More than 60 killed as boat capsizes of Yemen
Yemen News marathi : साना : येमेनच्या (Yemen) किनाऱ्याजवळ रविवारी (०३ ऑगस्ट) एक भीषण दुर्घटना घडली आहे. एक बोट उलटल्याने ६८ लोकांचा मृत्यू झाला. संयुक्त राष्ट्रांच्या स्थलांतर संस्थेने या घटनेची माहिती दिली. संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, बोटीतील ६८ आफ्रिकन स्थलांतरांनी जीव गमवला असून ७४ लोक अजूनही बेपत्ता आहे. घटनेची माहिती मिळताच आपत्कालीन सेवांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तातडीने बचाव कार्य सुरु केले.
सध्या बेपत्ता झालेल्या लोकांचा शोध घेणे सुरु असून आपत्कालीन सेवांना १२ जणांना वाचवण्या यश आले आहे. या अपघातामध्ये ५४ स्थलांतरितांचे मृतदेह तरंगताना आढळले. यातील १४ मृतदेह येमेनच्या दक्षिण किनाऱ्यावरील अब्यान प्रांताची राजधानी असलेल्या झिंजीबारमधील रुग्णालायता नेण्यात आले आहेत. तसेच मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
युक्रेन युद्धात भारत करत आहे रशियाची गुप्त मदत? डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा गंभीर आरोप
आसोसिएटेड प्रेसने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे दक्षिण येमेनच्या अब्यान प्रांताजवळ एडेन आखातात ही दुर्घटना घडली. १५४ इथिओपियन स्थलांतरितांना घेऊन जाणारी बोट अचानक बुडाली. आंतरराष्ट्रीय स्थलांतर संघटनेचे (IOM) येमेन प्रमुख अब्दुसत्तोर असोव यांनी ही माहिती AP ला दिली. त्यांनी सांगितले की, येमेनच्या किनाऱ्यावर अशा दुर्घटना काही नवीन नाही. यापूर्वी देखील अशा अनेक घटना घडल्या आहे.
गेल्या अनेक दशकांपासून येमेनमध्ये गृहयुद्ध सुरु आहे. यामुळे पूर्व आफ्रिका आणि हॉर्न ऑफ आफ्रिकेतील स्थालांतरितांसाठी हा देश धोकादायक बनत आहे. या मार्गावरुन हे आफ्रिकन स्थलांतरित रोजगाराच्या शोधाता अरब देशांकडे जातता. मात्र अनेकदा येमेनमधील संघर्षामुळे त्यांना प्राणा गमवावे लागले आहे. शिवाय मानवी तस्करी करणारे देखील स्थलांतरितांवर हल्ले करतात. गर्दीने भरलेल्या बोटीवर हल्ले करुन त्यांना लाल समुद्र किंवा एडनच्या आखातातून नेले जाते.
इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन (IOM)च्या माहितीनुसार, गेल्या महिन्यांत येमेनच्या किनारपट्टीवर अनेक बोट अपघात घडले. यामध्ये शेकडो स्थलांतरित मृत्यूमुखी पडले आहेत किंवा बेपत्ता झाले आहे. मार्च २०२५ मध्ये देखील चार बोटी बुडाल्याने १८६ जण बेपत्ता झाले होते. IOM च्या आकडेवारीनुसार, २०२४ मध्ये ६०,००० पेक्षा जास्त मृत पावलेल्या किंवा बेपत्ता झालेल्या लोकांची प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. तर २०२३ मद्ये ९७,२०० प्रकरणे नोंदवली आहेत.
‘त्या’ चौघांवर काळाचा घाला! अमेरिकेत चार भारतीय वृद्धांचा दुर्दैवी मृत्यू ; घटनेचा तपास सुरु