nepal drone video 51 seconds leaders river scene viral
नेपाळात राजधानी काठमांडूसह अनेक शहरांमध्ये हिंसाचार, जाळपोळ आणि तोडफोड सुरूच असून सैन्य तैनात केले गेले आहे.
सोशल मीडियावर ड्रोनमधून घेतलेला ५१ सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल, निदर्शकांनी नेत्यांना नदीत फेकल्याचा दावा.
हिंसाचार नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून नेपाळी लष्कराने देशभर कर्फ्यूची घोषणा केली.
Nepal viral drone video 51 seconds : नेपाळ सध्या आपल्या इतिहासातील सर्वात गंभीर आणि अशांत टप्प्यातून जात आहे. राजधानी काठमांडूच्या रस्त्यांपासून ग्रामीण भागातील गावांपर्यंत आंदोलकांचा संताप उफाळून आला असून, देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सैन्य तैनात असतानाही आंदोलने शमण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नाही.
दरम्यान, सोशल मीडियावर फक्त ५१ सेकंदांचा एक ड्रोन व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये जळणारी वाहने, धूर सोडणारे बाजार, रस्त्यावरची तोडफोड आणि संतप्त गर्दी स्पष्टपणे दिसते. त्याहूनही धक्कादायक म्हणजे, आंदोलकांनी कम्युनिस्ट नेत्यांना पकडून नदीत फेकल्याचा दावा काही व्हिडिओ व छायाचित्रांत केला जात आहे. जरी या घटनेची अधिकृत पुष्टी झालेली नसली तरी, लोकांमध्ये यामुळे प्रचंड संताप आणि चर्चेचे वादळ उठले आहे.
🔥 सामने आई नेपाल की सुलगती सच्चाई — ड्रोन फुटेज में साफ़ दिख रहा है कि कैसे आंदोलन की आग पूरे देश में फैल चुकी है।#NepalProtests #Nepal pic.twitter.com/PtXD98DBR1
— Arun Kumar (@arunbwn) September 10, 2025
credit : social media
राष्ट्रपती रामचंद्र पौडेल आणि पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्यासह संपूर्ण सरकारने राजीनामा जाहीर केला आहे. मात्र, या पावलानेही आंदोलकांची नाराजी कमी झालेली नाही. जनतेचा राग आता केवळ सरकारपुरता मर्यादित नसून, संपूर्ण सत्ताधारी व्यवस्थेविरुद्ध उफाळून आला आहे.
नेत्यांना एकामागून ‘असे’ फेकले नदीत
मीडिया में वायरल हो रहे वीडियो में दावा किया जा रहा है कि नेपाल में प्रदर्शनकारियों ने कम्युनिस्ट नेताओं को पकड़कर नदी में फेंक दिया।#NepalGenZProtest #communistparty pic.twitter.com/4ZklCnxTK7
— Mukesh Dhabhai (@1MDJournalist) September 9, 2025
credit : social media
मंगळवारी रात्रीपासून सुरक्षा दलांनी रस्त्यांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला. पण मोठ्या संख्येने बाहेर पडलेल्या लोकांनी आंदोलने हिंसक वळणावर नेली. वाहनं जाळली जात आहेत, दुकानांची तोडफोड होत आहे आणि काही ठिकाणी लूटमारचाही धोका निर्माण झाला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Nepal Protest : राजेशाही दार ठोठावते! कम्युनिस्ट राजवट संपते…नेपाळमध्ये ‘हिंदू राष्ट्रा’चा आवाज होतोय तीव्र
स्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून बुधवारी नेपाळी लष्कराने देशभरात कर्फ्यू लागू करण्याची घोषणा केली. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत लागू असलेला हा कर्फ्यू गुरुवारी सकाळी ६ वाजेपर्यंत वाढविण्यात आला आहे. लष्कराच्या म्हणण्यानुसार, काही बेशिस्त गट निदर्शनात घुसखोरी करून जाळपोळ, तोडफोड, लूटमार, महिलांवरील अत्याचार आणि लैंगिक छळासारख्या घटना घडवत आहेत.
लष्कराने नागरिकांना शांतता राखण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. “शांततेत सहकार्य करा, अफवांना बळी पडू नका आणि केवळ अधिकृत माहितीलाच विश्वास ठेवा,” असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर पत्रकार, सरकारी कर्मचारी आणि निवृत्त सैनिकांनीही जनतेला दिशाभूल होऊ न देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कर्फ्यू दरम्यान, फक्त रुग्णवाहिका, शववाहिका, अग्निशमन दलाची वाहने, आरोग्य कर्मचारी आणि सुरक्षा दलाची वाहने यांना परवानगी असेल. याशिवाय कोणतीही हालचाल गुन्हा मानली जाईल आणि सुरक्षा दल कठोर कारवाई करतील, असा इशारा नेपाळी लष्कराने दिला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Balen Shah : नेपाळमधील Gen-Z विद्रोहामागे संशयाची सुई ‘या’ व्यक्तीवर; जाणून घ्या काय आहे यामागचं खरं राजकारण?
दरम्यान, सामान्य जनता या अस्थिरतेमुळे भयभीत झाली आहे. बाजारपेठा ओस पडल्या आहेत, शाळा व महाविद्यालयं बंद ठेवण्यात आली आहेत, तर रुग्णालयांमध्येही तणावाचे वातावरण आहे. लोकांना घराबाहेर पडायलाही भीती वाटत आहे. नेपाळ आज एका निर्णायक वळणावर उभा आहे. प्रश्न एवढाच आहे की, या आंदोलनाचा अंत कसा आणि कधी होईल?