More than 300 children killed in 10 days in Israeli attacks in gaza, UN report says
नवी दिल्ली: गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु असलेला गाझातील हमास आणि इस्त्रायली संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत आहे. इस्त्रायलने गाझात सुरु केलेल्या हल्ल्यांमध्ये गेल्या 10 दिवसात किमान 322 मुलांता मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे, यामध्ये 609 जण जखमी झाले आहेत. संयुक्त राष्ट्रशंघाच्या बाल अधिकार संस्थेने UNICEF ने दिलेल्या माहितीनुसार, 23 मार्च रोजी झालेल्या इस्त्रायलच्या हल्ल्यात अनेक बालकांचा मृत्यू झाला आहे. दक्षिण गाझातील अलनसार इस्पितळावर इस्त्रायलने बॉम्ब हल्ला केला होता. UNICEF ने दिलेल्या माहितीनुसार, बहुतांश मुले विस्थापित झाली असून तात्पुरत्या छावण्यांमध्ये वास्तव करत होते, तसेच काही उदध्वस्त झालेल्या घरांमध्ये आश्रय घेत होते.
हमासने युद्धबंदीच्या दुसऱ्या टप्प्यातील अटी मान्य करण्यास नकार दिल्याने इस्त्रायलने 18 मार्च रोजी गाझालवर बॉम्ब हल्ले सुरु केले. त्यानतर इस्त्रायलने भू-मार्गेही लष्करी कारवाई सुरु केली. हमाससोबत झालेल्या दोन महिन्यांच्या युद्धविरामानंतर पुन्हा एकदा संघर्ष सुरु झाला.
UNICEF च्या कार्यकारी संचालिका कॅथरीन रसेल यांनी, “युद्धविरामामुळे गाझातील मुलांना थोडासा दिलासा मिळाला होता, मात्र इस्त्रायलच्या हल्ल्यामुळे ते पुन्हा हिंसाचाराच्या भोवऱ्यात अडकले आहेत.”असे म्हटले.त्यांनी पुढे म्हटले की, “आंतरराष्ट्रीय मानवी कायद्यांनुसार, सर्वांना गाझातील मुलांच्या संरक्षणाची जबाबदारी घ्यायला हवी.”
UNICEF रिपोर्टनुसार, गेल्या 18 महिन्यांपासून सुरु असलेल्या संघर्षामुळे सुमारे 15 हजार मुले मृत्यूमुखी पडली आहेत, तर 34 हजाराहून अधिक जखमी अवस्थेत आहे. तसेच 10 लाखांहून अधिक मुलांना सतत विस्थापित व्हावे लागत आहे. यामुळे त्यांच्यापर्यंत मूलभूत सुविधा देखील पोहोचणे कठीण झाले आहे.
UNICEF ने इस्त्रायलकडून गाझामध्ये मानवीय मदतीवरील निर्बंध हटवण्याची मागणी केली आहे. 2 मार्चपासून इस्त्रायलने गाझातील मानवीय मदतीवर बंदी घातली होती. यामुळे UNICEF ने जखमी आणि आजारी मुलांना वैद्यकीय मदत मिळावी यासाठी इस्त्रायलला निर्बंध हटवण्याचे आवाहन UNICEF ने केले आहे.अन्न, स्वच्छ पाणी, निवारी आणि आरोग्यसेवेच्या अभावामुळे मुलांमध्ये कुपोषण आणि आजाराचे प्रमाण वाढत असल्याचे UNICEF ने म्हटले आहे. यामुळे मृत्यूंचे प्रमाणा वाढ गंभीर शक्यता UNICEF ने व्यक्त केली आहे.
दरम्यान हमासने इजिप्त आणि कतारकडून मिळालेल्या नव्या युद्धबदीच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. या नव्या प्रस्तावानुसार, हमास दर आठवड्याला पाच इस्त्रायली ओलीसांची सुटका करेल. हमासचे वरिष्ठ नेते खलील अल-हया यांनी म्हटले की, “आम्हाला दोन दिवसांपूर्वी इजिप्त आणि कतारकडून एक प्रस्ताव मिळाला आहे. आम्हाला तो मान्य असून इस्त्रायलनेही या प्रस्तावाला मंजुरी द्यावी अशी अपक्षा आहे.