
राष्ट्रपती उभ्या आणि पंतप्रधान बसलेले? व्हायरल फोटोवर भाजपने मांडली खरी बाजू (photo Credit- X)
ममता बॅनर्जी यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये भारतरत्न लालकृष्ण आडवाणी यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती मुर्मू उभ्या असून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) खुर्चीवर बसलेले दिसत आहेत. “पंतप्रधान मोदी राष्ट्रपतींचा सन्मान करत नाहीत, हे या फोटोवरून सिद्ध होते. जर त्यांना खरोखरच आदर असेल, तर राष्ट्रपती उभ्या असताना ते स्वतः कसे काय बसू शकतात?” असा थेट सवाल ममतांनी विचारला आहे. तृणमूल काँग्रेसने (TMC) या फोटोचा वापर करत भाजपला आदिवासी महिला राष्ट्रपतींच्या विरोधात असल्याचे चित्र रंगवण्याचा प्रयत्न केला.
TMC’s fake news factory at it again. Truth behind TMC’s manufactured outrage: Per official Bharat Ratna protocol, others remain seated during conferment. No breach of decorum. Shameful that @AITCofficial is twisting a dignified moment involving President Smt. Droupadi Murmu,… pic.twitter.com/23jRVIczuY — JIGNESH܁ᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠ (@jignesh03011976) March 9, 2026
टीएमसीच्या या दाव्यावर भाजपने अधिकृतरीत्या फॅक्ट-चेक करत प्रत्युत्तर दिले आहे. “भारतरत्न प्रदान करण्याच्या अधिकृत प्रोटोकॉलनुसार, राष्ट्रपती सन्मान चिन्ह प्रदान करत असताना इतर मान्यवर बसलेले राहतात. यात कोणताही शिष्टाचार भंग झालेला नाही,” असे भाजपने स्पष्ट केले. हा एक अत्यंत गरिमामय क्षण होता आणि त्याचे राजकीय भांडवल करणे हे लज्जास्पद आहे. देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदाचा आदर राखा आणि चुकीची माहिती पसरवणे थांबवा, असे आवाहन भाजपने टीएमसीला केले आहे.
या संपूर्ण वादाची सुरुवात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दार्जिलिंग दौऱ्यापासून झाली. ९ व्या आंतरराष्ट्रीय संथाल संमेलनात सहभागी होण्यासाठी राष्ट्रपती आल्या असताना, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांचे मंत्री उपस्थित नव्हते. राष्ट्रपतींनी यावर आश्चर्य व्यक्त करत म्हटले की, “साधारणपणे राष्ट्रपतींच्या आगमनावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वागत करणे अपेक्षित असते. ममता माझ्या धाकट्या बहिणीसारख्या आहेत, पण त्या का नाराज आहेत हे मला समजत नाही.” संमेलनाच्या तयारीतील त्रुटी आणि राज्य सरकारच्या उदासीनतेवरही राष्ट्रपतींनी टिप्पणी केली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत टीएमसी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. “एका आदिवासी महिला राष्ट्रपतींचा अशा प्रकारे अपमान करणे हा लोकशाही आणि संविधानाचा अपमान आहे,” असे पंतप्रधान म्हणाले. दरम्यान, केंद्र सरकारने या प्रोटोकॉल उल्लंघनाबाबत पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांकडून अहवाल मागवला आहे. राष्ट्रपतींच्या स्वागताला कोणाचीही उपस्थिती नसणे, कार्यक्रम स्थळी पाण्याच्या सुविधेचा अभाव आणि मार्गावरील कचरा अशा गंभीर त्रुटींचा उल्लेख या अहवालात करण्यात आल्याचे समजते.