Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

India Russia Ties: ‘मी किंवा पंतप्रधान मोदी…’ पुतिन यांनी ट्रम्पना दिला थेट संदेश; भारत-रशिया संबंधांवर निर्णायक विधान

Putin India Visit : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन म्हणाले की, भारत आणि रशियामधील वाढता सहकार्य कोणत्याही तिसऱ्या देशाच्या विरोधात नाही, अगदी अमेरिकेच्याही नाही.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Dec 05, 2025 | 09:33 AM
Neither I nor Modi are against anyone Putin's direct message to Trump Big statement on India-Russia relations

Neither I nor Modi are against anyone Putin's direct message to Trump Big statement on India-Russia relations

Follow Us
Close
Follow Us:
  • भारत–रशिया सहकार्य कोणत्याही तिसऱ्या देशाच्या विरोधात नाही, असा स्पष्ट संदेश व्लादिमीर पुतिन यांनी दिला.
  • अमेरिकेच्या टॅरिफ आणि व्यापार धोरणांवर भाष्य करताना पुतिन यांनी ‘रशिया अशी पद्धत स्वीकारत नाही’ असे स्पष्ट केले.
  • ऊर्जा खरेदीवरून होत असलेल्या टीकेला उत्तर देताना पुतिन यांनी अमेरिकाच स्वतः रशियाकडून अणुइंधन खरेदी करते, हे ठाम शब्दांत सांगितले.
India Russia Relations : भारत आणि रशियामधील (India and Russia) ऐतिहासिक संबंध अधिक बळकट होत असताना, त्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर भारत भेटीपूर्वी क्रेमलिन येथे एका मुलाखतीदरम्यान रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी अत्यंत स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली. भारत आणि रशियामधील वाढते सहकार्य कोणत्याही तिसऱ्या देशाच्या, अगदी अमेरिकेच्याही विरोधात नाही, असे ते म्हणाले. ही भागीदारी केवळ दोन्ही देशांच्या विकासासाठी, सुरक्षेसाठी आणि आर्थिक प्रगतीसाठी आहे, हा संदेश त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केला.

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या टॅरिफ धोरणांवर प्रतिक्रिया विचारली असता, पुतिन यांनी अत्यंत संयत भाष्य केले. त्यांनी सांगितले की, प्रत्येक देशाचा स्वतःचा आर्थिक अजेंडा असतो आणि अमेरिकेने घेतलेले निर्णय त्यांच्या सल्लागारांच्या मार्गदर्शनाखाली असतात. मात्र, रशिया अशा प्रकारच्या व्यापारी दबावाच्या धोरणांवर विश्वास ठेवत नाही. आमची अर्थव्यवस्था खुली आहे आणि आम्ही जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांचे पालन करतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Modi Putin Meet: राजनैतिक चौकटीपलीकडील संवाद! PM मोदींनी प्रोटोकॉल तोडून केले मित्राचे स्वागत; ‘Limousine Diplomacy’ पुन्हा चर्चेत

“मेक इन इंडिया, मेक विथ रशिया” या संकल्पनेबद्दल बोलताना पुतिन म्हणाले की, बाह्य दबाव असला तरी मी किंवा पंतप्रधान मोदी कधीही कोणत्याही देशाविरोधात एकत्र येण्याचा विचार करणार नाही. आमचे सहकार्य कोणाला लक्ष्य करून नाही, तर स्वतःच्या देशाच्या हितासाठी आहे. ट्रम्प यांचा स्वतःचा राजकीय आणि आर्थिक अजेंडा आहे, आणि आमचा स्वतःचा. आम्ही कोणाचेही नुकसान करत नाही, तर सहकार्याची भूमिका घेतो, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

 

Neither me nor Prime Minister Modi have EVER collaborated to work AGAINST anyone, ‘despite external pressure’ — Putin ‘In our dealings we cause no harm to others, and I believe leaders from other countries should appreciate this’ https://t.co/Wt4JTC3Rw0 pic.twitter.com/a0YW1G2jq7 — RT (@RT_com) December 4, 2025

credit : social media and Twitter

रशियाकडून तेल खरेदी करून भारत “युद्धाला निधी देत आहे” या आरोपांवर उत्तर देताना पुतिनांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. कोणत्याही मित्र राष्ट्रांविषयी असे विधान करण्याचा अधिकार कुणालाही नाही, असे ते म्हणाले. तसेच एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी सांगितले की, अमेरिका स्वतःही रशियाकडून अणुइंधन खरेदी करते. अमेरिकेतील अणुऊर्जा प्रकल्पांमध्ये आजही रशियातून येणारे युरेनियम वापरले जाते. मग जर अमेरिकेला तो अधिकार आहे, तर भारताला तोच अधिकार का नसावा, असा सवाल पुतिन यांनी उपस्थित केला.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : War Update : बलुचिस्तान की खैबर पख्तूनख्वा…कोण आधी मुक्त होणार? पाकिस्तानवरून मोठी बातमी; मुनीरचे कंबरडे मोडणार

भारत आणि रशियामधील ऊर्जा सहकार्य, संरक्षण, व्यावसायिक करार आणि तंत्रज्ञानातील भागीदारी येत्या काळात अधिक गहिरी होणार असल्याचे संकेतही या वक्तव्यातून मिळतात. ही भागीदारी कोणत्याही राजकीय दबावाला न जुमानता केवळ दीर्घकालीन धोरणात्मक हितसंबंधांवर आधारित असेल, हेच पुतिन यांच्या वक्तव्यातून स्पष्ट होते. जागतिक राजकारणाच्या या गुंतागुंतीच्या समीकरणात भारताचा स्वतंत्र आणि स्वायत्त निर्णय घेण्याचा अधिकार रशियाने स्पष्टपणे मान्य केल्यामुळे, भारताच्या परराष्ट्र धोरणाला आंतरराष्ट्रीय स्तरावर आणखी बळ मिळाले आहे. आजच्या बदलत्या जागतिक राजकारणात, “कोणाविरोधात नाही, तर स्वतःच्या प्रगतीसाठी” हा पुतिन यांचा संदेश विशेष महत्त्वाचा ठरत आहे, आणि भारत–रशिया संबंधांचा नवा अध्याय सुरू होत असल्याचे स्पष्ट चित्र पुढे येत आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पुतिन यांनी ट्रम्प यांना नेमका काय संदेश दिला?

    Ans: भारत–रशिया सहकार्य कोणत्याही देशाच्या विरोधात नसल्याचे स्पष्ट केले.

  • Que: पुतिन यांनी कोणते अमेरिकन वास्तव समोर आणले?

    Ans: अमेरिका स्वतः रशियाकडून अणुइंधन खरेदी करते, हे त्यांनी सांगितले.

  • Que: भारत–रशिया सहकार्याचा मुख्य उद्देश काय आहे?

    Ans: विकास, ऊर्जा आणि राष्ट्रीय हितांचे संरक्षण हेच प्रमुख ध्येय आहे.

Web Title: Neither i nor modi are against anyone putins direct message to trump big statement on india russia relations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 05, 2025 | 09:33 AM

Topics:  

  • India Russia relations
  • International Political news
  • PM Narendra Modi
  • Vladimir Putin

संबंधित बातम्या

Modi Putin Meet: राजनैतिक चौकटीपलीकडील संवाद! PM मोदींनी प्रोटोकॉल तोडून केले मित्राचे स्वागत; ‘Limousine Diplomacy’ पुन्हा चर्चेत
1

Modi Putin Meet: राजनैतिक चौकटीपलीकडील संवाद! PM मोदींनी प्रोटोकॉल तोडून केले मित्राचे स्वागत; ‘Limousine Diplomacy’ पुन्हा चर्चेत

‘सर मला गुप्तहेर बनवा…’, 16 वर्षीच पुतीन KGB मध्ये भरतीसाठी पोहचले, ‘या’ चित्रपटाचा झाला होता परिणाम
2

‘सर मला गुप्तहेर बनवा…’, 16 वर्षीच पुतीन KGB मध्ये भरतीसाठी पोहचले, ‘या’ चित्रपटाचा झाला होता परिणाम

Putin Visit To India: पुतीन यांची दिल्ली वारी, चर्चा मात्र मुंबईची! पंतप्रधान मोदींसोबतच्या ‘त्या’ व्हिडिओमुळे चर्चेला उधान
3

Putin Visit To India: पुतीन यांची दिल्ली वारी, चर्चा मात्र मुंबईची! पंतप्रधान मोदींसोबतच्या ‘त्या’ व्हिडिओमुळे चर्चेला उधान

Putin in India: पुतिन यांचे दिल्लीत आगमन! पंतप्रधान मोदींनी गळाभेट घेऊन केले भव्य स्वागत, उद्या होणार द्विपक्षीय चर्चा
4

Putin in India: पुतिन यांचे दिल्लीत आगमन! पंतप्रधान मोदींनी गळाभेट घेऊन केले भव्य स्वागत, उद्या होणार द्विपक्षीय चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.