Israel-Hamas ceasefire: युद्धबंदीच्या नवीन प्रस्तावाला हमासकडून मान्यता; इस्त्रायलचा निर्णय अद्याप अस्पष्ट (फोटो सौजन्य: सोशल मीडिया )
जेरुसेलम: गेल्या अनेक काळापासून सुरु असलेल्या गाझातील हमास-इस्त्रायलच्या संघर्ष दिवसेंदविस तीव्र होत चालला होता. जानेवारीत युद्धबंदीचा करारही करण्यात आला होता. या करारांगर्तग इस्त्रायल आणि हमासने कैद केलेल्या नागरिकांची सुटका केली. दरम्यान या युद्धबंदीचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर हमासने दुसऱ्या टप्पायातील अटी मान्य करण्यास नकार दिला होता. यामुळे संघर्ष पुन्हा उफाळून आला होता. आता पुन्हा एकदा हमासने युद्धबंदीचा नवीन प्रस्ताव स्वीकारला आहे.
हमासने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी इजिप्त आणि कतारकडून मिळालेल्या नवीन युद्धबंदी प्रस्तावाला मान्यता दिली आहे. या नवीन प्रस्तावानुसार, हमास दर आठड्याला पाच इस्त्रायली बंधकांची सुटका करणार आहे. हमासचे वरिष्ठ नेते खलील अल-हया यांनी म्हटले की, “आम्हाला दोन दिवसांपूर्वी इजिप्त आणि कतारकडून एक प्रस्ताव मिळाला आहे. आम्हाला तो मान्य असून इस्त्रायलनेही या प्रस्तावाला मंजुरी द्यावी अशी अपक्षा आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, हमासने दर आठवड्याला पाच इस्त्रायली ओलिसांची सुटका करण्याचे आश्वासन दिले आहे. यामुळे इस्त्रायल आणि हमासमधील तणाव कमी करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाउल मानले जात आहे.






