Navratri 2025 Celebration in Thailand VIDEO
Navratri Celebration in Thailand : बॅंकॉक : नवरात्री उत्सवाचा आज चौथा दिवस आहे. संपूर्ण राज्यभरात नवरात्री मोठ्या उत्साहात साजरा केली जाते. या नवरात्री उत्सवात देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. याशिवाय घरात घटस्थापना करून घट बसवला जातो. नऊ दिवस देवीची भक्तीभावाने पूजा केली जाते. पण तुम्हाला माहित आहे का आपल्या भारतीय संस्कृतीचा प्रभाव परदेशातही पाहायला मिळाला आहे.
होय, भारताप्रमाणे थायलंमध्येही नवरात्रीचे सेलिब्रेशन करण्यात आले आहे. याचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. यामध्ये दोन तरुण दुर्गा देवीसमोर नृत्य सादर करताना दिसत आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सांगण्यात आले आहे की, अगदी भारताच्या संस्कृतीप्रमाणे दिवेची विधीपूर्वीक पूजा करुन, पौराणिक कथा सादर करुन, देवीसमोर तांडव नृत्य सादर करुन नवरत्रीचे सेलिब्रेशन करण्यात आले आहे.
देशात या ठिकाणी आहे कुश्मांडा देवीच प्राचीन मंदिर, फक्त पाणी लावल्याने डोळ्यांचे आजार होतात बरे
थायलंडच्या एका मंदिरामध्ये देविची महाकाय मुर्ती बसवण्यात आली आहे. आरती, भजन, आणि मंत्रोच्चार करण्यात आला आहे. येथील नागरिकांना रस्ते देखील रंगीबेरंगी फुलांनी सजवले आहे. थायवंडच्या लोकांनी अगदी भक्तीभावाने दुर्गा मातेची पूजा केली आहे. नवरात्रीत नऊ दिवस देवची भक्ती, पौराणिक कथांचे पठण केले जाते. यावेळी गरब्याचे आयोजन केले जाते. हे सर्वा थायलंडमध्येही पाहायला मिळाले आहे. भारतीय पौराणिक कथांमधून लोकांना आस्थेचा अनुभव मिळत आहे. प्रच्येक विधी, पूजा, भजन केले जात आहे. थायलंडमध्ये देवीचा घाटनही घालण्यात आला आहे.
थायलंडमधील हा उत्सव केवळ सांस्कृतिक नाही, तर जागतिक स्तरावर भारतीय परंपरेचे आणि भक्तीचे प्रभावाचे प्रतीक आहे. यावरुन आपली भारतीय संस्कृती जगभरातील लोकांना प्रेरणा देते हे दिसून येते आहे. भाषा, देश किंवा सीमेचा प्रभाव विसरुन लोक आनंद साजरा करत आहेत. व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून लोकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी हीच आपली भारतीय संस्कृती आहे. सर्वांना आपले बनवून घेते. याचा अभिमान असल्याचे लोकांनी म्हटले आहे.
FAQs(संबंधित प्रश्न)
परेदशात कुठे साजरी करण्यात आली नवरात्री?
भारतीय संस्कृतीचा प्रभाव आता पदेशातही पाहायला मिळत आहे. भारताप्रमाणेच थायलंडमध्येही नवरात्रीचा उत्सव आनंदाने सजार करण्यात आला आहे.
थायलंडमध्ये कशी साजरी करण्यात आली नवरात्री?
थायलंडमध्येही भारताप्रमाणेच देवीचा घाट घालून, विधीपूर्वी पूजा करुन, पौराणिक कथा सादर करुन, देवीसमोक नृत्य सादर करुन नवरात्रीचा उत्सवर साजरा केला जात आहे.
Shardiya Navratri 2025: घरी पुजारीशिवाय हवन कसे करावे? जाणून घ्या पद्धत आणि महत्त्व