Movement underway in Pakistan for release of former Prime Minister Imran Khan
इस्लामाबाद : सध्या पाकिस्तानमध्ये राजकीय गोंधळ सुरु आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या तहरीक-ए-तालिबान (PTI) पक्ष आणि सत्ताधारी पक्ष मुस्लिम लीग-नवाज (PML-N) मध्ये पुन्हा एकदा संघर्ष सुरु झाला आहे. यामुळे सध्या पाकिस्तानमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
पाकिस्तानच्या विरोधी पक्ष पीटीआयने संस्थापक आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या सुटकेसाठी देशव्यापी निषेधाची घोषणा केली आहे. शनिवारी पीटीआय पक्षाच्या नेत्यांनी लाहौरमध्ये बैठकीसाठी उपस्थित राहण्यास सुरुवात केली आहे. लाहोरमधून ५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या आंदोलनाची ही औपचारिक बैठक आहे.
पीटीआयचे कार्यवाहक अध्यक्ष बॅरिस्टर गोहर अली खान, केपीचे मुख्यमंत्री गंडापूर आणि पंजाब विधानसभेचे विरोधी पक्षनेते मलिक अहमद यांच्या लाहोरमध्ये बैठक सुरु आहे. यापूर्वी देखील इस्लामाबादमध्ये पक्ष नेत्यांची बैठक झाली होती. यानध्ये पंचाब विधानसभेतून निलंबित केलेल्या आमदारांची परिस्थिती आणि आंदोलनाच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली होती.
शिवाय पाकिस्तानमध्ये पुढच्या महिन्यात ५ ऑगस्टपासून इम्रान खान फ्री मूव्हमेंट सुरु करण्याची घोषणा इम्रान खानच्या मुलांनी केली आहे. यामुळे त्यांना अटक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री अली अमीन गंडापूर यांनी याची अधिकृत माहिती देताना लष्कर मार्शल लॉ लागू करत असल्याचे म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, लष्कराने देशावर बरेच वर्षे राज्य केले आहे. अनेकवेळा अनाधिकृतपणे मार्शल लॉ चालवला आहे.
तसेच इम्रान खान यांना कोणत्याही वैध आरोपांशिवाय तुरुंगवासात पाठवण्यात आले आहे. गंडापूर यांनी सांगितले की, स्थानिक प्रांतामध्ये लष्कर आणि सरकारच्या विरोधात तीव्र निषेधाचे आवाहन त्यांनी केले आहे.
१६ जानेवारी रोजी पाकिस्तानच्या न्यायालयाने माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांच्यावर भष्ट्राचाराचे आरोप लावले. तसेच इम्रान खान यांना १४ वर्षे तुरुंगवास आणि बुशराला ७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. दोघांवर ५० अब्ज पाकिस्तान रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप करण्यात आले आहे. ९ में २०२३ मध्ये इम्रान खान यांना भ्रष्ट्राचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. सरकारची अब्जावधी रुपयांची जमीन विकल्याचा आरोप इम्रान खान यांच्यावर आहे. ही जमीन बुशरा बीबीच्या अल-कादिर ट्रस्टला स्वस्त दरात विकली असल्याचा आरोप आहे.