नूर खान एअरबेसवर अमेरिकन लष्कराची उपस्थिती?
पाकिस्तानमधील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आणि संरक्षण विश्लेषकांच्या मते, नूर खान एअरबेसवर अमेरिकन सैन्य तैनात होते आणि पाकिस्तानी सैन्यालाही या तळावर सहज प्रवेश नव्हता. या दाव्यानुसार, येथे अमेरिकेच्या अण्वस्त्रांचाही साठा होता. भारताने केलेल्या हल्ल्याच्या वेळी ही अण्वस्त्रे तिथेच होती, असेही काही तज्ज्ञांनी म्हटले आहे. सध्या याबाबत कोणतेही अधिकृत किंवा आंतरराष्ट्रीय प्रमाणित पुरावे उपलब्ध नाहीत, परंतु हा मुद्दा आंतरराष्ट्रीय चर्चेचा विषय नक्कीच ठरत आहे. पाकिस्तानमध्ये अमेरिकेचे लष्करी गुप्त तळ असू शकतात, अशी शक्यता याआधीही अनेक वेळा व्यक्त झाली आहे.
भारताची प्रत्युत्तरात्मक कारवाई आणि नूर खानवर हल्ला
पुलवामा येथील CRPF जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर ‘बालाकोट एअर स्ट्राईक’च्या माध्यमातून कठोर कारवाई केली होती. भारतीय हवाई दलाने अनेक ठिकाणांवर लक्ष्य साधले होते आणि दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले होते. याच दरम्यान, नूर खान एअरबेसवर हल्ला झाल्याचे काही माध्यमांतून पुढे आले होते. या हल्ल्यानंतर पाकिस्तानकडूनही भारतावर प्रत्युत्तरात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र भारताच्या प्रगत हवाई संरक्षण प्रणालीने पाकिस्तानची क्षेपणास्त्रे आणि ड्रोन निष्फळ ठरवले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : तब्बल 18.6 वर्षांनी पुन्हा अनुभवलं हे चित्तथराक दृश्य; ‘Strawberry Moon’ मुळे दिवस ठरला अविस्मरणीय
अमेरिकेची अण्वस्त्रे कोणत्या देशांत?
पाकिस्तानमध्ये अमेरिकेची अण्वस्त्रे आहेत का, याची ठोस माहिती अद्याप उपलब्ध नाही. मात्र हे सत्य आहे की अमेरिका जगभरात काही देशांमध्ये आपली अण्वस्त्रे तैनात करून ठेवते. हे देश ‘न्यूक्लियर होस्ट कंट्रीज’ म्हणून ओळखले जातात. नाटो कराराअंतर्गत, अमेरिका खालील युरोपीय देशांमध्ये आपली अण्वस्त्रे ठेवते:
1. इटली
2.जर्मनी
3. तुर्की
4.बेल्जियम
5.नेदरलँड्स
या देशांमध्ये असलेल्या काही प्रमुख एअरबेसवर अमेरिकेच्या B61 न्यूक्लियर बॉम्ब साठवले गेले आहेत. या अण्वस्त्रांचा वापर अत्यंत आवश्यक तेव्हाच केला जाऊ शकतो आणि त्यावर यजमान देशांचा नाही, तर अमेरिकेचाच पूर्ण अधिकार असतो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : China Space Warfare : चीनने अवकाशातही सैन्य उभारले, 360 उपग्रहांमध्ये बसवली शस्त्रे, भारतही सज्ज
रशियाचाही अशाच पद्धतीने अण्वस्त्रांचा प्रसार
फक्त अमेरिका नाही, तर रशियानेही अशाच प्रकारे आपली अण्वस्त्रे काही मित्र राष्ट्रांमध्ये तैनात केली आहेत, असे मानले जाते. मात्र यासंबंधीची माहिती अधिक गुप्त ठेवली जाते. यामुळे अण्वस्त्र होस्टिंग ही रणनीती मोठ्या राष्ट्रांमध्ये वाढताना दिसते.
दावे गंभीर, पण पुष्टी आवश्यक
नूर खान एअरबेसवरील अमेरिकन अण्वस्त्रांबाबत पाकिस्तानातील काही वर्तुळांमध्ये दावा केला जात असला तरी त्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. तथापि, अमेरिका विविध देशांमध्ये आपली अण्वस्त्रे ठेवते, हे खुल्या स्त्रोतांमधून सिद्ध झाले आहे. भारताने अशा ठिकाणी केलेल्या कारवायांमुळे जागतिक स्तरावर चर्चेचा विषय निर्माण झाला असून, या घटनेने अमेरिकेच्या गुप्त लष्करी हालचालींबाबत अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. भविष्यात अधिकृत माहिती समोर आल्यावरच या दाव्यांमध्ये कितपत तथ्य आहे हे स्पष्ट होईल.