Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Myanmar Election : सत्तापालटानंतर ५ वर्षांनी म्यानमारमध्ये निवडणुका ; पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात

Myanmar Elections 2025 : भारताचा शेजारी देश म्यानमारमध्ये सार्वत्रिक निवडणुकांना सुरुवात झाली आहे. लष्करी देखरेखीखाली निवडणुकाच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आद पार पडत आहे. सत्तापालटानंतर पाच वर्षांनी निवडणुका होत आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 28, 2025 | 02:26 PM
Myanmar election 2025

Myanmar election 2025

Follow Us
Follow Us:
  • सत्तापालटानंतर ५ वर्षांनी म्यानमारमध्ये निवडणुका
  • पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
  • लष्करी देखरेखीखाली सुरु प्रक्रिया
Myanmar Election News in Marathi : नेपिदाव : भारताचा शेजारी देश म्यानमार(Myanmar) मध्ये तब्बल पाच वर्षांनी निवडणुका होत आहेत. २०२५ च्या सार्वत्रिक निवडणुकांची प्रक्रिया सध्या सुरु झाली आहे. २०२१ मध्ये लष्कराने सत्तापालट करत आंग सान सू यांच्या सरकारला उलथवून टाकले होते. या सत्तापलटानंतर पाच वर्षांनी या निवडणुका होत आहेत. या सत्तापालटानंतर म्यानमारमध्ये हिंसाचार, गृहयुद्धाची सुरुवात झाली होती. तसेच मोठ्या प्रमाणावर हिंसक आंदोलने देखील झाली. सध्या देखील हिंसाचाराचे वातावरण आहे. परंतु लष्करी संघटनांनी निवडणुका पार पडण्याचे ठरवले असून या तीन टप्प्यात होणार आहेत.

Myanmar Earthquake : भूकंपाच्या जोरदार धक्क्यांनी हादरली म्यानमारची जमिन; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

लष्कराच्या देखरेखीखाली सुरु मतदान

मीडिया रिपोर्टनुसार, आज रविवारी (२८ डिसेंबर) पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. दुसरा टप्पा हा ११ जानेवारी २०२६ रोजी, तर तिसरा टप्पा २५ जानेवारी २०२६ रोजी पार  पडणार आहे. म्यानमारच्या लष्करी प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या निवडणुका देशात पुन्हा लोकशाही  प्रस्थापित करण्यासाठी घेण्यात येत आहेत. परंतु याला मानवाधिकार संघटना, विरोध पक्ष आणि आंतरराष्ट्रीय समुदायाने विरोध केला आहे. सध्या मान्यानमारमध्ये लष्कराच्या कडेकोट बंदोबस्तामध्ये मतदान पार पडत आहे.

लष्कराच्या दबावाखाली मतदानाची प्रक्रिया

अनेक भागांमध्ये लष्कराकडून मतदानावर थेट देखरेख केली जात आहे. लष्कर निवडणूक प्रक्रियेवर टीका करणाऱ्यांना थेट अटक करत आहे. तसेच यासाठी विशेष कायदे देखील लागू करण्यात आले आहेत. हजारो कार्यकर्ते आणि नागरिकांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विरोधी पक्ष आणि मानवाधिकार संघटना, आंतरराष्ट्रीय समुदयाने लष्कर निवडणूकांमध्ये हस्तक्षेप करत असल्याचा आरोप केला आहे.  या निवडणुकांमध्ये लष्कराचा पाठिंबा असलेल्या पक्षांचे वर्चस्व प्रस्थापित होत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान म्यानमानचे माजी सरकारच्या आंग सान सू यांच्या नॅशनल डेमोक्रॅसी (NLD) पक्ष बरखास्त करण्यात आला आहे. यामुळे निवडणुका निष्पक्ष आणि मुक्त नसल्याचा आरोप मानवाधिकार संघटनांनी केला आहे.

म्यानमारमधील गृहयुद्धाचा निवडणुकांवर परिणाम

म्यानमारमध्ये गेल्या पाच वर्षांपासून गृहयुद्ध सुरु आहे. सततच्या युद्धामुळे म्यानमारमधील अनेक भागांमध्ये मतदान होऊ शकलेले नाही. सीमावर्ती प्रदेश, ग्रामीण भाग आणि संघर्षग्रस्त क्षेत्रांमधील निवडणुका लष्कराने रद्द केल्या आहेत. गेल्या काही महिन्यात विद्रोही गट आणि लष्करातील युद्धामुळे म्यानमाध्ये प्रचंड घबराटीचे वातावरण आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर या निवडणुकांना विरोध केला जात आहे. अमेरिका आणि अनेक पाश्चिमात्य देशांनी  या निवडणुकांना मान्यता देण्यास नकार दिला आहे. जपान, मलेशिया यांसारख्या आशियाई देशांनी देखील टीका केली आहे. सध्या गृहयुद्धाच्या काळात निष्पक्ष निवडणुका म्यानमारमध्ये पार पडतील का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Myanmar Airstrike : म्यानमारमध्ये गृहयुद्धाचा कहर! रुग्णालयात हवाई हल्ल्यात 30 जणांचा मृत्यू, 70 जण जखमी

Web Title: Myanmar election 2025 in 5 years after coup first phase voting begins

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 28, 2025 | 02:26 PM

Topics:  

  • Myanmar
  • World news

संबंधित बातम्या

Sam Altman: ‘मिसाइल बनवणे ते युद्धाचे निर्णय घेणे, AI घेणार जगाचा ताबा’; UN बैठकीत एआय कंपन्यांच्या प्रमुखांचा जगाला गंभीर इशारा
1

Sam Altman: ‘मिसाइल बनवणे ते युद्धाचे निर्णय घेणे, AI घेणार जगाचा ताबा’; UN बैठकीत एआय कंपन्यांच्या प्रमुखांचा जगाला गंभीर इशारा

NAZA Documentary : कोण जगेल कोण मरेल… हे ठरवतो इस्रायलचा हा छोटा संगणक; ‘नाझा’ माहितीपटाचा खळबळजनक खुलासा
2

NAZA Documentary : कोण जगेल कोण मरेल… हे ठरवतो इस्रायलचा हा छोटा संगणक; ‘नाझा’ माहितीपटाचा खळबळजनक खुलासा

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली
3

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली

Israel Elections 2026 : इस्रायलमध्ये मुस्लिमांना मतदार यादी आणि निवडणुकीतून वगळण्याची तयारी; नेतान्याहूंचा सत्तेसाठी मोठा डाव?
4

Israel Elections 2026 : इस्रायलमध्ये मुस्लिमांना मतदार यादी आणि निवडणुकीतून वगळण्याची तयारी; नेतान्याहूंचा सत्तेसाठी मोठा डाव?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.