Myanmar Earthquake : भूकंपाच्या जोरदार धक्क्यांनी हादरली म्यानमारची जमिन; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण (फोटो सौजन्य: @ani_digital)
Japan Earthquake : ७.५ रिश्टर स्केलवर १ मिनिटं थरथरली जपानची भुई ; अंगावर काटा आणणारे VIDEO व्हायरल
NCS ने दिलेल्या माहितीनुसाj, या भूकंपाची (Earthquake) खोली सुमारे १०० किमी खोल होती. या भूकंपाच्या काही दिवसांपूर्वी देखील ११५ किमी खोलीवर ३.९ तीव्रतेचा भूकंप झाला होता, तर याआधी ११ डिसेंबर रोजी ३.८ तीव्रतेच्या आणि १० डिसेंबर रोजी ४.६ तीव्रतेचा भूकंपा झाला होता. या सततच्या भूंकपामुळे मोठ्या विनाशकारी भूकंपाची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
सुदैवाने या भूकंपामुळे कोणत्याही जीविताहीनची माहिती समोर आलेली नाही. NCS ने दिलेल्या माहितीनुसार,म्यानामार हे भूकंपप्रवण आणि नैसर्गिक आपत्ती क्षेत्र आहे. लांब किनारपट्टीमुळे म्यानमार सतत मध्यम आणि मोठ्या तीव्रतेच्या भूकंपाला बळी पडत असतो. म्यानमार हा चार टेक्टोनिक प्लेट्स इंडिया, युरेशियन सुंडा, बर्मा प्लेट्सवर स्थित आहे. या प्लेट्सच्या सततच्या घर्षणामुळे मोठया प्रमाणात उर्जा बाहेर पडते, ज्यामुळे म्यानमारमध्ये भूकंपाच्या घटना घडतात. तसेच त्सुनामीचा धोकाही असतो.
म्यानमारचे भूगर्भीय क्षेत्र १,४०० किलोमीटर लांबीचे आहे. हे क्षेत्र अंदमान विस्तार केंद्राला उत्तरेकडे जोडलेले आहे. याला सागिंग फॉल्ट असे म्हटले जाते. यामुळे या भागात सागिंग, मंडाले, बागे आणि यांगून सारख्या प्रदेशांमध्ये भूकंप सतत होत असतात. म्यानमारच्या लोकसंख्येपैकी ४६% लोकसंख्या या प्रदेशांमध्ये राहते. यामुळे येथील लोकांचे जीवन सतत धोक्यात असते. नुकत्याच झालेल्या भूकंपामुळे देखील परिसरात भीतीचे वातावरण पसरलेले आहे.
या वर्षी म्यानमारमध्ये म्यानमारमध्ये ७.७ तीव्रतेचा भूकंप आला, ज्यामुळे मोठा विध्वंस झाला होता. या भूकंपात २७०० हून अधिक लोकांचा बळी गेलाा होता, हजारो लोक जखमी झाले होते. भूकंपामुळे म्यानमारमधील पायाभूत सुविधा, रस्ते, आणि निवासी इमारतींचे मोठे नुकसान झाले होते.
Earthquake of magnitude 4.4 strikes Myanmar Read @ANI Story | https://t.co/ufr4r32yWu#Myanmar #Earthquake #NCS pic.twitter.com/wOwyZnmq9E — ANI Digital (@ani_digital) December 18, 2025
अलास्का-कॅनडा सीमेजवळ भूकंपाचे जोरदार झटके ; ७.० रिश्टर स्केलच्या तीव्रतेने हादरली जमीन
Ans: म्यानमरमध्ये नुकत्याच झालेल्या भूकंपाची तीव्रता ४.४ रिश्टर स्केलवर इतकी नोंदवण्यात आली आहे.
Ans: नमार हे चार टेक्टोनिक प्लेट्सच्या म्हणजेच भारतीय, युरेशियन, सुंडा आणि बर्मा प्लेट्सच्या जंक्शनवर स्थित आहे. या प्लेट्सचे एकमेकांवर आदळल्याने घर्षण होते आणि उर्जेचा विस्फोट होतो. यामुळे या भागामध्ये सतत भूकंप होत असतात.






