NATO chief advises Ukrainian President Zelensky to imporve relations with Trump
सध्या डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष यांच्यात तीव्र वाद सुरु असून जागतिक पातळीवर राजकीय वातावरण तापले आहे. अमेरिकेने युक्रेनला मिळणारी लष्करी आणि शस्त्रास्त्र मदत बंद केली आहे. मात्र, दुसरीकडे युरोपियन देशांकडून युक्रेनला पाठिंबा मिळत आहे. याचवेळी नाटोचे महासचिव मार्क रुटे यांनी झेलेन्स्कींवर टीका केली आहे. मार्क रुटे यांनी झेलेन्स्की यांना डोनाल्ड ट्रम्पसोबत संबंध सुधारण्याचा सल्ला दिला आहे. हा सल्ला व्हाइट हाउसमध्ये झालेल्या ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यातील तीव्र वादानंतर आला आहे.
डिप्लोमॅटिक मार्गाने संवाद साधा
रुटे यांनी झेलेन्स्कींना आठवण करुन दिली की, 2019 मध्ये युक्रेनला जेवलिन अँटी-टँक क्षेपणास्त्रे पुरवण्याचा निर्णय ट्रम्प यांचा होता, या निर्णयाचा आदर युक्रेनने करायला हवा. त्यांनी म्हटले की, युक्रेनमध्ये कायमस्वरुपी शांतता प्रस्थापित करण्यासाठी अमेरिका पूर्णपणे गुंतलेली आहे. यामुळे झेलेन्स्की यांनी ट्रम्पसोबत डिप्लोमॅटिक मार्गाने संवाद साधावा आणि वाद मिटवण्याचा प्रयत्न करावा.
युरोपियन नेत्यांकडून शांतता करारासाठी मदतीची अपेक्षा
रुटे यांनी हेही स्पष्ट् केले की, युरोपियन नेते लंडनमध्ये रविवारी बैठक घेणार आहेत. युरोपियन देश युक्रेनला सुरक्षा हमी देण्यासाठी एकत्र येणार आहेत. यामुळे भविष्यात रशियासोबत शांतता करार शक्य होईल. रुटे यांनी युरोपियन महासंघ आणि नाटोच्या देशांनी यूक्रेनच्या सुरक्षेसाठी योगदान देण्याचे आवाहन केले आहे.
ओवल ऑफिसमध्ये ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यात तीव्र वाद
डोनाल्ड ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यात अमेरिकेच्या ओव्हल ऑफिसमध्ये बैठक झाली. या बैठकीत दोघांमध्ये जोरदार वादविवाद झाला. या वादानंतर झेलेन्स्की व्हाइट हाउस सून निघून गेले. या घटनेनंतर युरोपियन देश तसेच अमे आंतरराष्ट्रीय नेत्यांनी झेलेन्स्की यांना पाठिंबा दर्शवला. मात्र, व्हाइट हाउस ट्रम्प यांच्या बाजून उभा राहिला.
युरोपियन युनियनचा युक्रेनला पाठिंबा
ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यातीव वादामुळे यूक्रेनच्या मुद्द्यावर अमेरिका आणि युरोपमधील बिघडलेल्या संबंधांमध्ये आणखी एक दरी पडली. युरोपियन आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वेन डेरे लेयेन यांनी, झेन्स्कींना पाठिंबा दिला. त्यांनी म्हटले की, “तुम्ही दाखवलेली प्रतिष्ठा आणि धैर्य हे यूक्रेनच्या नागरिकांच्या शौर्याचे प्रतीक आहे.” ही संपूर्ण घटना अमेरिका आणि युरोपमधील राजकीय तणावाचे प्रतिबिंब असल्याचे मानले जात आहे. पुढील काही दिवसांत नाटो आणि युरोपियन महासंघाच्या हालचाली महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.