unmarried women Japan Sweden : एकेकाळी विवाह हा स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा मानला जात होता. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लगेचच स्थायिक होण्यासाठी मुली विवाह करण्याच्या विचारात असत. मात्र, आता ही पारंपरिक संकल्पना झपाट्याने बदलताना दिसत आहे. आधुनिक काळात महिला आत्मनिर्भर होत असून, विवाहाऐवजी स्वावलंबी व स्वतंत्र जीवन जगण्याला प्राधान्य देत आहेत.
गेल्या काही वर्षांत, जगभरातील अनेक देशांमध्ये विवाह न करणाऱ्या महिलांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. भारतासह जपान, स्वीडन यांसारख्या प्रगत देशांत तर हा ट्रेंड मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. महिलांनी स्वतःचे आयुष्य स्वतःच्या अटींवर जगावे, ही भावना आता अधिक बळकट होत चालली आहे.
भारतातही वाढतेय अविवाहित महिलांचे प्रमाण
२०२२ च्या एका अहवालानुसार, भारतात सुमारे ७२ दशलक्ष (७ कोटींहून अधिक) महिला अशा होत्या ज्यांनी लग्न केले नव्हते. या संख्येमध्ये अविवाहित, घटस्फोटित आणि विधवा महिलांचाही समावेश आहे. ही आकडेवारी युनायटेड किंग्डम व स्वित्झर्लंडच्या एकत्रित लोकसंख्येइतकी आहे, यावरून या स्थितीचे गांभीर्य लक्षात येते.
जपान आणि स्वीडनमध्ये सर्वाधिक अविवाहित मुली
जपान आणि स्वीडन हे देश जगात सर्वाधिक अविवाहित महिलांच्या संख्येसाठी ओळखले जातात. काही अहवालांनुसार स्वीडन पहिल्या क्रमांकावर असून, काही अहवालांमध्ये जपान या यादीत आघाडीवर आहे. जपानमध्ये प्रत्येक सात महिलांपैकी एक महिला ५० वर्षांपर्यंतही विवाह करत नाही. यासाठी तेथे विशेष प्रकारचे व्यवसाय आणि सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की, या समाजांमध्ये विवाहाबाबतचा दृष्टिकोन झपाट्याने बदलतो आहे. महिलांसाठी फक्त विवाहाचाच पर्याय नसून, जीवन जगण्याचे विविध मार्ग खुले झाले आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पाकिस्तानच्या नूर खान एअरबेसवर अमेरिकेचे अणुबॉम्ब होते का? पाहा अमेरिकेच्या ‘Atomic Bomb Host’ करणाऱ्या देशांची यादी
महिलांना लग्न न करण्यामागची कारणे
या बदलामागे सामाजिक, मानसिक व व्यावसायिक अनेक कारणे आहेत. भारत आणि जपानसारख्या देशांमध्ये आजही अनेक ठिकाणी पुरुष काम करतो आणि स्त्री घरात राहते ही पारंपरिक भूमिका कायम आहे. या मानसिकतेमुळे महिलांना घरगुती हिंसाचाराचा सामना करावा लागतो, ज्यामुळे अनेकजणी लग्न न करण्याचा निर्णय घेतात.
त्याशिवाय, महिलांचे शिक्षण आणि करिअरमध्ये सहभाग वाढला आहे. आता महिला केवळ गृहिणी बनून राहण्यात समाधान मानत नाहीत, तर स्वतःचे स्वप्न, स्वतःचा व्यवसाय आणि आर्थिक स्वातंत्र्य यांना प्राधान्य देतात. अलीकडेच घडलेले सोनम आणि राजा रघुवंशी प्रकरण, जिथे एकने दुसऱ्याचा जीव घेतला, हे विवाह संस्थेच्या सध्याच्या असुरक्षिततेचे भयावह उदाहरण आहे. अशा घटनांमुळे महिलांमध्ये विवाहाबाबत भीती आणि अनास्था वाढते आहे.
विवाहसंस्थेबाबत जागतिक मानसिकतेत बदल
वाढती घटस्फोटाची प्रमाणे, लग्नानंतर येणाऱ्या जबाबदाऱ्यांचा ताण, मानसिक व शारीरिक स्वतंत्रतेचा अभाव यामुळे महिलांचा लग्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. स्वीडन, जपानसारख्या देशांत तर सरकारनेही एकट्या राहणाऱ्या नागरिकांसाठी विशेष योजना राबविल्या आहेत. त्यामुळे लग्नाशिवायही सुसंस्कृत आणि समाधानी जीवन जगणे शक्य होते हे महिलांनी सिद्ध केले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : स्पेनमध्ये अवकाशातून पडलेल्या धातूपासून बनवलेले 3,000 वर्ष जुने दागिने सापडले; ‘Villena Treasure’तून प्राचीन विज्ञानाचा अनोखा शोध
एकटे पण समाधानी
विवाह ही आता अपरिहार्य गोष्ट राहिलेली नाही. स्त्रियांनी आपल्या जीवनाचा निर्णायक अधिकार स्वतःकडे घेतला असून, ‘एकटे पण समाधानी’ हे नवे समीकरण स्वीकारले आहे. जपान आणि स्वीडन या देशांतून सुरु झालेला हा ट्रेंड आता भारतातही दिसू लागला आहे. समाजातील या बदलत्या विचारसरणीचा आदर करून, महिलांच्या निवडींचा स्वीकार करणे ही काळाची गरज आहे.