ट्रम्प यांच्या सर्वात प्रभावशाली सल्लागारांपैकी वरिष्ठ सल्लागार स्टीफन मिलर (फोटो सौजन्य: सोशल मीडया)
US-India Relation : वॉशिंग्टन : अलीकडे रशियाकडून (Russia) तेल खरेदी करण्यावरुन अमेरिका (America) भारतावर सतत दबाव आणत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे २५% कर लागू केला आहे. शिवाय भारताला रशियाकडून तेल खरेदीची न करण्याची धमकी दिली आहे. यामुळे जागतिक स्तरावर मोठा वाद पेटला आहे. ट्रम्प यांच्या सर्वात प्रभावशाली सल्लागारांपैकी वरिष्ठ सल्लागार स्टीफन मिलर यांनी भारतावर टीका केली आहे. त्यांनी भारतावर गंभीर आरोप करत, भारत युक्रेनविरुद्ध रशियाला मदत करत असल्याचे म्हटले आहे. भारताने रशियाला अप्रत्यक्ष निधी दिली असल्याचा दावा स्टीफन मिलर यांनी केला आहे.
Myanmar Earthquake : भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी हादरला म्यानमार; लोकांमध्ये भीतीचे वातारण
संडे मॉर्निंग फ्युटर्सला दिलेल्या मुलाखतीत स्टीफन मिलर यांनी भारताला रशियाकडून तेल खरेदी थांबवण्याची धमकी देखील दिली आहे. रशियाकडून तेल खरेदी करुन भारत त्यांना अप्रत्यक्ष निधी पुरवत असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी अमेरिका हे स्वीकर करणार नाही असे म्हटले आहे. त्यांचे हे विधान अशा वेळी करण्यात आले आहे, जेव्हा डोनाल्ड ट्रम्पकडून रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर दबाव वाढत आहे. त्यांच्या या विधानाने जागतिक स्तरावर खळबळ उडाली आहे.
अमेरिकेचा तेल निर्यातीवर हल्ला
ट्रम्प प्रशासनाच्या स्टाफने रशियासोबत भारताच्या वाढत्या तेल व्यापारावर हल्ला केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, रशियन तेल खरेदी करण्याबाबत चीन आणि भारत एकमेकांशी जोडले आहे. दोन्ही देशांनी मोठ्या प्रमाणात रशियाकडून तेल खरेदी केली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील संबंधाबद्दलही त्यांनी जबरदस्त म्हणून संबोधले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump )यांनी भारतीय उत्पादनांवर २५ टक्के कराची घोषणा केली आहे. याशिवाय भारताने रशियाकडून शस्त्रे आणि तेल खरेदी केल्यास संभाव्य दंडाचाी इशारा दिला आहे. तसेच ट्रम्प यांनी भारत आणि रशियाच्या अर्थव्यवस्थेला मत अर्थव्यवस्था म्हटले आहे. त्यांनी भारत आणि रशिया काय करतो याची त्यांनी पर्वा नसल्याचे म्हटले आहे. ट्रम्प शिवाय अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी देखील भारताच्या रशियाशी वाढत्या संबंधावर टीका केली आहे. त्यांनी अमेरिका आणि भारताचे संबंध रशियामुळे चिंतेत असल्याचे म्हटले आहे.
FAQs ( संबंधित प्रश्न)
भारत रशियाकडून किती तेल खरेदी करतो?
भारत आणि रशियामध्ये गेल्या वर्षीपासून तेल व्यापारात वाढ झाली आहे. सध्या भारत रशियाकडून ८७.४ मिलियन टन तेल खरेदी करतो, ही किंमत भारताच्या एकूण तेल आयातीच्या ३५ ते ३४ ३५ ते ३४ टक्क्यापर्यंत वाढली आहे.
ट्रम्प भारतावर रशियाकडून तेल खरेदी थांबवण्यासाठी दबाव का आणत आहेत?
सध्या जागतिक स्तरावर रशिया आणि युक्रेन (Russia Ukraine War)युद्ध थांबवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यासाठी रशियावर निर्बंध देखील लादले जात आहे, परंतु भारताच्या रशियाकडून तेल खरेदी केल्याने युद्धाचा धोका अधिक वाढत असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.