ्या देशद्रोही वानुनूचा ‘मोसाद’ने ‘असा’ केला गेम; वाचा थरारक सत्य

Mordechai Vanunu : इस्रायलच्या दिमोना अणुसुविधेतील तंत्रज्ञ मोर्दखाई वानुनू यांनी १९८६ मध्ये इस्रायलच्या गुप्त अणुशस्त्र कार्यक्रमाविषयीची ५० हून अधिक छायाचित्रे आणि सविस्तर माहिती गुप्तपणे उघड केली.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 23, 2026 | 08:44 AM
mordechai vanunu mossad honey trap israel nuclear secrets reveal 1986

mordechai vanunu mossad honey trap israel nuclear secrets reveal 1986

Follow Us
Follow Us:
  • अणुबॉम्बचं गुपित उघड
  • मोसादचे ‘हनी ट्रॅप’ ऑपरेशन
  • १८ वर्षांचा तुरुंगवास

Mordechai Vanunu Mossad Story : जगातील सर्वात खतरनाक गुप्तचर संस्था म्हणून ‘मोसाद'( Israel Mossad) चे नाव घेतले जाते. मोसाद आपल्या शत्रूला जगाच्या पाठीवर कुठूनही शोधून काढते आणि संपवते. अशीच एक थरारक सत्यकथा आहे मोर्दखाई वानुनू यांची. वानुनू हे इस्रायलच्या ‘दिमोना’ अणुसुविधेमध्ये तंत्रज्ञ म्हणून काम करत होते. पण त्यांनी जे केलं, त्याने इस्रायलच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी इस्रायलच्या अत्यंत गुप्त अशा अणुशस्त्र कार्यक्रमाचा पर्दाफाश केला आणि तेव्हापासून ते मोसादच्या रडारवर आले.

दिमोना: इस्रायलच्या अणुशक्तीचं केंद्र

इस्रायलच्या नेगेव वाळवंटात ‘दिमोना’ नावाचे एक शहर आहे. येथेच इस्रायलची मुख्य अणुसुविधा आहे. इस्रायलने आजपर्यंत कधीही अधिकृतपणे मान्य केलेलं नाही की त्यांच्याकडे अणुबॉम्ब आहेत. पण १९८६ मध्ये वानुनू यांनी ५० हून अधिक छायाचित्रे आणि सविस्तर माहिती लंडनच्या ‘संडे टाइम्स’ला दिली. या पुराव्यांवरून सिद्ध झालं की इस्रायलकडे केवळ अणुशस्त्रे नाहीत, तर ते जगातील सहावी मोठी आण्विक शक्ती आहे. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (SIPRI) नुसार, आज इस्रायलकडे अंदाजे ९० अण्वस्त्रे आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Israel Iran War : इराणने मध्यरात्री केला इस्रायलवर हल्ला; जेरुसलेम आणि वेस्ट बँकवर डागली ‘क्लस्टर’ क्षेपणास्त्रे, परिसरात घबराट

लंडन ते इस्रायल: मोसादचा ‘हनी ट्रॅप’ प्लॅन

जेव्हा वानुनू यांनी माहिती उघड केली, तेव्हा ते लंडनमध्ये लपून बसले होते. ब्रिटिश भूमीवरून त्यांना उचलणे मोसादला राजनैतिक दृष्ट्या कठीण होते. म्हणूनच मोसादने ‘हनी ट्रॅप’चा वापर केला. ‘शेरिल’ नावाच्या एका महिला मोसाद एजंटने लंडनच्या रस्त्यावर वानुनूची भेट घेतली आणि त्यांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिने वानुनूंना सुट्टी घालवण्यासाठी इटलीची राजधानी रोममध्ये येण्यास तयार केले. रोममध्ये पोहोचताच मोसादच्या पथकाने वानुनूला पकडले, गुंगीचे औषध दिले आणि एका जहाजातून गुप्तपणे इस्रायलला नेले.

“Did you know Israel hunted down their own citizen for revealing the truth about their nuclear weapons?” The Mordechai Vanunu Story: pic.twitter.com/4bUoP3crDB — Henri Fjord (@henri_fjord) January 18, 2026

credit – social media and Twitter

१८ वर्षांचा काळकोठडीतील प्रवास

इस्रायलमध्ये वानुनू यांच्यावर बंद खोलीत खटला चालवण्यात आला. त्यांना १८ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली, त्यापैकी ११ वर्षे त्यांनी एकांतवासात (Solitary Confinement) काढली. २००४ मध्ये त्यांची सुटका झाली, पण ती केवळ नावापुरतीच होती. त्यांना आजही परदेशी पत्रकारांशी बोलण्यास, परदेशात जाण्यास किंवा इंटरनेट वापरण्यास मनाई आहे. इस्रायल सरकारचा दावा आहे की, वानुनू यांच्याकडे अजूनही काही गुप्त माहिती असू शकते जी देशाच्या सुरक्षेसाठी घातक आहे.

व्हिस्लब्लोअर की गद्दार? जगाचा दृष्टिकोन

इस्रायलमध्ये वानुनू यांना ‘देशद्रोही’ मानले जात असले तरी, आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांना एक धाडसी ‘व्हिस्लब्लोअर’ (माहिती उघड करणारा) मानले जाते. अण्वस्त्रमुक्तीसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना ‘राईट लाइव्हलीहूड’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यामुळे आणि इस्रायलच्या धोरणांना विरोध केल्यामुळे त्यांच्यावर होणारा अन्याय अधिक वाढला, असाही एक मतप्रवाह आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World War III: युद्ध आर्क्टिकमध्ये! इराण USच्या शत्रूसोबत करणार हातमिळवणी; ‘या’ एका प्रस्तावाने ट्रम्पच्या स्वप्नांना लागणार ग्रहण

 दिमोना आजही लक्ष्यावर!

नुकताच इराणने इस्रायलच्या दिमोना शहरावर क्षेपणास्त्र हल्ला केल्याच्या बातम्या आल्या आहेत. दिमोना हे शहर इस्रायलसाठी किती संवेदनशील आहे, हे वानुनू यांच्या प्रकरणावरून स्पष्ट होते. वानुनू आजही जेरुसलेममध्ये निर्बंधाखाली जीवन जगत आहेत, पण त्यांनी ३० वर्षांपूर्वी जे गुपित उघड केलं, त्याने जगाचा इस्रायलकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलला.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: मोर्दखाई वानुनू कोण आहेत?

    Ans: मोर्दखाई वानुनू हे इस्रायलचे माजी अणुतंत्रज्ञ आहेत, ज्यांनी १९८६ मध्ये इस्रायलच्या गुप्त अणुशस्त्र कार्यक्रमाची माहिती जगासमोर उघड केली होती.

  • Que: मोसादने वानुनूला लंडनहून कसे पकडले?

    Ans: मोसादने 'हनी ट्रॅप'चा वापर करून एका महिला एजंटमार्फत वानुनूला इटलीला बोलावले आणि तिथून अपहरण करून त्यांना इस्रायलला नेले.

  • Que: इस्रायलकडे खरोखरच अण्वस्त्रे आहेत का?

    Ans: अधिकृतपणे इस्रायलने कधीही हे मान्य केले नाही, पण वानुनू यांनी दिलेल्या पुराव्यांनुसार आणि SIPRI च्या अहवालानुसार इस्रायलकडे सुमारे ९० अण्वस्त्रे आहेत.

Web Title: Mordechai vanunu mossad honey trap israel nuclear secrets reveal 1986

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 08:44 AM

Topics:  

  • Israel
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा
1

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
2

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
3

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!
4

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.