Neapl Karfews lifted Indian Ambassadr meet New Interim PM Suhsila Karki
India Neapl Relations : काठमांडू/नवी दिल्ली : नेपाळमध्ये एक नव्या राजकीय पर्वाची सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या आंदोलनांतर आता देशात शांतता प्रस्थापित झाली आहे. नेपाळच्या अंतरिम सराकरीच सूत्रे माजी महिला सर न्यायाधीश सुशीला कार्की यांनी हाती घेतली आहे. दरम्यान काठमांडूतील कर्फ्यू देखील हटवण्यात आला आहे. सध्या परिस्थिती आता पूर्वीसारखी सामान्य होत चालली आहे. याच वेळी भारताच्या पंतप्रधानांनी नेपाळच्या नव्या पंतप्रधानांचे अभिनंदन केले आहे. तसेच नेपाळमधील भारतीय राजदूतांनी देखील सुशीला कार्की यांची भेट घेतली आहे.
भारतीय राजदूतांची नव्या पंतप्रधानांना भेट
नेपाळमधील भारतीय राजदूत नवीन श्रीवास्तव यांनी नेपाळच्या नव्या पंतप्रधान सुशीला कार्की यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कार्की यांचे अभिनंदन केले. तसेच संकटाच्या काळात भारताच्या मदतीचेही आश्वासन दिले. नेपळाच्या अंतरिम सराकच्या पंतप्रधान पदाची सुशीला कार्की यांनी शपथ घेतल्यानंतर लगेच ही भेट झाली होती. यामुळे नेपाळच्या नव्या पंतप्रधानांनी भेट घेणारे भारतीय राजदूत श्रीवास्तवर पहिलेच परदेशी राजदूत ठरले.
नेपाळच्या काठमांडूमधील कर्फ्यू हटवला
नेपाळमध्ये ८ आणि ९ सप्टेंबरला सरकारच्या सोशल मीडियावरील बंदीविरोधात आंदोलन सुरु झाले होते. नेपाळच्या जनरेशन-झेड तरुणांनी ओली सरकारविरोधात बंड पुकारला होता. यामुळे गेले चार दिवस नेपाळमध्ये अनेक भागात अस्थिरता निर्माण झाली होती. यामुळे देशात कर्फ्यू आणि निर्बंध लागू करण्यात आले होती पण आज पहाटे पाच वाजल्यापासून कर्फ्यू हटवण्यात आला आहे यामुळे लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे
दरम्यान शुक्रवारी (१२ सप्टेंबर) नेपाळच्या अंतरिम सरकारची स्थापना झाली असून सुशीला कार्की यांनी याची सूत्रे हाती घेतली आहेत. देशात परिस्थिती सामान्य होत चालली आहे. पण काही दिवस रस्त्यावर लष्कर आणि सुरक्षा दल तैनात केले जाणार आहेत.
नेपाळमध्ये निवडणूका कधी होणार?
मिळालेल्या माहितीनुसार, अंतरिम सरकार स्थापन झाले असून नेपाळमध्ये ५ मार्च २०२६ पूर्वी निवडणुका होणार असल्याची माहिती मिळाली आहे. राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी सध्याचे प्रतिनिधी सभागृह बरखास्त केले आहे. तसेच नवीन प्रतिनिधी सभागृहाच्या निवडणुकीची तारिख ही निश्चित केली आहे. नव्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या शिफारशीनंतर
हा निर्णय घेण्यात आला आहे.
भारताकडूने नेपाळच्या नव्या पंतप्रधानांचे स्वागत
याच वेळी भारताकडून नेपाळच्या अंतरिम सरकारच्या पंतप्रधानांचे स्वागत करण्यात आले आहे. तसेच भारत नेपाळच्या नागरिकांच्या शांतता आणि समृद्धीसाठी नेहमीच उभा राहिला असा पाठिंबा देखील दर्शवण्यात आला आहे.
FAQs ( संबंधित प्रश्न)
काठमांडूत का लागू करण्यात आला होता कर्फ्यू?
नेपाळमध्ये ओली सरकारविरोधीत जनरेशन-झेडचे तीव्र आंदोलन सुरु झाले होते. यामुळे देशात हिंसक स्थिती निर्माण झाली होती. यामुळे नेपाळची राजधानी काठमांडूत कर्फ्यू लागू करण्यात आला होता.
काठमांडूतील कर्फ्यू हटवला का?
हो, आज पहाटे पाच वाजल्यापासून काठमांडूतील संचारबंदी हटवण्यात आली असून, सध्या परिस्थिती सामान्य होत चालली आहे.
नेपाळच्या निवडणूका कधी होणार?
मिळालेल्या वृत्तानुसार, नेपाळमध्ये ५ मार्च २०२६ पूर्वी निवडणूका होणार आहेत.
नेपाळच्या पंतप्रधानपदी Sushila Karki; राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर तातडीने घेतली शपथ